स्वर्ग आणि नर्क पाहायचा आहे?

TheMindTalks
0

एकदा एक पराक्रमी शूरयोद्धा ... 

What is Heaven and Hell?


असा तो राजा एका झेन साधू कडे गेला की जे त्याच्या ध्यानमग्न अवस्थेमध्ये ध्यान करत होते.
एकदम उद्धट आणि रागीट आवाजात त्याने त्या साधूना विचारले, 

"ओय साधू, मला स्वर्ग आणि नरक म्हणजे काय ते सांग !"

त्या साधुने आपले डोळे शांतपणे  उघडले आणि राजाच्या डोळ्यात थेट बघत म्हणाला की - 

"मी तुझ्यासारख्या उद्धट नि ताळतंत्र नसलेल्या माणसाच्या प्रश्नाला का उत्तर देवू ? 
तुझ्यासारख्या यत्किंचित किडयाला  सांगण्यासारखे काही नाही. चल निघ इथून लगेच!!!
तुझ्यामूर्ख प्रश्नाला उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही."


हे ऐकून त्या पराक्रमी राजाला प्रचंड राग आला, आतापर्यंत त्याचा कोणी इतका अपमान केला नव्हता. 

रागाने लालबुंद होत त्याने म्यानातून तलवार बाहेर काढली नि साधूवर वार करायला उपसली.  

तो साधूवर वार करणार ईतक्यात - 


त्याच्या डोळ्यात आरपार बघत, सुहास्य मुद्रेने साधू उद्गारले, 
"हाच आहे तो नर्क आहे राजन, जो तु शोधीत आहेस!"
.... 
राजा काही क्षण स्तब्ध झाला. अवाकपणे फक्त पहातच राहिला. हातातील तलवार गळून पडली आणि तो एक दगडावर बसला .. 

त्याच्या लक्षात आले की - 

तो पूर्णपणे रागाच्या कह्यात होता. 
त्याच्या मनाने निर्माण केलेला नर्क स्पष्टपणे तो पाहू शकत होता.! 
त्याच्या स्वत: बद्दलच्या अहंकाराने, त्याच्या द्वेषाने, ईतरांबद्दलच्या रागाने तयार केलेला नर्क होता! 
राजाचे डोळे पाण्याने भरले , 

साधुने त्याला वेगळी दृष्टी दिल्याने तो साधू पुढे कृतज्ञतेने नतमस्तक झाला. 

त्या झेन साधुने राजाला उठविले, त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत हळुवार पणे म्हटले ,

"... आणि आता तुला जो अनुभव येतोय ... हा स्वर्ग आहे राजन... स्वर्ग किंवा नर्क हा कुठे ढगांच्या पल्याड अस्तित्वात नाही तर तो आपल्यामध्येच असतो. आपले मन ही अशी जागा आहे की ती नर्क आणि स्वर्ग दोन्ही निर्माण करते आणि जी स्वर्गाचे नरकात आणि नरकाचे स्वर्गात रूपांतर ही करू शकते." 

तर मित्रांनो, 
तुमच्या लक्षात आले असेलच - 

जेव्हा आपण काल्पनिक स्वर्ग आणि नरक हयाबद्दल बोलतो किंवा विचार करतो तेव्हा - 
ज्या गोष्टी कष्टदायक, दु:खदायक, मनाला यातना निर्माण करणाऱ्या आणि हानिकारक म्हणजे ज्यामुळे आपले काही न काही नुकसान होवून आपला तोटा होतो त्या सगळ्या गोष्टी आपण नरकाच्या परड्यात घालतो ... 

आणि 

ज्या  गोष्टी सुखकारक, आल्हाददायक, मनाला प्रसन्नता देणाऱ्या आणि उपयोगी पडून आपला काही न काही फायदा होतो त्या गोष्टी आपण स्वर्गाच्या पारड्यात टाकतो.!!!  

जसे आपल्या मनात नकारात्मक विचारांचे बीज पेरत जातो  त्यानुसार मग राग, मत्सर , द्वेष , हेवेदावे ,सूडाची भावना, आपला गर्व आणि दुराभिमान , दुसऱ्याना तुच्छ मानणे ह्या सगळ्या नकारात्मक आणि स्वतःला हानिकारक भावनांची उपज मनात होते . ह्या हानिकारक भावना जरी  त्या त्या वेळी योग्य वाटत असल्या तरी तीचे परिणाम ही दीर्घकाळ टिकून राहतात. 

पुढील भागात आपण रोजच्या जीवनातील आणखीन एक उदाहरण पाहुयात म्हणजे तुम्हाला समजेल की अशा वेळी आपण काय करायला हवे ते...कारण जेव्हा राग येतो तेव्हा विचार क्षमता काम करणे सोडून देते ..!!! 


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)