“उपयुक्त नकारात्मक भावना” म्हणजे काय ते जाणून घेऊयात.!
"भावनांच्या ग्रे शेड्स" (सिरीज - भाग २) मध्ये तुमचे स्वागत आहे ...
या भागात आपण पाहुयात "उपयुक्त नकारात्मक भावना.." Helpful Negative Emotions.!

...
काय आहेत ह्या इंद्रधनू मधील मधल्या भावना... ज्या सकारात्मक आणि नकारात्मक भावनांच्या मधल्या भावना असतात ??????
ह्या इंद्रधनूमध्ये, सकारात्मक आणि नकारात्मक भावनांच्या मधल्या भावना आहेत उपयुक्त नकारात्मक भावना !
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कि नकारात्मक भावना पण उपयुक्त कश्या काय असू शकतात ?
हे आपण पाहणार आहोतच,पण त्याआधी मी तुम्हाला भावनांची थोडी जन्मकथा सांगते त्यामुळे मग तुम्हाला उपयुक्त नकारात्मक भावना समजायला सोपे जाईल..!
"भावनांचे ग्रे शेड्स"च्या पहिल्या भागात मी सांगितलेच आहे कि भावना म्हणजे विशिष्ट अनुभवाला व उद्दीपकाला दिली जाणारी प्रतिक्रिया कि जिचे पडसाद आपल्या शरीरावर आणि मानसिक अवस्थेवर उमटतात आणि ती प्रतिक्रिया आपले विचार आणि वर्तन ला दिशा देते .!
तर सगळ्यात आधी आपण हा विशिष्ट अनुभव व उद्दीपक(Stimulus) म्हणजे काय ते बघूया !
एका गोष्टीवर विचार करा .... व सांगा काय वाटते तुम्हाला?
आपल्या समोर येणाऱ्या आनंदी व अनुकूल परिस्थितीला आपण नकारात्मक भावनेने सामोरे जातो का ?
विचार करायची गरजच नाही ... कारण अनुकूल परिस्थितीत आपल्याला सकारात्मक भावनाच निर्माण होतात कि ज्या आपल्याला त्रासदायक न ठरता आल्हाददायक वाटतात..!
आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या भावना ज्या परिस्थितीमुळे निर्माण होतात ती असते प्रतिकूलता!
आता हे प्रतिकूल परिस्थिती असणे म्हणजे तरी काय ?
आयुष्याबद्द्ल, जगण्याबद्दल असलेल्या आपल्या अपेक्षा आणि वास्तवातील समोर असलेले प्रत्यक्ष आयुष्य, जगत असलेले जीवन ह्यातील फरक म्हणजे प्रतिकूल अवस्था !
पाहिजे ते मिळणे म्हणजेच अनुकूलता, पाहिजे ते न मिळणे आणि नको असलेले समोर येणे हीच तर असते ना प्रतिकूलता..??
तर ह्या प्रतिकूल उद्दीपकाला (Stimulus) आपला नकळत प्रतिसाद (Response) जातो .
पण कोणत्याही उद्दीपकाला आपला प्रतिसाद हे दिसते तितके साधे हि गणित नाही.!!!
हा जो प्रतिसाद आहे ना हा तो आपण त्या प्रतिकूल प्रसंगाचे वा घटनेचे जसे मूल्यमापन (Evaluation) केले आहे आणि त्या आपल्या मूल्यमापनावरून आपण जे काही अनुमान काढले आहेत, अंदाज बांधले आहेत त्यावर अवलंबून असतो..
अजून एक गोष्ट, एखाद्या परिस्थिती बाबत आपले इव्हॅल्युएशन आणि अनुमान हे आपण फक्त आपल्या हाती आलेल्या वा आपल्यासमोर असलेल्या माहितीच्या आधारे ठरवत नाही तर आपण त्यात आपले स्वतःचे पण अर्थपूर्ण घटक टाकत असतो, वेगवेगळे अर्थ लावत असतो.
हे जे अर्थ टाकणे वा अर्थ लावण्याची जी आपली पद्धत असते तीच आपल्या प्रतिसादाला दिशा देते .
त्यासाठी आपण एक उदाहरण बघूया ..
समजा तुम्ही कॉफीशॉप मध्ये बसला आहात. समोरून गेट मधून तुमचा मित्र येताना दिसतोय ,त्याने हि तुमच्याकडे पहिले त्यावर तुम्ही त्याला हात हलवून आणि हसून अभिवादन केले पण तो मित्र काहीहि प्रतिसाद न देता दुसऱ्या कोपऱ्यात निघून गेला . ह्या प्रसंगाचा तुम्ही जसे इव्हॅल्युएशन करून अनुमान काढणार त्यावर तुमच्या भावना ठरतील !
तुम्ही इव्हॅल्युएशन केले कि त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि अनुमान काढले कि त्याने मला प्रतिसाद न देता टाळले त्यामुळे मला अपमानास्पद वाटत आहे...
त्यात मी अभिवादन केल्यावर "समोरच्याने, मित्राने मला प्रतिसाद दिलाच पाहिजे होता, त्याने मला नोटीस केले पाहिजे, तो मला टाळू शकत नाही ..." हे स्वतःचे अर्थ त्यात टाकले.
आता एवढा सगळा विचारांचा, भावनांचा मालमसाला एकत्र झाल्यामुळे कोणत्या भावना तुमच्या मनात निर्माण झाल्या असाव्यात असे तुम्हाला वाटते ?
1. मित्राचा भरपूर राग आल्याची भावना
2. दुखावले गेल्याची भावना....
3. आजूबाजूच्या ज्यांनी मला हात हलवून हसताना पहिले ते माझी फजिती झाल्यामुळे आता मनात मला हसत असतील असे वाटून लाज हि वाटत असेल...
आता आपण याची दुसरी बाजू काय होऊ शकते ते पाहुयात... फक्त गरज आहे या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मूल्यमापन करण्याची...
1. मित्राने मला पाहिले अन तो घाईत आहे यावरून जर असे अनुमान काढले कि तो आता ह्या क्षणी इतक्या तातडीच्या कामात आहे कि त्याने मला पाहिलेही नसावे ...!!
2. त्याची नजर जरी माझ्या दिशेने होती पण तो त्याच्याच तंद्रीत असल्याने लक्ष माझ्याकडे गेलेच नसेल ..
3. ज्याअर्थी त्याने काही प्रतिसाद दिला नाही, मी त्याला ओळखू आलेलो नाही याचाच अर्थ तो नक्कीच कोणत्यातरी विचारात आहे ..
आणि स्वतःचे अर्थ लावण्याचे घटक :-
1. जरी त्याने आता मला प्रतिसाद दिला नाही तरी तो मला नंतर भेटू शकतो किंवा मीहि भेटून त्याला विचारू शकतो ...
2. त्याने मला प्रतिसाद दिला नाही म्हणजे मी त्याच्याकडून दुर्लक्षिला गेलोय असा अर्थ होत नाही ..
3. ह्याचा फक्त एवढाच अर्थ होऊ शकतो कि तो आता काही गंभीर विचारात आहे .
4. तो एक व्यक्ती म्हणून चांगला आहे ...मला प्रयत्न करायला हवाय कि त्याला कसल्या गोष्टीचा त्रास तर नाहीये ना ..?
पाहिलत...?
ह्या पद्धतीमध्ये तुमच्या मनात नाराजीची भावना अगदी थोड्या प्रमाणात निर्माण होऊ शकते पण रागाची वा नैराश्याची भावना मात्र कधीच निर्माण होत नाही.
आता ज्यावेळी आपण असा प्रतिसाद देत असतो ना तेव्हा आपल्या मनात हानिकारक आणि उपयुक्त अश्या दोन्ही भावना निर्माण होतात पण कोणती भावना प्रबळ करायची हे आपले मूल्यमापनात्मक अनुमान ठरवते …
….क्रमश…
----------
तिसऱ्या भागात आपण पाहुयात “ चिंता आणि काळजी..” (anxiety & concern)
"माझ्या समोर येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मला आणि माझ्या जिवलगांना काहीतरी धोका उद्भवू शकतो ..” यात चिंता कोणती व काळजी कोणती हे कसे ओळखावे व त्यापासून कसे वाचवावे ...?
“भावभावना
आपल्यावर कशा जादू करतात ते जाणून”म्हणजे काय ते जाणून घेण्यासाठी पहिला
भाग इथे वाचा.
तुमचे प्रतिसाद कमेंट मध्ये नक्कीच लिहा म्हणजे मला त्या दृष्टीने पुढील लेखात मदत होईल ..
धन्यवाद ...
Great....
ReplyDeleteThank you
ReplyDeleteVery well written..
ReplyDeleteNew information, new way..... Very well explained, easy to understand.
ReplyDeleteThanks
DeleteThank you so much... Tumche lekh Nehamich khup faydeshir thartat... Manatil vicharancha gunta kiti algad sodavta Tumhi...
ReplyDeleteThanks Manisha
DeleteVery well written
ReplyDeleteThank you Rationally Yours
ReplyDeletevery nice info...
ReplyDeletegreat help
Thank you nilesh
DeleteKhup sundar thank you sis
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteताई यावर कण्ट्रोल कसे करावे,ह्याबद्दल काही लेख असतील तर.
ReplyDelete