नार्सीसीझम हा विस्कळीत व्यक्तिमत्वाच्या गटातील ...

TheMindTalks
0

एक भावनिक आणि उतावीळ व्यक्तिमत्वाचा एक प्रकार आहे. 

Self-centric Personality

नार्सीसीझम वा आत्मप्रीतीवाद व्यक्तिमत्व असलेली माणसे इतकी आत्मकेंद्रीत असतात की आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्या सुद्धा काही गरजा असतात हेच ते
  विसरून जातात. 

आत्मप्रीती अथवा नारसिस्टिक हा एक स्वभावगुण ही असतो; आपण प्रत्येकजण प्रसंगी काही वेळा आत्मप्रीतीदर्शक गुणधर्म दाखवत असतो पण ज्यांच्या व्यक्तिमत्वच नारसिस्टिक आहे ते इतरांकडे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या भावनाकडे दुर्लक्ष करतात. 

आपल्या वर्तनाचा अथवा वागणुकीचा इतरांवर काय परिणाम होतोय त्याचे त्यांना काही सोयरसूतक नसते. अश्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्ति मोहक, मादक आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या कल्पनानी पछाडलेले असतात. 

ह्यांच्यामध्ये स्वतःला टोकाचे महत्व देणे ,स्वतःला सतत सगळी  खास आणि अनुकूल वागणूक मिळण्याची अपेक्षा ,सतत इतर लोकानी त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज , आत्मसन्मानाची हिन भावना, सहानुभूतीचा अभाव नि इतरांची काळजी नसणे हे स्वभाववैशिष्ट्ये पण आढळतात. 

नार्सिसिझम पर्सनॅलिटी डिसऑर्डर ही एक मानसिक आरोग स्थिती आहे ज्यामध्ये लोकांना स्वतःच्या महत्त्वाबद्दल अतिशयोक्ती समज असते. त्यांना अती जास्त लक्ष देण्याची गरज आणि इच्छा असते, तसेच लोकांनी त्यांचे कौतुक करावे अशी अपेक्षा असते...

त्याचे गंभीर परिणाम कसे होतात ते पाहुयात ... !

या आधीचा भाग येथे पहा :

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)