स्वतःला हानी पोहोचविणाऱ्या भावना कशा टाळाव्यात...?

TheMindTalks
0

हानी पोहोचविणाऱ्या भावना व त्याचे परिणाम दीर्घकाळ राहतात. 

Self Destructive Thoughts


आपल्या मनात आपण नकळात नकारात्मक विचारांचे बीज पेरत जातो 

त्यानुसार मग:
राग, 
मत्सर, 
द्वेष, 
हेवेदावे, 
सूडाची भावना, 
आपला गर्व आणि दुराभिमान, 
दुसऱ्याना तुच्छ मानणे 

ह्या सगळ्या नकारात्मक आणि स्वतःला हानिकारक भावनांची उपज मनात होते. ह्या हानिकारक भावना जरी त्या त्या वेळी योग्य वाटत असल्या तरी तीचे परिणाम ही दीर्घकाळ टिकून राहतात.

आपण आणखीन एक उदाहरण पाहुयात:


रमेश ने त्याच्या मित्राचा - रविचा असूया आणि द्वेषापोटी भर ऑफिस मध्ये पाणउतारा केला. त्याचे काही सीक्रेट गुपित सर्वांसमोर सांगितले !! 

रवीचे पडलेले तोंड बघून रमेशला काहीकाळ मन:सुख मिळाले हे जास्त काळ  टिकून राहणार नाही, 
पण त्याचे झालेले नुकसान पहा :

  • त्याने रवी सारखा मित्र गमावला,
  • ऑफिस मध्ये रमेश बद्दल लोकांचे मत बदलले, 
  • रमेश हा व्यक्ति विश्वास ठेवण्याचा लायकीचा नाही असा समज होवून लोकानी त्याच्यापासून हळूहळू अंतर वाढवले. 
  • फक्त खुशमस्करी करणारे लोकच त्याच्या आजूबाजूला राहिले. 
  • त्याचे आर्थिक नुकसान ही झाले नि तो कामावर फोकस करू शकला नाही . 
  • त्याच्यावर नवीन जबाबदारी द्यायला वरिष्ठ टाळू लागले. 
  • तोंडावर गोड बोलणारे पण काही काळाने बाजुला गेले 
  • पुढे तो ऑफिस मध्ये एकटा पडला. 
एकप्रकारे त्याने नरक तयार केला स्वतःसाठी. 

आता या गोष्टीची स्वर्ग म्हणजे चांगली बाजू पाहुयात !


जेव्हा आपण आपल्या मनात सकारात्मकतेचे बीज पेरत जातो तेव्हा :-
आनंद, 
सुख, 
अपेक्षाविराहित इच्छा, 
कृतज्ञता, 
मैत्री, 
क्षमा आणि मुदिता (दुसऱ्याचा आनंद बघून स्वतःला ही तेवढाच आनंद होणे) 

ह्या उपयोगी आणि चांगल्या भावनांची मनात उपज होते.

जसे रमेश ने केलेल्या अपमानाने रवीला थोडा वेळ वाइट वाटले, पण त्याने त्या प्रसंगाला जास्त वेळ मनात रेंगाळू दिले नाही . रमेशला क्षमा केली आणि स्वतः ह्या नकारात्मकतेतून बाहेर पडला . 

लोकानी आपल्या मनासारखे असावे ही अपेक्षा सोडून देवून संगळ्यांशी मैत्रीपूर्ण वागणे चालूच ठेवले . त्यामुळे त्याचा स्वतःच्या कामावर फोकस राहीला, मैत्रीपूर्ण वागण्याने सहकारी अधिक जवळ आले, अजून नवीन आव्हाने स्वीकारल्यामुळे नोकरीत प्रगती झाली. 

मनातून तो समाधानी राहिल्याने त्याचा चांगला प्रभाव आजूबाजूला दिसू लागला. अशाप्रकारे त्याने स्वतःसाठी स्वर्ग तयार केला.

इथे दोघेही आपण निर्माण केलेल्या परिस्थितिला  बदलू ही शकत होते, रमेश ने  त्याच्या मनातील रवीबद्दलची द्वेषाच्या भावनेला मैत्री भावनेत बदलले असते तर त्याचे भावनिक आणि सामाजिक नुकसान टाळता आले असते. मत्सरपूर्ण विचाराना समाधानी विचारात बदलले असते तर तो सुद्धा त्याच्यासाठी एक स्वर्ग निर्माण करू शकला असता ! 

रवी ने जर रमेश ल क्षमा नसती केली नि त्याचा सूड घेण्याच्या विचारात असता तर तो  चिडचिडा, रागीट बनला असता ,कामावर लक्ष नसते , नवीन आव्हाने पेलू शकला नसता आणि आपल्यासाठी तो सुद्धा एक नरक निर्माण करू शकला असता !

निवड आपल्याला करायची असते ! असे कितीतरी प्रसंग आपल्या दैनंदिन वैयक्तिक, सामाजिक , व्यावसायिक आयुष्यात येत असतात की जिथे आपण आपल्यासाठी काय निर्माण करायचे ह्याची निवड सर्वस्वी आपल्याकडेच असते . 

पण आपण आपल्या आतमध्ये काय चालू आहे हयाबद्दल सजग आणि जागरूक नसू तर आपल्याला आपण स्वतःसाठी स्वर्ग निवडतोय की नरक निवडतोय ह्याची जाणीव ही होत नाही . मग स्वर्ग निवडायच्या , आयुष्य आनंदांनी जगायच्या कितीतरी संधि सोडून देवून आपण स्वतःसाठी नरक निर्माण करत राहतो नि त्यात गुरफटून घेतो.

तर मित्रांनो, 
या दोन भागातून आपल्याला काय समजले आम्हाला नक्की कळवा!!!

भाग 1 येथे वाचायला मिळेल:-


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)