बातम्यांमुळे अस्वस्थ का वाटते ?

TheMindTalks
2
                                          

बातम्यांमुळे अस्वस्थ का वाटते ?

आज  सकाळाचीच गोष्ट माझ्या एक मैत्रिणीचा फोन आला  होता .इकडच्या तिकडच्या  गप्पा झाल्यावर मूळ मुद्दा  निघाला ,तिला  आजकाल टी. व्ही वरच्या  बातम्या वा  चर्चा  ऐकून  टेन्शन येते , काळजी  वाटते . नैराश्य पण येते की  किती वाईट घडतेय ,जगात, देशात, माझ्या घराच्या  उंबरठयाबाहेर ! मी तीला विचारले की,तु  ह्याआधीही म्हणजे लहानपणापासून  बातम्या बघत होतीच ना ! बातम्यांमध्ये चांगल्या  आणि वाईट दोन्हीही प्रकारच्या बातम्या असतात ,मग  आताच एवढी  टेन्शन  मध्ये  का  आली आहे ? त्यावर  तिचे म्हणणे असे  आहे कि ,बातम्या दोन्ही म्हणजे  चांगल्या आणि   वाईट किंवा त्यांची तीव्रता  अथवा सौम्यता ही  आहे ,पण बातम्या सांगणारे ज्या पद्धतीने सांगतात ना  त्यामुळेच टेन्शन  वाढते  !
                    तिचे  बोलणे खरंच  आहे , आजकाल  इतकी  चॅनेल्स  ची  रेलचेल आहे , दिवसभर बातम्या  तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे त्यांचे महत्वाचे काम  आहे आणि  आपण दर्शक  ही  सतत आलटूनपालटून वेगवेगळ्या चॅनेल्स वर जातच असतो  ना  बातम्या बघायला !
     खरं  पाहता  जेव्हा  एखादी  घटना घडते  आणि  तिची बातमी होते ,तेव्हा  आपण  ती  नुसती  घटना  पाहत नाही तर बातमीच्या स्वरूपात   आपण  ती घटना तीन  पायऱ्यांमध्ये  पाहतोबातमी  कश्याबद्दल आहे (काय  घडलेय /घडतेय ), बातमी कश्यापद्धतीने घेतोय ( जे घडलेय त्याचे अवलोकन ), बातमी चा कसा अर्थ काढतोय (जे घडलेय त्याचे अवलोकनावरून  मूल्यांकन अथवा विश्लेषण ). अश्या  प्रकारे बातमी ची  आपल्याकडून   दखल घेतली जाते !
            पण  आता  हे  असे घडत  नाही  कारण  न्यूज  अँकर  ने  दुसऱ्या  आणि  तिसऱ्या  पायरीवर  पण  कब्जा  केलाय. आजचे  कोणत्याही  चॅनेल वरचे  अँकर  तुम्हाला  अवलोकन  आणि  विश्लेषण  चा  पण  त्रास  द्यायला  तयार नाहीत ! हे  सगळं  मटेरियल पुरवतात !
            " ये  क्या  चल  रहा  हैं ... ,मैं  बहोतं ही  अपसेट  हूँ .. ,यह  सब  देखकर  मेरा दिल  बैठ  गया .. ,मेरा  मानना हैं , मेरा  कहना  हैं , इन सब  के  पीछे  मुझे  लगता हैं  ऐसा ही  कुछ  होगा , " किंवा  आपल्या  मराठी   पण ," हे  इतके  भयंकर  आहे , ह्यामध्ये  षढयंत्र आहे , आम्हाला असेच  वाटते , शरमेने  मान  खाली  गेली , आमच्या  चॅनेल  च्या  सर्व्हे नुसार  आम्ही  असा निष्कर्ष  काढलाय ... " आता  एवढी  जास्तीची  माहिती  आणि  सोबत त्या  माहितीला पूरक  देहबोली मिळत असेल  तर  आपल्या दर्शकांपैकी  किती  जण  भावनिक स्थिरता ठेवून  बातमीचे  आपल्या मतानुसार  इव्हॅल्युएशन करत असतील !

             जे  दर्शक ८०/९० च्या  दशकात  लहान असतील किंवा तरुण  असतील त्यांना  त्यावेळेचे न्यूज  अँकर  किंवा  बातम्या  वाचणारे आठवत असतीलच !
सलमा  सुलतान , नीलम शर्मा ,सरला  माहेश्वरी , सुमित  टंडन ,वेदप्रकाश , विनोद  दुआ , अविनाश  सरीन , प्रदीप  भिडे , स्मिता तळवलकर ,सुजाता  भिडे  असे अनेक  अँकर  होते  ,पण  त्यांच्या शैलीत  बातमीचे  भावनिकि करण नव्हते ! त्याकाळात  ही  नकारात्मक  बातम्या होत्याच ना ! दंगे ,खून ,मारामारी ,बलात्कार , घोटाळे ,सीमेवरचे प्रश्न ,रोगराई ,गरिबी ,युद्ध ,दहशतवाद  हे  आजच्या काळातील बातम्यांचे  विषय  तेव्हाही  होते ,पण  ते  बातम्या  सांगतांना  आपले  काम  अगदी  सयंतपणे , सामाजिक  भान राखून ,कुठे  ही वैयक्तिक भाव भावनेचा  लवलेश  ही    जोडता वा  देहबोलीतून  व्यक्त    करता  करायचे  !

अनेक  संशोधनातून  हे  सिद्ध  होत आहे  की  नकारात्मक बातम्या  आणि  त्या  तुमच्यापर्यंत  कश्याप्रकारे  पोहाचवल्या जातात  ह्याचा  दर्शकांच्या  मनाच्या  स्थितीवर  परिणाम  होतो ! सततच्या  नकारात्मक  बातम्या ,त्याबद्दल चे दृश्यात्मक  चित्रण ,त्यांचे  सतत  पुनरावृत्ती , त्याबद्दलचे  विचार ह्यामुळे  दर्शकांची मनाची  सकारात्मक  अवस्था  कमी कमी  होत जाऊन  त्याची  जागा नकारात्मक  अवस्था , चिंता, विषाद ,नैराश्य, अती काळजी ह्या  घटकांनी  घेतली  जाते !सध्या  ह्याचे  प्रमाण वाढत  चाललेय !
आपण  दर्शकांची  स्थिती  सध्या  चक्रव्ह्यू मध्ये  अडकलेल्या  अभिमन्यू  सारखी  झाली  आहे ..  आपण  बातम्यांच्या  रिंगणात  प्रवेश  करतोय ,पण  आत  गेल्यावर  कळतेय  की  हे  नुसतेच  बातम्यांचे  रिंगण नाही  त्यात  अजून  एक  न्यूज  अँकर  च्या  देहबोलीचे ,त्यांच्या  शैलीचे ,आवाजाची  पट्टीचे , त्याचे स्वतःच्या मताचे  ही रिंगण  आहे  , ते  तुम्हाला  विचार  करू  देत नाहीत तर  तुम्हाला एका  विशिष्ट  दिशेनेच जायला  भाग  पाडत आहेत,म्हणूनच  आपल्यापैकी  अनेकजण  एखाद्या  बातमीचे आपल्या विचारप्रक्रियेनुसार  अर्थ    काढता , टि .व्ही . च्या  पडदयावर  दिसत  आणि  बोलत  असलेल्या  न्यूज  अँकर  च्या चष्म्यातून  बातमी  कडे  बघतात.
                    ह्या  चक्रातून  बाहेर  पडण्यासाठी  आपण काय  करू  शकतो ! बातम्या  बघणे  पूर्णपणे  थांबवा हा  यावर  पर्याय  होऊ  शकतो  का ? नाही  होऊ  शकत , पण बातमी  ऐकताना  आपण  न्यूज  अँकर  शी  तदरूप  होणे , त्याच्या  शब्दांशी  आपल्या  भावना  जोडणे ,त्यांच्या  देहबोलीतून  काही  ना  काही  संदेश  शोधणे , त्यांची मतं  नकळतपणे का  होईना आपल्या  मतांशी  जुळवून  घेणे  हे  सगळे  टाळून  आपण  समोरची  बातमी आपले  स्वतःचे  बोध , अनुमान आणि विश्लेषण  ह्या क्लृप्ती लावून  बघू  शकतो ! आपल्याला एवढी  स्वतःकडून मोकळीक  हवीच !
रोहिणी  फुलपगार
सायकॉलॉजिस्ट सायकोथेरपीस्ट
9604968842


Post a Comment

2Comments

Post a Comment