भावनांच्या ग्रे शेड्स.. ( Series..) भाग 4 नैराश्य आणि नाराजी (Depression & Sadness)!

TheMindTalks
4


नैराश्य आणि नाराजी(Depression & Sadness)


आपण या सिरीज मध्ये एकानंतर एक भावनांबद्दल विचार करणार आहोत .. 
...तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा .. ! 

"भावनांच्या ग्रे शेड्स" (सिरीज - भाग 4मध्ये तुमचे स्वागत आहे ...

आपण मागील भागातज्याप्रकारचे आपले निष्कर्ष ठळक असतात ती भावना प्रभावी ठरतेपाहिलेत.. .. तर आता आपण ह्या भावना बघूया :

नैराश्य आणि नाराजी (depression & Sadness)       

"ज्यावेळी आपण आपल्या समोर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे आपली काही वैयक्तिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर हानी झालीय वा अपयश आलेय किंवा अयशस्वी ठरलाय, कमी पडलोय असा अर्थ काढतो" 

किंवा 

"आपल्याला सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर आपल्या योग्यते नुसार, पात्रतेनुसार वागणूक मिळत नाही असे वाटते तेव्हा आपण नैराश्य ही हानिकारक नकारात्मक भावना आणि नाराजी हि उपयुक्त नकारात्मक भावना  ह्या दोन्ही नकारात्मक भावना अनुभवत असतो "

 ज्याप्रकारचे आपले निष्कर्ष ठळक असतात ती भावना प्रभावी ठरते .

जेव्हा आपण नैराश्यात जातो, त्यावेळी आपण फक्त आणि फक्त आलेले अपयश, झालेली हानी किंवा दिली गेलेली अपमानास्पद वागणूक यावरच लक्ष केंद्रित करत असतो !

आपण यातून बाहेर पडू शकणार नाही

स्वतः परत उभे राहू शकणार नाही

भविष्यात सर्वत्र अंधार पसरला आहे ...

अश्या प्रकारचे विचार सुरु होतात. ज्यामुळे आपण अयशस्वी झालोय, यश मिळत नाही किंवा हानी झालीय त्या कारणांचा आपल्या नैराश्याशी संबंध जोडत राहतो.  

मग अश्या वेळी आपण काय करतो..???

1. भावनिक रित्या दुसऱ्यांवर अवलंबून राहतो

2. आधार शोधात राहतो किंवा सगळ्यांना टाळतो

आपल्या नशिबावर परिस्थिती आपल्याला अनुकूल कधीच नसते ह्याच रडगाणे सतत स्वतःला आणि इतरांना ऐकवत असतो. कधी कधी ह्या नैराश्यापासून पासून सुटका करून घेण्यासाठी स्वतःला इजा करण्याचा पण प्रयत्न केला जातो

आता दुसरी बाजू बघू या -  

प्रतिकूलतेमुळे नाराजी हि नकारात्मक भावना येते. पण नाराजी मध्ये आपण आपल्या अपयशाबद्दल किंवा झालेल्या हानी बद्दल, मिळत असलेल्या वागणुकीबद्दल दोन्ही बाजूंनी विचार करतो. म्हणजे ह्या परिस्थितीच्या  सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंचा विचार सुरु करत असतो

1. ह्या स्थितीतून आपण बाहेर पडू शकू

2. स्वतःला बाहेर काढू शकू यावर विश्वास ठेवायला लागतो

3. भविष्यात अजूनही संधी निर्माण करू शकू याबद्दल आत्मविश्वास असतो.  

इथे अपयश नाही म्हणून नाराजी पण पूर्णपणे हतबलता नाही म्हणून उपयुक्त भावना !

उदा . एखादा विद्यार्थी महत्वाच्या परीक्षेत सलग वेळा अपयशी ठरला तर ते अपयश तो आपल्या आयुष्याचे  अपयश  समजतो, -

1.  माझ्याकडून काहीच होऊ शकणार नाही,

2. मी हि परीक्षा कधीच पास होणार नाही,

3. मी भविष्यात हि असाच अपयशी राहणार,

4. मला कधीच यश मिळणार नाही,

5. माझे आयुष्य असेच नाकर्तेपणात जाणार .

6. मी बिनकामाचा आहे "

अशी विचारससाखळी सुरु होते आणि मग तो विद्यार्थी परत परीक्षेची तयारी करण्याचे सोडून ह्या विचारांत सतत गुरफटून राहतो किंवा जर त्याला कोणी धीर द्यायला आले तरी स्वतःचे अपयशी असणे घोळवत राहतो हे सगळे तो विद्यार्थी नैराश्यात गेल्यामुळे करत असतो .

नैराश्यामध्ये आपण आपल्या अपयशाच्या हतबलतेच्या कोशात स्वतःला बंदिस्त करून घेतो तर नाराजी मध्ये आपण आपल्या अपयशाचे, हतबलतेचे कारणे शोधून त्यावर कशी मत करता येईल ह्याचा विचार केला जातो.

...

 ….क्रमश…

---------- 

पुढील भागात आपण पाहुयात  

अपराधीपणा आणि पच्छाताप (Guilt & Remorse)

धन्यवाद..!!


चिंता (anxiety) आणि काळजी (concern) म्हणजे काय ते जाणून घेण्यासाठी इथे वाचा

 

Rohini Phulpagar

Clinical Psychologist

www.GetHealthyMind.in

---


Post a Comment

4Comments

Post a Comment