पौष्टिक आहार व मानसिक आरोग्य
आताच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच ह्या न त्या कारणाने काहीतरी तणाव, स्ट्रेस वाहत असतो. कधी त्याबद्दल जाणीव असते
कधी नसते ही! आणि इंटरनेट च्या जगात तणावरहित आयुष्य कसे जगायचे ह्याची भरपूर
माहिती असते, व्हिडिओ, रील्स, क्लिप्स, लेक्चर्स ह्यांमधून सुद्धा स्ट्रेस
मेनेजमेंट बद्दल माहितीचा खजिना उघडला जातो, त्यात वेगेवगळ्या पद्धती सांगितल्या
जातात ज्यात जास्त करून सकारात्मक विचार, आराम, व्यायाम, ध्यान ह्यावर भर दिला
जातो .
जगभरातील
विशेषज्ञ सांगतात कि कमीतकमी तणाव रहित आयुष्य जगायचे असेल तर आहार, विहार आणि विचार ह्या त्रिसूत्री मधील तिन्ही
घटकांमध्ये योग्य तो बदल केला पाहिजे.
ह्यातील शेवटचे दोन घटक तर आपण स्वीकारतो त्याबाद्ल माहिती घेतो पण महत्वाचा आहार
ह्या घटकाकडे आपण पाहिजे तेवढे लक्ष देत नाही.
मानसिक आरोग्यात आहाराचे महत्व का आहे हे आपण समजून
घेण्यासाठी आपल्याला आपले जठर, पचनक्रिया आणि मेंदू ह्यांचा परस्पर संबंध जाणून
घ्यायला पाहिजे.
आपला मेंदू आणि आपले जठर ह्याचे फार जवळचे नाते आहे ,
ते एकमेकांना सतत वेगेवगळे संदेश पाठवून एकमेकांच्या संपर्कात असतात. काय खाल्ले
गेले पाहिजे जेणेकरून वातावरणातील बदल आपल्याला मारक ठरणार नाही,आपले अस्तित्व
टिकून राहील ह्याबाबत चा सुसंवाद आणि समन्वय आपल्या उत्कार्न्तीपासून मेंदू आणि
जठर ह्यामध्ये आहे, जठरामध्ये २० वेवेगळ्या प्रकारचे 500 दशलक्ष
पेक्षा जास्त नुरोन्स असतात त्यामुळे त्याला आपल्या शरीराचा दुसरा मेंदू हि म्हटले
जाते .
तर हा पहिला आणि दुसरा मेंदू एकमेकांशी जोडलेले आहेत
. जेव्हा तुमच्यापुढे अचानक एखादी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते जसे अचानक
प्रेझेन्टेशन द्यायला लावणे ,किंवा अचानक फुल स्पीड ने असलेल्या गाडी समोर कोणीतरी
येणे, एखादी अतिशय वाईट बातमी ऐकणे,एखाद्या प्रभावशील व्यक्तीचा सामना होणे अश्या
वेळी पोटात गोळा आल्यासारखे वाटते, किंवा पोटात फुलपाखरे भिरभिरत असल्यासारखे
वाटते, काहीना अचानक आलेल्या तणावात पोट हलकं करण्याची गरज भासते. ह्या गोष्टी
आपले जठर आणि मेंदू एकत्रितपणे काम करत असल्याचे दर्शवतात. आपल्या जठर आणि
मेंदूमधील नुरोन्स मधील सारखेपणा असल्याने जठरातील मायक्रोब्स फक्त अन्न घटकांचे विघटन
करायचे काम करत नाही तर सर्व प्रकारचे उपयुक्त केमिकल्स, एन्झाइम्स,
नुरोट्रान्समीटर्स पण निर्माण करतात कि जे आपला मूड, आपल्या वेदना,नैराश्य,
चिंता,आपली मानसिक स्थिती नियंत्रित
करतात.
निरोगी जठर हे फक्त चांगल्या
शारिरिक आरोग्याचेच नाहीतर चांगल्या
मानसिक आरोग्याचे हि लक्षण आहे. जठराचे कार्य सुरळीतपणे होण्यासाठी त्याला योग्य
आणि पोषक अन्नघटकांची जोड असणे हि तेवढेच महत्वाचे आहे. सकस आणि पौष्टिक आहार
आपल्या जठरामधील महत्वाचे मायक्रोब्स वर ज्या प्रकारचा प्रभाव टाकतात त्य प्रकारचा
प्रभाव आपल्या बोधानिक,आकलन,स्मृती ह्या घटकांवर होतो . काही महत्वाचे अन्नघटक आणि
मानसिक आरोग्य ह्यातील संबध पाहूयात.
कर्बोहायड्रेट्स: आपल्या मेंदूचे कार्य हे ग्लुकोज वर
अवलंबून असल्याने कर्बोहायड्रेट्स चा आपल्या मानसिक आरोग्यावर लक्षणीय प्रभाव
पडतो. धान्यामधून जे कर्बोहायड्रेट्स मिळतात ते सेरोटोनीन चे स्त्राव वाढवतात
त्यामुळे एक शांत प्रभाव निर्माण होतो जो आपल्या जठरच्या आरोग्याला पूरक असतो
ज्याचा संबंध नैराश्याचा धोका कमी होण्याशी असतो. पूर्ण धान्यामधून आणि फायबर मधून
घेतले जाणारे कर्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते आणि त्यामुळे
एनर्जी स्थिर होवून त्याचा मूड आणि बोधानिक(कोग्नेटीव्ह) कार्यांवर परिणाम होत
नाही अजून एक जास्तीचा फायदा म्हणजे त्याचा आपल्या स्मृतीवर चांगला परिणाम होतो ,
पण जर आपल्याला प्रक्रिया केलेले रिफायन ग्लुकोज ची
सवय लावली असेल तर त्याचा नकारत्मक परिणाम आपल्या मूड वर होतो, सतत मूड बदलतो, थकवा जाणवतो, एनर्जी अस्थिर झाल्याने उत्साही वाटत नाही आणि हळू हळू आपण
डिप्रेशन च्या बाजूला ढकलले जातो. आपल्या बोधानिक कार्यक्षमते वर हि परिणाम होवून
आपली स्मृती, आकलन, समस्यानिराकरण क्षमता असे कार्य बाधित होतात.
हे ग्लुकोज आपल्याला साखर,ब्रेड,प्रोसेस केलेले आणि
साठवलेले पदार्थ, स्वीटनर्स, कोल्ड ड्रिंक्स, इत्यादी पदार्थामधून मिळतात.
प्रोटीन्स
: प्रोटीन्स मधील अमिनोअसीड मेंदूमधील
न्युरोट्रान्समीटर ला बळकटी देवून मानसिक आरोग्य सुरळीत राहण्यास मदत करतात.
पुरेसा प्रोटीन चा आहारात समावेश असल्यास न्युरोट्रान्समीटर ची क्षमता वाढून
त्याचा मेंदूच्या आरोग्याला फायदा होतो त्यामुळे बोधानिक कार्य जसे आकलन, अवलोकन, स्मृती
इत्यादी सुधारतात. तसेच मूडवर नकारत्मक परिणाम करणाऱ्या साखरेची शरीरात निर्माण
होणारी तीव्र इच्छा नियंत्रित राहते. जर आहारात प्रोटीनचा समावेश कमी असला तर
न्युरोट्रान्समीटर असंतुलित होतात, त्यामुळे बोधानिक कार्य पण मंदावते त्यचा
परिणामस्वरूप आपण नैराश्य, चिंताविकार ला बळी पडू शकतो.
व्हिटामिन्स
आणि मायक्रोन्यूट्रीयंट : व्हिटामिन्स हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी
अत्यंत महत्वाचे भाग आहेत. कित्येक वेळा काही मानसिक आरोग्याच्या तक्रारी ह्या
व्हिटामिन्स आणि मायक्रोन्यूट्रीयंट च्या उपयोगाने हि कमी करता येतात. एका
अभ्यासातून असे निष्कर्ष निघाले आहेत कि नऊ महत्वाचे व्हिटामिन्स सतत एक वर्ष दिले
गेले तर शिक्षण क्षेत्रासहित सगळ्या क्षेत्रात व्यक्तीच्या मूड,एकाग्रता आणि
स्मृती मध्ये सकारात्मक आणि लक्षणीय बदल होतात.
कोणत्या व्हिटामिन्स च्या कमतरतेमुळे काय मानसिक
समस्या निर्माण होवू शकतात हे पाहूया व्हिटामिन्स B1,B5,B3,B6,B12 आणि
फोलिक असिड च्या कमतरतेमुळे तणाव वाढणे, एकाग्रता आणि लक्ष कमी होणे,
नैराश्य, चिंता, भीती, चिडचिड होणे, राग येणे, स्मृती कमी होवून छोट्या छोट्या
गोष्टी विसरणे,सतत विचारात गोंधळल्यासारखे, हरवून गेल्यासारखे वाटणे ह्या समस्या
निर्माण होतात, व्हिटामिन्स C, मग्नेशिअम, सेलेनिअम च्या कमरतेमुळे नैराश्य, चिडचिड, वैतागलेपण, निद्रानाश, आणि मानसिक आजार ह्या समस्या उद्वभवतात! झिंक
च्या कमतरतेमुळे निरुत्साह ,भूक नाहीशी होणे , मन ब्लांक झाल्यासारखे वाटणे ,
अतिशय गोंधळून जाणे ,आयुष्य निरस वाटणे, आणि नैराश्याने वेढणे ह्या समस्या निर्माण
होतात.
आपल्या समोरील ताटातील प्रत्येक अन्नघटक आपल्या
मानसिक आरोग्याशी निगडीत आहे आणि त्याचा लक्षणीय प्रभाव आपल्या मानसिक संतुलनावर
पडतो. त्याचवेळी आपल्या आहार आणि आपल्या भावना पण एकमेकांशी जोडून असतात. आपण आपला
आनंद,सुख साजरे करताना किंवा एखाद्यावरचे आपले प्रेम आणि माया दर्शवताना आहाराचाच
आधार घेतो. काही वेळा व्यक्ती अस्वस्थ असेल, दु:खी असेल तरीही तिला आहाराचा आधार
घेणे ही सुटका वाटते त्या अस्वस्थेपासून मन भरकटवण्यासाठी! त्याला भावनिक आहार म्हटले
जाते.
म्हणूनच मानसिक आरोग्याची काळजी घेताना आपण जशी
आपल्या पहिल्या मेंदूची काळजी ध्यान, सकारात्मक विचार आणि आनंदी वृत्ती जोपासून
करतो त्याच प्रमाणे आपल्या दुसर्या मेंदूची म्हणजे जठराची हि काळजी घेणे तितकेच
आवश्यक आहे. आपल्या समोरील ताटात असे काय गोष्टी आपण घेतल्यात जेणेकरून त्याचा
जठराला उपयोग होएइल व पर्यायाने मानसिक आरोग्याला हि फायदा होईल हि जागरूकता
निर्माण झाली पाहिजे आणि म्हणूनच आपल्या अन्नाच्या ताटातील घटक सजगतेने निवडले
पाहिजे! वैद्यकीय क्षेत्रात जिवनमानपद्धतीनुसार निर्माण होऱ्या आजाराची तीन कारणे
सांगितली जातात ; घाई (hurry), चिंता(worry) आणि
मसालेदार अन्न (curry). पहिल्या दोन कारणाबाबत तर आपण
जागरूक झालोच आहोत. आता तिसरे महत्वाचे जे कारण आहे, त्याबाबत पण जागरूक होवुया!
हिप्पोक्रेटस ने हजारो वर्षापूर्वी
म्हटले आहे कि “अन्न हेच तुमचे औषध असू द्या आणि औषध हे तुमचे अन्नच असू द्या!”
रोहिणी फुलपगार
मानसोपचारतज्ज्ञ
904968842
