सोशल मीडिया फोमोसाठी कारणीभूत ?? जाणून घ्या काय असते मानसिकता !!!

TheMindTalks
0

फोमो फक्त सोशल मीडिया पर्यन्त सीमित नाही.. 

FOMO Psychology

जिथे जिथे आपण समूहापासून वेगळे पडू. एकटे पडू ही भीती असते तिथे फोमो असते. 

कौटुंबिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम किंवा व्यावसायिक कार्यक्रम जिथे आपल्याला डावलले गेलेय आणि आपण नसलो तरी बाकीचे लोक व्यवस्थित आनंद घेत आहेत, जगत आहेत आपले तिथे नसणे कोणाच्याही लक्षात येत नाही अश्या जाणिवेने सुद्धा व्यक्तीची हरवून जाण्याची भीती तीव्र होते .

फोमो जास्त सोशल मीडिया बाबत का निर्माण होते हे समजण्यासाठी इनस्टाग्राम, व्हाटसअप ,फेसबूक सारखे जास्त वापरले जाणारे सोशल प्लॅटफॉर्म किती पॉवरफूल आहेत हे कळून घेतले पाहिजे . 

जेव्हा आपण एखादी पोस्ट पाहतो की जी आपल्याला आनंद देते किंवा आपल्या पोस्ट वर आलेल्या लाईक्स आणि कमेंट ने आपल्याला आनंद होतो तेव्हा आपल्या मेंदुमधील डोपामीन नावाचे हॉर्मोन स्त्रवते आणि ते मेंदूतील बक्षीस प्रणालीला कार्यरत करते. 

सोशल मीडिया वर पोस्ट टाकत राहणे आणि त्यामुळे मिळणारे लाईक्स आणि कमेंट आपली बक्षीस प्रणाली मजबूत करत जाते ,पुनःपुन्हा तो अनुभव, त्या भावना अनुभव्याश्या वाटू लागतात. आपण त्या सारख्या शोधत राहतो. 

ह्या सगळ्यामागे व्यक्तीची इतरांकडून प्रसंशेची, मान्यतेची , आपुलकीच्या भावनेची गरज लपलेली असते. आणि ती जेव्हा मिळायची कमी होते किंवा मिळत नाही असे व्यक्तीला जाणवते तेव्हा तिथे फोमो उद्भवते .

फोमो ला कसे हरवायचे दुसऱ्या शब्दात हरवून जाण्याच्या भीतीला कसे हरवायचे ?

त्यासाठी जोमो (जॉय ऑफ मिसिंग आउट ) ला जवळ करायचे .

जोमो म्हणजे हरवून जाण्याचा आनंद

या सर्व गोष्टींपासून मुद्दाम स्वतःला लपवायचे, हरवून टाकायचे आणि सगळ्यापासून लुप्त झाल्याचा आनंद उपभोगायचा.

जोमो आपल्याला माहिती आणि नोटिफिकेशन च्या अखंड स्त्रोत की जो आपल्या मनाला खूप थकवत असतो त्यापासून सुटका देतो. 

जोमो मुळे आपल्याकडे आता जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता निर्माण होते. 

जेव्हा आपण फोमो ची शिकार असतो तेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे, पोकळी आहे असे मानून ती पोकळी भरून काढण्यासाठी धडपडत राहतो तेच जर आपण जोमोला स्वीकारतो तेव्हा आपल्याकडे जे आहे त्याचे कौतुक करतो त्यासाठी आभारी असतो, आयुष्यातील रिकामेपण, पोकळी जाणवत नाही. 

ह्यासाठीच लुप्त होण्याचा, हरवून जाण्यातील आनंद खऱ्या अर्थाने घ्यायचा.

त्यासाठी काय नियम फॉलो करायचे ? 
आणि स्वत: मध्ये काय सोपे सोपे बदल करायचे काय सवयी निर्माण करायच्या  हे पुढे महत्वाच्या भागात पाहुयात !!!

.... 

ईथवर जर तुम्हाला व्यवस्थित समजले असेल तर आपल्या व्हाटसअप कम्यूनिटी ग्रुप वर आत्ताच सामील व्हा !!!!

आपण शिकुयात आणि आपल्या प्रियजनांनाही समृद्ध करूयात!! 

मन स्ट्रॉंग तर शरीर स्ट्रॉंग!!ही लिंक प्रत्येकाने शेअर करावी!!! 

https://chat.whatsapp.com/IXmXAXe6iDRCV73LqnFHs1


इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे च्या निमित्ताने आधी पेड असलेले परंतु आता सर्वांना मोफत भेट:- 

- सिरीज चे सर्व भाग येथे पहा !!

इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे - मोफत सिरीज - भाग 1

इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे - मोफत सिरीज - भाग 2

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)