अंक्झाईटी .. चिंता विकार

TheMindTalks
0

अंक्झाईटी .. चिंता विकार 

आजकाल कोणी डिस्टर्ब असले किंवा एखाद्यात वेगळे भावनिक /मानसिक विचारांचे आणि वर्तनाचे पॅटर्न दिसले कि सर्रासपणे वापरले जाणारे दोन शब्द म्हणजे : " ह्या व्यक्तीला अंक्झाइटी आहे किंवा हि व्यक्ती डिप्रेशन मध्ये आहे “ ! 

अंक्झाइटी आणि डिप्रेशन हे शब्द  इतक्या सहजपणे वापरले जातात  पण त्याबद्दल बेसिक माहिती नसते. आजच्या ब्लॉग मधून आपण अंक्झाइटी ज्याला मराठीमध्ये चिंताविकार म्हणतात त्याबद्दल माहिती घेऊयात .

साधारणपणे  काळजी ,बेचैनी,भीती हे नॉर्मल प्रतिसाद  प्रसंगानुरूप प्रत्येक जण हे आयुष्यात कधी ना कधी  अनुभवत असतो !  पण जेव्हा ह्या नॉर्मल प्रतिसाद ऍबनॉर्मल बनून  गंभीर रूप घेतात नि त्याचा व्यक्तीच्या आयुष्यावर, दैनंदिन जगण्याच्या क्वालिटी वर नकारात्मक परिणाम करायला लागतात तेव्हा त्यांना चिंता विकार असे म्हटले जाते.

चिंता विकार असलेली व्यक्तीला चिंताविकारग्रस्त व्यक्ती म्हणजेच अँक्सिअस  म्हटले जाते . तर अशी अँक्सिअस व्यक्ती  कि जी काहीतरी अगदीच वाईट घडणार आहे ह्याची वाट पाहत असते त्यामुळे ती आपल्या दैनंदिन आयुष्याचा आनंद नि समाधान घेऊ शकत नाही .हि व्यक्ती खूप काळजी करत असते ,बहुतेक वेळा सांगता येणाऱ्या भीतीची काळजी करत असते.अंक्झाईटी मध्ये भविष्यातील संभाव्य धोक्याची,हानीची, नकारात्मक घटनांच्या  शक्यतेची खात्री असते आणि ह्या संभाव्य धोका ,हानी ,नकारात्मक घटनांना अतिरंजित स्वरूप देऊन त्यांना सामोरे जाण्याची ,अश्या गोष्टींना  तोंड देण्याची व्यक्तीची क्षमता कमकुवत केली जाते. उदा ." जर मी पेपर लिहिताना ब्लॅन्क झालो ,काहीच आठवले नाही तर ?"   "मी प्रवासात असताना मला हार्ट अटॅक आला तर ?” "बस स्टॅण्डवर माझ्या आजूबाजूला  गर्दीत करोना चा पेशंट असेल तर ?" जर मला  समारंभामध्ये पॅनिक अटॅक आला तर ?” अश्या प्रकारचे तीव्र सतत विचार असतात .

अंक्झाएटी मुख्यत्वे पुढील स्वरूपांमध्ये दिसून येते :

Ø  जनरल अंक्झाएटी डिसऑर्डर (GAD)

Ø  पॅनिक डिसऑर्डर (Panic disorder )

Ø  फोबिया (Phobias )

Ø  ओब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर(OCD)

Ø  पोस्ट ट्रोमॅटिक डिसऑर्डर(PTSD).

जनरल अँक्सिएटी डिसऑर्डर : ह्यामध्ये व्यक्ती खूप काळापासून सतत अतिरंजित आणि अतिशयोक्तीपूर्ण काळजी करत असते तसेच  हि काळजी किंवा चिंता तिच्या नियंत्रणाबाहेर असते  त्यामुळे ती अस्वस्थ ,बेचैनअसते. हे काळजी चे विषय हि सामान्य असतात ,जसे तिची आणि कुटुंबातील सदस्यांची आरोग्य आणि सुरक्षा , आर्थिक बाजू , शाळा कॉलेज , नोकरी ,धंदा , प्रवास, घरगुती कार्यक्रम किंवा  समारंभ . माझ्या छातीत दुखतंय , हार्ट अटक तर नसेल ना ..मुलाला शाळेतून यायला उशीर झालाय ऍक्सिडेंट तर झाला नसेल ना ..पाहुणे आले नि माझे काम आटोपले नसेल तर ... कार्यक्रमात मी बोलताना अडखळलो तर .. माझी नोकरी गेली तर ..माझे नुकसान झाले तर ..सून भांडकुदळ असली तर ..अश्याप्रकारे त्यांच्या  चिंता सतत वाहत असतात .


पॅनिक डिसऑर्डर : पॅन नावाचा जंगलात राहणाऱ्या  एक ग्रीक देवाच्या नावावरून ह्या अचानक आणि तीव्र ,सर्व शरीर मन व्यापून टाकणाऱ्या पण निरर्थक  घाबरण्याला पॅनिक हे नाव दिले आहे . असे म्हणतात कि त्या जंगलातून जाणाऱ्या एकट्या दुकट्या प्रवाश्याला पॅन ह्या देवतेमुळे अश्या भयानक भीतीचा अनुभव यायचाह्यामध्ये व्यक्तीची अंक्झाइटी लेव्हल उच्चपातळीवर असते . ती एखाद्या विचाराने,कल्पनेने ,दृश्याने सुरु होते किंवा कधी कधी अश्या काही संकेताशिवाय सुरु होते , भय कधी कधी अचानक उस्फुर्तपणे बिनाअंदाजानेही सुरु होते .

पॅनिक अटॅक च्या  व्यक्तीमध्ये गंभीर आजाराचे,मरण्याचे,बरेवाईट होण्याचे,स्व- नियंत्रण हरवण्याचे , मेंटल आजाराचे  किंवा वेडे होण्याचे,आपल्या कंट्रोलबाहेर परिस्थिती जाण्याचे  भय असते .

पॅनिक अटॅक च्या व्यक्ती नेहमीच अँक्सिअस असतात असे नाही !


फोबिया: फोबोस ह्या ग्रीक देवतेच्या नावावरून ह्या भीतीविकाराला फोबिया नाव दिले गेले आहे . असे म्हणतात की तो युद्धावर जाण्याआधी स्वतःचा चेहरा चित्रविचित्र पद्धतींने रंगवायचा जेणेकरून त्याच्या शत्रुंना तो चेहरा पाहून उरात धडकी भरायची ! फोबिया म्हणजे अतिभीती, दहशत , टेरर जबरदस्त घाबरणे ! फोबिया असलेल्या व्यक्तींना त्यांना कश्याची भीती वाटते हे माहित असते .त्यांना ज्या विचारांची , माणसांची , प्राण्यांची, परिस्थीतीची ,घटकांची भींती वाटत असते ते सोडून इतर वेळी ते चिंताग्रस्त नसतात . फोबिया मध्ये अनेक भितींचा समावेश होतो ; उंच जागेची भीती ,पाण्याची भीती , बंद जागेची भीती ,अपरिचित माणसांची किंवा अपरिचित जागेची भीती , सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती, लोकांसमोर बोलण्याची भीती , परीक्षेची भीती, परफॉर्मन्स भीती , एकटेपणाची भीती , नापास होण्याची भीती ,अपयशाची भीती , टीकेची भीती ,चुका होण्याची भीती,रिलेशनशिप कमिटमेंट भीती . अश्या गोष्टींना सामोरे जाण्याच्या कल्पनेनेच ह्या व्यक्तींच्या उरात धडकी भरते !


ओब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर: ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर मध्ये  मनात सतत नको वाटणारे नकारात्मक  विचार येत असतात ,त्यांना घाबरून व्यक्ती त्या  विचारांपासून सुटका करून घेण्यासाठी एखादी कृती वारंवार करत राहतो ! हे वर्तन त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करत जाते ,व्यक्ती नेहमीच अस्वस्थ आणि बैचैन राहते ! ह्या डिसऑर्डर मध्ये व्यक्ती त्याच्या मनातील कल्पनांपासून सुटका करून घेऊ शकत नाही .

ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर मध्ये  लैंगिकता,नकारात्मक भावना  जसे राग,मत्सर ,द्वेष; धार्मिक विचार, सुरक्षितता ,अस्वच्छता वा दूषित होणे ह्या प्रकारच्या विचारांनी मन व्यापून गेलेले असते आणि ह्याप्रकारच्या विचाराणा घाबरून मग व्यक्ती सतत हात धुणे ,वारंवार गोष्टी चेक करणे , मोजणे , एखादा मंत्र वा देवाचे नाव सतत घेणे , चालताना सतत पाऊले मोजणे , रस्त्यांवर चे स्ट्रीट लॅम्प किंवा साइन बोर्ड मोजत जाणे वा चेक करत जाणे , सतत घर स्वच्छ करणे वा कपडे वारंवार धुणे अश्या प्रकारच्या विधींमध्ये स्वतःला गुंतवून घ्यायला लागते .


पोस्ट-ट्रोमॅटिक डिसऑर्डर:

एकाद्या दुर्घटनेच्या अनुभवातून स्वतःला न सावरू शकणे हे पोस्ट ट्रोमॅटिक डिसऑर्डर मध्ये येते . जीवघेणा अपघात, जवळच्या नातलगाचा मृत्यू ,अमानुष  मारहाण , वाईट पद्धतीने केलेला अपमान, गम्भीर दुखापत,अपंगत्व, भूकंप,पूर अश्या प्रकारच्या दुर्घटना अनुभवल्या किंवा पाहिल्या तर त्यावेळेची जी मानसिक स्थिती निर्माण होते ती  एक महिन्यापेक्षा जास्त काळ राहत असेल तर ती व्यक्ती पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस मध्ये आहे असे म्हणू शकतो . ह्यात अस्वस्थपणा ,बैचैनी ,चिडचिडेपणा , झोप न येणे, मनात सतत भीतीदायक,नकारात्मक विचारांची साखळी असणे , घडून गेलेले  प्रसंग पुन्हा पुन्हा अनुभवने ह्यामुळे व्यक्ती प्रचंड तणावाखाली असते .


अंक्झाईटी ची लक्षणे :

शारीरिक लक्षणे :

·        बेचैनी ,अस्वस्थता ,तणाव ,थकवा

·        चक्कर येणे ,डोके गरगरणे, हृदयाचे ठोके जाणवणे

·        श्वास जड होणे ,गुदमरल्यासारखे वाटणे, घाम येणे

·        हातापायातील  त्राण गेल्यासारखे वाटणे, अशक्तपणा जाणवणे

·        काळजी आणि भीती वाटणे  डिस्टर्ब झोप,एकाग्र राहता न येणे

·        नकारात्मक सतर्कता वाढणे स्नायू ताठर होणे

·        मळमळणे , जुलाब किंवा पचनसंस्था बिघडणे .

संज्ञानात्मक लक्षणे :

·        स्वनियंत्रण गमवायची भीती, संभाव्य नकारात्मक परिस्थिती हाताळू शकण्याची भीती.

·        शारीरिक इजा किंवा मृत्यूची भीती .

·        इतरांकडून नकारात्मक मूल्यमापन होण्याची भीती .

·        भीतीदायक आठवणी , कल्पना आणि विचार.

·        एकाग्रता कमी होणे नि पटकन विचलित होणे, गोंधळलेपणा.

·        एका ठिकाणी खूप काळ लक्ष देऊ शकणे , संभाव्य हानीबाबत सतर्कता वाढणे

·        स्मरणशक्ती कमी होणे .

·        तर्कसंगत विचार करू शकणे ,वस्तुनिष्ठता कमी होणे.

भावनिक लक्षणे :

·        सतत तणाव , बेचैनी , अस्वस्थता जाणवणे ,तळमळत राहणे

·        सतत अनामिक भीती,घबराहट जाणवणे .

·        चिडचिडेपणा , पटकन राग येणे ,संयम कमी होणे .

वर्तन लक्षणे :

·        संभाव्य हानिकारक परिस्थिती किंवा घटनांच्या संकेतांपासून पळ काढणे किंवा अश्या परिस्थिती  टाळणे

·        पुन्हा पुन्हा सुरक्षिततेची खात्री करून घेणे वा इतरांकडून तशी हामी भरून घेणे

·        अस्वस्थ राहणे ,द्विधा मनस्थिती दर्शवणे ,अस्वथ हालचाल करणे जसे मागेपुढे चालणे .

जर अंक्झाएटी ला सध्या सूत्रात मांडायचे ठरले तर :

Overestimate Danger + Underestimate Personal Coping = High Anxiety

अंक्झाईटी डिसऑर्डर वा चिंता विकार च्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या कुटुंबात आढळत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे . अंक्झाईटी वर औषधोपचार आणि सायकोथेरपी ही  संयुक्त उपचारपद्धती परिणामकारक ठरलेल्या आहेत.

 

Rohini Phulpagar

Psychotherapist

9604968842

themindtalks4u@gmail.com









Post a Comment

0Comments

Post a Comment (0)