माझ्या समोर एक पंचेचाळीश वर्षाच्या बाई बसल्या होत्या. ज्यांच्याकडून ही केस माझ्याकडे आली होती....
त्यांनी सांगितले कि सध्या चिडचिड जास्त पतीदेवांवर वाढलीय. त्यांच्याबद्दल प्रचंड राग आहेच पण आजकाल सासू किंवा दीर कोणालाही घरात येवू देत नाही . ते कोणी दिसले तरी अतिप्रमाणात राग येवून हिसंक होत आहेत .
त्या बाईंशी बोलल्यावर त्यातून जे उघड झाले कि पंचविशी /तिशीमध्ये पतीकडून, सासरी सासू आणि दीर ह्यांच्याकडून जो मानसिक आणि शरिरिक त्रास झाला तो आता ह्या व्यक्तींना पाहिल्यावर सगळा आठवतो नि मनात प्रचंड राग दाटून येतो.
त्या काळात सगळे सहन करून निभावले, त्यातून बाहेर हि आलेय आता तो सगळा त्रास
नाही. पती चांगले वागतात , सासरी आदर वाढलाय पण तरीसुद्धा ह्या मागच्या घटना आणि
अपमानाचे नि त्रासाचे प्रसंग पुन्हा पुन्हामनात समोर येतात नि मनात
त्यांच्याबद्दल तिरस्कार निर्माण होतो.
अजून एक तिशीतील तरुण आहे त्याची पण गोष्ट अशीच आहे. आधी एका ठिकाणी नोकरी करत असतना त्याने जे टार्गेट पूर्ण केले त्यामुळे त्याला लवकर प्रमोशन मिळाले पण जी व्यक्ती आधी त्यांची वरिष्ठ होती तिच्या बरोबरीने हा तरुण आल्यावर त्याने त्याला खूप मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली.
ह्या त्रासाला कंटाळून
त्याने दुसऱ्या ब्रांचला बदली केली पण तिथे त्याला ह्या वरिष्ठ व्यक्तीच्या त्रास दिलेल्या आठवणी छळत राहिल्या. मग त्याने ती नोकरी सोडून दुसरीकडे नोकरी केली तरीही
आधीच्या नोकरीतील नकोश्या वाटणाऱ्या आठवणी अजूनही त्रास देतात. त्याचा त्याच्या
आत्मविश्वासावर परिणाम व्हायला लागला.
ही जरी प्रातिनिधिक उदाहरणे जरी असली तरी आपण बहुसंख्य माणसे आपल्या आपल्या मनात एक कटू-गोड भूतकाळ जिवंत ठेवूनच जगत असतो.
तो भूतकाळ काही
वेळा आनंददायी आठवणींचा असतो, त्यातील एक जरी आठवणीमध्ये डोकावले तरी आपले मन आणि ती
वेळ प्रसन्नतेने भरून निघते . पण जास्त वेळा हा
भूतकाळ कटू घटनांचा आणि आठवणींचा असतो . आणि मजेची बाब म्हणजे कटू भूतकाळात
डोकवायची गरज नसते,ते स्वतःहून मनाच्या वरच्या पातळीवर आठवणी आणून ठेवतात .
आपण भूतकाळात वारंवार डोकावणे थांबवू शकत नाही किंवा भूतकाळ कधी कधी आपल्यावर एवढा हावी का होत जातो की -
निदा फाझील च्या गझल सारखी आपली अवस्था होत जाते :
हे जे भूतकाळाचे दुखणे आहे त्याचा त्रास सहन करता हि येत नाही आणि त्यापासून लांब जायचे ठरवले तरी जाता हि येत नाही अशी अवस्था असते . जे आयुष्यातून एकदा संपून गेलेय ते एकदाचे निघून का जात नाही ? ह्या प्रश्नाच्या वावटळीत आपलं मन भरकटत राहते.
का होते असे?
यावर उपाय काय? पाहुयात पुढील भागात...!!
..
ही जाणीव ही मनातला भूतकाळ विसरू देत नाही... - भाग 2
अजून एक महत्वाची पोस्ट
येथे वाचा - काय असतो परीक्षेचा तणाव ?