भावनांच्या ग्रे शेड्स.. ( Series..) भाग 3 “चिंता आणि काळजी ( Anxiety & Concern) ..!

TheMindTalks
7

चिंता आणि काळजी (Anxiety & Concern)

आपण या सिरीज मध्ये एकानंतर एक भावनांबद्दल विचार करणार आहोत ..! 

...तुम्हाला काय वाटते ते नेहमी प्रमाणे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा .. !  

...

"भावनांच्या ग्रे शेड्स" (सिरीज - भाग 3मध्ये तुमचे स्वागत आहे ...

तुम्ही व्हाट्सअप, फेसबुक, झूम मिटींग्स, फोन करून दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद .. त्यामुळे आता पुढील दिशा ठरवून वाटचाल करूयात .. तर भाग तीन मी त्या दृष्टीने पुन्हा लिहून काढले .. 

आपण मागील भागात आपल्या भावनांची उगमस्थाने पाहिलेत.. .. तर आता आपण ह्या भावना बघूया :

चिंता(anxiety) आणि काळजी (concern)

"माझ्या समोर येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मला आणि माझ्या जिवलगांना काहीतरी धोका उद्भवू शकतोमाझ्या आजूबाजूच्या वातावरणाला कि ज्यामध्ये मी स्वतःला सुरक्षित कम्फर्टेबल ठेवतोय त्यालाहि धोका होऊ शकतो अशी सतत एक काल्पनिक संकटाची भीती वाटत असते."

ज्यावेळी आपण आपल्या प्रतिकूल वा समोर आलेल्या प्रसंगाचे अवलोकन करून निष्कर्ष काढतो त्यावेळी आपल्याला चिंता हि हानिकारक नकारात्मक भावना आणि काळजी हि उपयुक्त नकारात्मक भावना अश्या दोन्ही प्रकारच्या भावना निर्माण होतात..!

ज्याप्रकारचे आपले निष्कर्ष ठळक असतात ती भावना प्रभावी ठरते .

जेव्हा आपण त्या काल्पनिक धोक्याचेभीतीच्या शक्यतेचे अवास्तव आणि  अवाढव्य चित्रण आपल्या विचारात ,मनात करतो आणि त्या धोक्याच्या पुढे स्वतःला अगदी नगण्य समजतोमी त्या संकटाला सामोरे जाऊच शकणार नाहीतोंड देऊ शकत नाहीमी त्याचे परिणाम सहन करू शकत नाहीमी कोलमडून पडेल असे नकारात्मक चित्रण करतो त्यावेळी आपण "चिंता " ह्या हानिकारक नकारात्मक भावनेच्या अधीन असतो . 

यात आपण सतत त्या काल्पनिक संकटाचा ,धोक्याचा विचार करत राहतो . तिला इतके भव्यदिव्य केलेले असते कि आपले वास्तवाकडे दुर्लक्ष होते आणि आपण आपले स्वतःचे जे काही संकटावर मात करायचे मार्ग असतात ते बंद करून आपण फक्त चिंता करण्यात गुरफटून जातो .सतत त्याचाच विचार करत असतो .

अश्या प्रकारचे विचार मग आपले वर्तन पण ठरवतात . आपण त्या काल्पनिक संकटापासून कसा पळ  काढता येईल किंवा ज्यामुळे असा धोका निर्माण होण्याची शक्यता वाटते असे प्रसंग टाळता येईल ह्याचा  अतर्कसंगत विचार करून वागायला लागतो !

उदा. 

जर एखाद्याला जास्त माणसामध्ये बोलण्याची भीती वाटत असेलआपण व्यवस्थित बोलू शकणार नाहीमध्येच अडखळू, बोबडी वळेलविसरून जाऊ अशी भीती असेल ती व्यक्ती छोटे मोठे समारंभ, भाषणे, सभा टाळण्यावर  भर देत असते .

तसेच ज्या गोष्टीची भीती वाटते ती खरी नाही हे इतर लोकांकडून सतत खात्री करून घेत असते .

उदा ज्या व्यक्तीला आपल्याला सतत काही आजार झाला आहे हि भीती वाटत  असते ती व्यक्ती नेहमी वेगवेगळे डॉक्टर्सनातेवाईकमित्रह्यांच्याकडून आपल्याला काही झाले नाही ह्याची खात्री करून घेत असतातवेगेवेगळ्या तपासण्या करून समाधान करून घेतात .

आता आपण दुसरी बाजू बघू या :

ज्यावेळी आपण समोर ठाकलेल्या प्रसंगामुळे  काल्पनिक भीतीचा ,संकटाचा विचार करतो, पण त्याचे अवास्तव आणि अवाढव्य चित्रण करता त्याच्या शक्य अशक्यतेचा  विचार करतो, जी भीती वाटत आहे ती कितपत खरी आहे ह्याचा सारासार विचार करू लागतोतसेच येणाऱ्या संभाव्य धोक्याला समोर जाताना आपण काय काय उपाय करू शकतो ह्याचा आराखडा मनात बांधू लागतो, तेव्हा आपण "काळजी" हि  उपयुक्त नकारात्मक भावना अनुभवत असतो .

ह्यामुळे आपण आपली काय बलस्थानेस्ट्रेंग्थ आहेतकाय कमकुवत बाजू आहेत ह्याचा अंदाज घेऊन त्यानुसार कृती करण्याचे प्लॅन आखू शकतो.!

उदा

एखादा मुलगा इंटरव्हू ला चालला आहे, बस स्टॉप वर आला वेळेवर येणारी बस आली नाहीत्याच्या हातात तास आहेत पण तरी हि बस आल्यामुळे त्याची विचारसाखळी सुरु होते, 

1. बाप रे ,जर मी वेळेवर नाही पोहोचू शकलो तर ! माझा नंबर येऊन जाईल का

2. माझ्या आगोदर कितीतरी हुशार लोकांचा इंटरव्यू झाला असेल.?

3. बहुतेकांची माझ्यापेक्षा जास्त तयारी असेल .. माझे सिलेक्शन नाही झाले तर मी काय करू ?

4. जर बस नाही आली तर मी जाणारच नाहीखूपच टेन्शन आलेय

5. जाऊ दे... मी देवाचे नाव घेत राहतो बस येईपर्यंत !’ 

अश्या पद्धतीने तो मुलगा अतिशय चिंतेत जात असल्याने असे परिस्थितीला अतिरंजित करून त्यापासून पळ  काढायला पण तयार होतो तसेच  त्या विचारांपासून सुटका करण्यासाठी मूळ प्रश्नावर फोकस करता दुसरे मार्ग अवलंबतोय.!

 " चिंता " ह्या हानिकारक नकारात्मक भावनेमध्ये  असतो तेव्हा आपण फक्त स्वतःला त्रासदायक ठरणाऱ्या विचारांमध्ये गुरफटून जातो आणि बाहेर पाडण्याचे मार्ग बंद करतो पण तेच जेव्हा आपण "काळजी " ह्या उपयुक्त नकारात्मक भावनेमध्ये असतो तेव्हा आपण विचारांसोबत योग्य त्या कृतींवर हि भर देत असतो .ह्यावेळी आपण कोणतीही गोष्ट टाळण्याकडे भर देता सामोरे जाण्याचे ठरवत असतो !

 ...

----------

….क्रमश…

---------- 

पुढील चौथ्या भागात आपण पाहुयात  “नैराश्य आणि  नाराजी (depression  & Sadness)..”

... नैराश्य ही हानिकारक नकारात्मक भावना आणि नाराजी ही उपयुक्त नकारात्मक भावना

म्हणजे नक्की काय….??? ते कसे ओळखावे व त्याचा आपल्या हितासाठी वापर कसा करून घ्यावा ..    

धन्यवाद..!!


भाग २  - उपयुक्त नकारात्मक भावना म्हणजेच Helpful Negative Emotions.!  जाणून घेण्यासाठी दुसरा भाग इथे वाचा :-


Rohini Phulpagar

Clinical Psychologist

www.GetHealthyMind.in

-

Post a Comment

7Comments

Post a Comment