७-७-७ नियम: मुलांच्या मनाशी जोडणारा जादुई फॉर्मुला!
मुले लहान असो, किंडरगार्डन ला जाणारे असो प्रायमरी स्कूल अथवा कॉलेज ला जाणारे असो , सगळ्या वयातील मुलांच्या पालकांना पडलेला कॉमन प्रश्न
, मुलांशी कसे वागू ? पालकत्वाच्या जबाबदारीने तणावात जाणारे फक्त तुम्ही एकच पालक नाही आहेत, असे अनेक पालक आहेत कि ज्यांना हा स्ट्रेस आहे . आपण
काही अगदी सुरुवातीपासूनच पालक नसतो! आपल्या मुलांच्या जन्माबरोबरच आपलाही पालक म्हणून
जन्म झालेला असतो! पालक म्हणून काहीही
अनुभव नसताना आपली ही वाटचाल ट्रायल आणि एरर्स मधूनच होत असते.
कोणत्याच टप्प्यावर आपण एक परफेक्ट आणि आदर्श पालक म्हणून प्रस्थापित आहोत असे
म्हणू शकत नाही. आपण पाल्य असताना जे पालकत्व पाहिलेले असते, अनुभवलेले असते त्याच
गोष्टी आपण पालक झाल्यावर आपल्या मुलांना देतो.
पण पालकत्व म्हणजे फक्त मुलांना वाढवणे आणि त्यांच्या
गरजा पूर्ण करणे नाही तर त्यांच्या मनाशी आणि भावनांशी नातं विणण्याची एक सुंदर
प्रक्रिया आहे, त्यातून आपली सुद्धा एक सकारात्मक पालक म्हणून जडणघडण होत असते. ह्या प्रवासात आपण वेगेवगळ्या प्रकारच्या पालकत्वाच्या पद्धती शोधत असतो
जेणे करून आपल्या मुलाला आपल्याकडून निरोगी आणि आनंदमय बालपण मिळू शकेल.
आपले मूल आणि आपल्यात एक निरोगी आणि सहज,सकारात्मक बंध निर्माण होण्यासाठी योग्य पालकत्वाच्या अनेक पद्धतीपैकी एक पद्धत म्हणजे 7-7-7 चा नियम !
7-7-7 चा नियम म्हणजे काय आणि त्याची सकारात्मक पालकत्वात कशी मदत होते ते आपण ह्या आर्टिकल मधून पाहुयात!
7-7-7 चा नियम हा वैज्ञानिक दृष्टया सादर केलेला पालकत्वाच्या अनेक धोरणांचा गाभा आहे. मुलांना मुद्दाम वेळ देणे आणि त्यांच्याकडे गुणवत्तापूर्ण लक्ष देणे हे आपल्यातील आणि आपल्या मुलांमधील भावबंधन मजबूत करण्यास किती महत्वाचे आहे ह्यावर हा नियम प्रकाश टाकतो
! प्रत्येक कुटुंब आणि त्या त्या कुटुंबातील मुलांची तऱ्हा वेगळी असते त्यामुळे पालकत्वाचे सगळे उपाय सगळ्यांना लागू होतीलच असे नाही पण
7-7-7 हा नियम सगळ्या पालकत्वाच्या उपायांमध्ये लागू होतो.
7-7-7 पालकत्वाच्या
नियमाचे तीन आधारस्तंभ
हा नियम आपले आणि आपल्या पाल्यामधील नाते सकारत्मक आणि सहज करण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या मानतो आणि तेच ह्याचे आधारस्तंभ आहेत, ते म्हणजे आपले आपल्या मुलाशी कनेक्टड असणे , आपले त्याच्याकडे अटेन्शन असणे , आणि त्याच्या आणि आपल्या नात्याबद्द्दल रिफ्लेक्ट होणे ! कनेक्टेड , अटेन्शन आणि रिफ्लेक्शन हे महत्वाचे घटक आहेत
! हे घटक पालकत्वाचा समग्र दृष्टिकोन विकसित करतात.
पहिले 7 मिनिट्स: कनेक्टेड होण्याचे
पहिले 7 मिनिट्स हे सकाळी द्यायचे असतात.
सर्वसाधारणपणे सकाळ सगळ्यांकडे गडबडीची वेळ असते , अनेक कामे हातावेगळी करायची असतात , आणि ह्या महत्वाच्या वेळी आपण आपल्या मुलांना घाई करून रुटीन मध्ये बसवत असतो
. पण सकाळचे पहिले 7 मिन आपण मुलांना देणे आणि त्याच्यासोबत सजगतेने हजर राहणे महत्वाचे असते . ह्यात फार काही मोठ्या गोष्टी करायच्या नसतात
,तर साधे त्यांना एक प्रेमळ आणि स्मितहास्याचा कटाक्ष देणे , त्यांचे आवरताना त्यांच्या मागे न लागता त्यांच्या सोबत राहणे जसे कि दूध पिताना आवर पटकन उशीर होतोय असे म्हणण्याऐवजी मूल दूध पिताना त्याच्या सोबत बसने
,ह्याला खूप वेळ जात नाही . मोठी मुले असतील तर सकाळी त्यांच्यासोबत अभ्यास ,करिअर ,अपेक्षा ,जबाबदारी ह्यावर न बोलता आवड , रुची , मैत्री
, इच्छा, त्याचे स्वप्न ह्यावर बोलणे.
तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न केले तरी हि सकाळचे हे 7 मिनिटे सुरुवातीला कठीण जाऊ शकतात, आपण खूप वेळा, तू नेहमीच उशीर करते/ करतो, तुझे नेहमीचेच आहे,
मला पण पुढे तुझ्यामुळे धावपळ होते, तुंला कळत नाही ,मुद्दाम असे वागतो/ वागते
अश्या वाक्यांनी जर सकाळची सुरुवात होत असेल तर आपली मुले आपल्याशी कसा संवाद
साधणार? ती पण ह्या रुटीनचा एक भाग बनून जातात. मुलांना सकाळी उठायला आवडता नाही,
ते कंटाळा करतात किंवा तुमच्या प्रयत्नांना प्रतिकार हि करू शकतात. अश्यावेळी तुम्हाला सहानुभूतीने आणि समजूतदारपणाने ह्या रुटीन मध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. ह्यात आपण नाविन्यपूर्ण काय अजून करू शकतो ज्याने आपले
पाल्य आपल्याशी कनेक्टेड होईल हे पालकांसाठी पण आव्हानात्मक टास्क आहे
दुसरे 7 मिनिट्स: संपूर्णपणे अटेन्शन देण्याचे
पूर्ण दिवसभराच्या वेगवगेळ्या ऍक्टिव्हीटी मधून जाऊन तुमचे मूल जेव्हा शाळेतून किंवा कॉलेज अथवा बाहेरून मधून घरी येते तेव्हा तुमच्याकडून त्याच्याकडे तुमचे लक्ष असण्याची आणि समजूतदारपणाची त्याची मागणी असते
. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे 7 मिनिटे संपूर्ण लक्ष देता तेव्हा त्याच्यामध्ये सुरक्षितता आणि आत्म- सन्मानाची भावना विकसित व्हायला लागते. ह्या वेळेत मोबाईल फोन, टी.व्ही.
किंवा इतर काही न करता मुलांबरोबर नजरेला नजर देऊन त्यांचे अनुभव ऐकताना सक्रिय ऐकावे . ऐकताना आपल्या प्रतिसाद द्यावा. जेव्हा तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आणि योग्य प्रतिसाद देऊन त्यांचे अनुभव ऐकता तेव्हा आपल्या भावना आणि विचारांना महत्व दिले जाते ह्या कल्पनेने त्यांच्यात एक आत्म सन्मान निर्माण होऊन ते तुमच्याशी जोडले जातात.
शेवटचे 7 मिनिट्स: अर्थपूर्ण रिफ्लेक्शनचे
दिवस संपतानाची आपल्या मुलाबरोबर घालवलेले हे 7 मिनिटे आपल्या मुलांबरोबर एक
सकारात्मक बंध निर्माण करण्यात अत्यंत महत्वाचे ठरतात. ह्यात सुद्धा खूप काही
करायचे नसते, साध्या साध्या गोष्टीना आपल्या नेहमीच्या रुटीन मध्ये सामावेश करायचा
असतो. झोपण्याआधी आपल्या मुलांबरोबर शतपावली करणे, एखाद्या मुद्द्याची चर्चा करणे,
किंवा दीर्घ श्वसनाचा सराव करणे, एकत्र किचन आवरणे ह्या साध्या गोष्टी आपण शेवटचे
7 मिनिटे करू शकतो. अश्या वेळी मुलांशी बोलताना त्यांची भावनिक बुद्धिमत्तेला
चालना मिळेल असे प्रश्न असावेत जसे कि आजच्या दिवसातील तुझा सर्वोत्तम वेळ कसा
गेला? उद्याच्या दिवसाकडे तू का बघतोय /बघतेय? काय अपेक्षित आहे उद्या स्वतःकडून?
आज जेव्हा काही वेळा तुझ्या अपेक्षेवेगळे घडले तेव्हा तुला काय जाणवले? असे प्रश्न
मुलांना अंतर्मुख होवून विचार करायला भाग पाडतात
आणि त्यांची समज वाढवतात. दिवसाचा शेवट हा सकारात्मक व्हावा, दिवसभरातील
सकारात्मक गोष्टीना प्राधान्य देवून कृतज्ञता व्यक्त केली जावी, ही कृतज्ञता
एकमेकांशी बोलण्यात व्यक्त व्हावी किंवा जर्नल मध्ये लिहावी. हि प्रक्टिस आपल्या
मुलांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन वाढण्यास आणि पर्यायाने भावनिक स्वास्थ
सांभाळण्यास मदतगार ठरते.
7-7-7 चा नियम ह्यावर अनेक संशोधने
पण झाली आहेत ज्यांचा निष्कर्ष सांगतो कि ह्या नियमामध्ये सातत्य ठेवले आणि
विचारपूर्वक हा नियम आमलात आणला तर पाल्य
आणि पालकांमध्ये सकरात्मक आणि आनंदाचा बंध निर्माण होत, हे सातत्यपूर्ण रुटीन किचकट
शिस्त वाटत नाही. पालक आणि मुलांमधील संवाद अधिक उबदार आणि विश्वासार्ह होतो.पालकांमध्ये
आपण मुलाला वेळ देत नाही हि अपराधाची भावना कमी होते. मुलांमध्ये सुरक्षिततेची आणि स्थिरतेची जाणीव
निर्माण होवून आत्मविश्वास आणि भावनिक स्थैर्य वाढते, जे पुढील आयुष्यासाठी
महत्वाची ठरते. ह्यामध्ये पालकांचे सातत्य महत्वाचे ठरते. ह्यात महत्वाचे म्हणजे ह्या सात
मिनिटांची वेळ निश्चित करा व सातत्य ठेवा. ह्या वेळेत मोबाईल, टी.व्ही. व इतर कामाकडे
दुर्लक्ष करा, जर एखाद्या दिवशी शक्य नसेल तर दुसर्या दिवशी पुन्हा सुरुवात करा. लक्षात
ठेवा मिनिटांचा आकडा नव्हे तर आपली उपस्थिती आणि प्रेम महत्वाचे आहे.
पालकत्व हे मोठ्या शब्दांचे नाहीतर छोट्या क्षणांचे
कलेडोस्कोप आहे, मुलांच्या आठवणीत राहतात आपले “क्षण”,आपले “ऐकणे”
आपली “उपस्थिती”.
सकाळचे सात
क्षण-प्रेमाचा उगम, दुपारचे सात क्षण -ऐकण्याचं
आसमंत, रात्रीचे सात क्षण – नात्याचे आभाळ. हीच तर जादू आहे 7-7-7 नियमाची, जी वेळ
नव्हे तर भावनांचे जाळे विणते. आज पासून
दररोज फक्त 21 मिनिटे द्या आणि पहा कसं तुमचे मुल फुलते,बहरते!
