मनोविश्लेषणाचा सिद्धांत (सायकोअनलाइटिक थेअरी ) ....(अंतिम )

TheMindTalks
5

   मनोविश्लेषणाचा सिद्धांत (सायकोअनलाइटिक  थेअरी )   (अंतिम )


मागच्या भागात आपण डॉक्टर सिगमंड फ्रॉईड च्या पर्सनॅलिटी विकासाचे दोन सिद्धांत बघितले; आता आपण  डॉक्टर सिगमंड फ्रॉईड च्या पर्सनॅलिटी विकासातील मनोलैंगिक म्हणजे सायकोसेक्सुअल टप्पे बघणार आहोत : 


फ्रॉईड चा  विश्वास होता कि व्यक्तीच्या लहानपणापासूनच्या वाढीच्या टप्प्यांमधून पर्सनॅलिटी चा विकास होत जातो ; ह्या टप्प्यांवर ईडचे आनंदी तत्व हे शरीराच्या विशिष्ट भागांवर केंद्रित होते ज्याला फ्रॉइड ने  इरोजेनज झोन म्हटले. .इरोजेनस झोन  म्हणजे शरीराचे असे भाग कि  उत्तेजनासाठी संवेदनशील असते. हे भाग म्हणजे ओठ, तोंड , लैंगिक अवयव ! शरीराचे हे भाग वाढीच्या प्रत्येक टप्प्यांमध्ये महत्वाचे ठरतात आणि त्यावर पर्सनॅलिटी कशी निर्माण होते हे ठरते असे डॉक्टर सिगमंड फ्रॉइड ची थेअरी सांगते !

पर्सनॅलिटीचे सायकोसेक्सुअल टप्पे  :

ओरल स्टेज:  हा टप्पा जन्मापासून एक वर्षापर्यंत असतो; ह्या टप्प्यांवर आनंदाचा स्रोत तोंड आणि ओठ असतात. चोखणे ,पिणे,खाणे ह्यातून ईड चे आनंद तत्व कार्यरत असते . ह्या वयात मुले मातेचे दूध पिणे, वेगवेगळ्या गोष्टी तोंडात घालणे, अंगठा चोखणे ह्या क्रिया करत असतात . साधारणतः: एक वर्षानंतर मुलाचे मातेचे दूध सोडून त्याला बाटली किंवा वरील जेवणाची सवय लावली जाते ; हा टप्पा जर व्यवस्थितपणे हाताळला गेला नाहीतर पुढील आयुष्यात पर्सनॅलिटी मध्ये काही संघर्ष निर्माण करतात. फ्रॉईड च्या मते, धूम्रपान, मद्यपान, जास्त खाणारी किंवा नखे ​​चावणारी प्रौढ व्यक्ती तिच्या ओरल टप्प्यात स्थिरावलेली असते . बहुतेक अश्या व्यक्तीचे मातेचे दूध सोडवण्याची क्रिया हि खूप लवकर वा उशिरा झालेली असून योग्य प्रकारे हाताळली नसते . त्यामुळेच तणावपूर्ण अवस्थेत ताण कमी करण्यासाठी ह्या व्यक्तीमध्ये  धूम्रपान, मद्यपान, जास्त खाणे  किंवा नखे ​​चावणे ह्या प्रवृत्ती दिसतात .

अनल स्टेज :  मूल ओरल स्टेज मधून ह्या स्टेज मध्ये जाते ; हा काळ वर्षे ते वर्षे असतो . ह्या टप्प्यात ईड चे आनंद तत्व हे मुलाचे गुदद्वार आणि मूत्र विसर्जन इथे केंद्रित होते. ह्या टप्प्यावर पालक मुलाला टॉयलेट ट्रेनिंग कसे देतात ह्यावर पुढील पर्सनॅलिटी वाढीतील संघर्ष अवलंबून असतो . फ्रॉईड च्या मते जे पालक ह्या टप्प्यांवर सकारात्मक आणि कौतुक आणि बक्षिसाच्या माध्यमातून टॉयलेट ट्रेनिंग देतात त्या मुलांमध्ये सक्षमतेची भावना निर्माण होते. टॉयलेट ट्रेनिंगमध्ये कठोर असणारे पालक मुलाच्या अनल टप्प्यावर स्थिर होण्यास कारणीभूत ठरतात  ज्यामुळे  अनल-रेटेन्टीव्ह  पर्सनॅलिटी विकसित होते.अश्या पर्सनॅलिटी च्या व्यक्ती कंजूष आणि हट्टी असतात , त्यांना  सुव्यवस्था आणि नीटनेटकेपणाची अनिवार्य आवश्यकता असते आणि त्यांच्यासाठी  परिपूर्णता, पर्फेक्टनिझम हा घटक महत्वाचा असतो .जर पालक टॉयलेट ट्रेनिंगमध्ये आळशी असतील तरी हि मूल ह्या टप्प्यावर स्थिर होऊन त्याच्यात अनल-एक्सपल्सिव्ह पर्सनॅलिटी विकसित होते .अश्या पर्सनॅलिटी ची व्यक्ती गोंधळलेली , निष्काळजी, अव्यवस्थित आणि भावनिक उद्रेकांना सहज बळी पडते.

फालिक स्टेज :   अनल स्टेज मधून मूल फालीक स्टेज मध्ये जाते; हा टप्पा वयाचे ते वर्षापर्यंत असतो ज्या वयात मुलाला आपल्या शरीराची जाणीव होत असते आणि मुलगा आणि मुली मधला फरक कळत असतो. ईड चे आनंद तत्व आता लैंगिक अवयवांवर केंद्रित असते .वाढीच्या ह्या टप्प्यात जेव्हा  मुलाला विरुद्ध-लिंगी पालकांची ओढ निर्माण होते आणि समलिंगी पालकांबद्दल मत्सर आणि द्वेष वाटतो तेव्हा पर्सनॅलिटी संघर्ष उद्भवतो.

मुलांमध्ये पर्सनॅलिटी च्या ह्या संघर्षाला ईडिपस कॉम्प्लेक्स म्हणतात ; ह्यात मुलाला आई बद्दल ओढ वाढते त्याच वेळी वडील हे आईचे त्याच्याबद्दलच्या प्रेमातील प्रतिस्पर्धी वाटतात . त्याच वेळी  वडील त्याच्या ह्या भावनांबद्दल त्याला शिक्षा करतील अशी भीती हि वाटत असते . जेव्हा मुलगा वडिलांना आई पर्यंत पोहोचायला अप्रत्यक्षरित्या  जबाबदार धरायला लागतो तेव्हा हा पर्सनॅलिटी मधला संघर्ष निवळतो. ईडिपस कॉम्प्लेक्स चे निराकरण झाले नसल्यास व्यक्तीच्या पर्सनॅलिटी मध्ये व्यर्थपणा आणि अति महत्वाकांक्षा हे घटक  जाणवतात .

मुलींमध्ये अश्या संघर्षाला इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स म्हणतात; ह्यात मुलीला वडिलांबद्दल ओढ वाढते आणि आई तिला प्रतिस्पर्धी वाटते . फ्रॉईड ने सुरुवातीला ईडिपस कॉम्प्लेक्स सारखेच  इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स बद्दल आपले निरीक्षण मांडले पण नंतर ते नाकारले . फ्रॉईड च्या थेअरीत इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स ला बाजूला सारले गेले.

लेटेन्सी स्टेज :  फालिक स्टेज नंतर मूल लेटेन्सी स्टेज मध्ये प्रवेश करतो; हा काळ वर्षांपासून वयात येईपर्यंतचा असतो. हा कालावधी एक टप्पा मानला जात नाही, कारण ह्या कालावधीत मुलांमधील  लैंगिक भावना सुप्त असतात; मुले शाळा, मैत्री, छंद आणि खेळ यासारख्या इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. मुलांना  समवयस्क समलैंगिक मुलांसोबत वेळ घालवण्यात आनंद वाटतो . मुलाची स्वतःबद्दलची  जेंडर पर्सनॅलिटी  अधिक स्पष्ट होते .

जननेंद्रिय स्टेज : हा शेवटचा टप्पा जो वयात आलेल्या कालावधीपासून सुरु होतो .या अवस्थेत, लैंगिकतेचे  पुनर्जागरण होते कारण निद्रिस्त इच्छा पृष्ठभागावर येतात. मूल आता तरुण झालेले असते आणि ते पल्या  इच्छा ह्या स्वीकार्य आणि विधायक मार्गाने पूर्ण होईल अश्या प्रकारे मार्गदर्शित करते. ह्या टप्यात प्रौढ लोक आपली लैंगिक इच्छा परिपक्व करून विरुद्धलिंगी प्रौढ व्यक्तींकडे आकर्षित होतातज्या व्यक्तींनी मागील टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केले, जननेंद्रियाच्या अवस्थेपर्यंत कोणतीही स्थिरता ठेवता पोहोचले, त्या व्यक्ती सु-संतुलित, निरोगी प्रौढ असल्याचे  डॉक्टर फ्रॉईड यांनी म्हटले आहे .

          आपण डॉक्टर सिगमंड फ्रॉईड ह्यांनी मांडलेल्या पर्सनॅलिटी विकासाच्या वेगेवेगळ्या थिअरीज जाणून घेतल्यात .त्यांनी फक्त थिअरीज मांडल्या नाहीत तर ईड, इगो आणि सुपर इगो ह्यांच्यात निर्माण होणाऱ्या संघर्षणाने व्यक्तीच्या विचारात आणि वर्तनात निर्माण होणाऱ्या तणावापासून स्वतःला वाचवण्यासाठी व्यक्ती एक यंत्रणा उभारते त्या डिफेन्स मॅकॅनिझम ची कल्पना हि डॉक्टर सिगमंड फ्रॉईड यांनी मांडली. त्यांची मुलगी अँना फ्रॉईड ह्यांनी  त्याच्या ह्या थेअरीला अजून विकसित केले

डॉक्टर सिगमंड फ्रॉईड मानसिक उपचारासाठी सायकोऍनालीटीक थेरपी विकसित केली ; त्यात स्वप्नांचे विश्लेषण , विचारांचे फ्री असोसिएशन ,आणि भावनांचे ट्रान्सफ ह्या पद्धतीने नैराश्य ,चिंता विकार , तणाव , सेक्सुअल प्रॉब्लेम , वैवाहिक आयुष्यातील प्रॉब्लेम्स , आयडेन्टिटी प्रॉब्लेम्स ह्यावर उपचार केले .

 

फ्रॉइडच्या बहुतेक कल्पनांना मानस शास्त्राच्या आधुनिक संशोधनात फारसे समर्थन मिळालेले नसले तरी, फ्रॉइडने मानसशास्त्राच्या क्षेत्रात केलेले योगदान कोणीही  कमी करू शकत नाही.

फ्रॉईडनेच निदर्शनास आणून दिले की आपल्या मानसिक जीवनाचा एक मोठा भाग बालपणातील अनुभवांवर प्रभाव पाडतो आणि आपल्या जाणीवेच्या बाहेर घडतो; त्याच्या सिद्धांतांनी इतरांसाठी अधिक संशोधनाचा  मार्ग मोकळा केला.

 

रोहिणी फुलपगार

Psychotherapist 

7840908441

Themindtalks4u@gmail.com

 


पुढील भागात  पर्सनॅलिटी विकासाची ह्युमॅनिस्टिक थेअरी बद्दल माहिती


Post a Comment

5Comments

Post a Comment