बाभळी, मी आणि core beliefs
दुपारी हाँस्पिटल च्या गेट मधुन गाडी बाहेर काढली आणि साधारण 100 मीटर गेले असेल, समोरचे द्रुश्य बघून जागीच गाडी थांबवावी लागली......!!!
समोर चक्क काटेरी बाभूळ होती आणि ती सुंदर नाजूक पिवळ्या फुलांनी आणि कोवळ्या पोपटी लुसलुशीत पानांनी बहरली होती !
दुपारच्या उन्हात ती खूप च मोहक दिसत होती. काही काळ तीला मन भरुन बघितल्या शिवाय पुढे जावेसे वाटेना.... तीला डोळ्यात साठवून गाडी स्टार्ट केली... आणि. आमचे विचार चक्र सुरु झाले.


आतापर्यंत काय मी कधी काटेरी बाभूळ पाहीलीच नव्हती का?
पण हे तिचे रूप मला आठवतच नव्हते...!
लहानपनापासून आई कडून, आजूबाजूच्या मोठ्या ताईंकडून, दादांकडुन, वयस्कर मानसांकडुन हेच ऐकले की बाभळीच्या जवळ जायचे नाही हं... तीचे काटे पसरलेले असतात. ते टोचतात पायाला.. रक्त येते.. खुप. वेदना होतात!!!
आणि बरेच काही...
पण कधी नकळतपणे तर कधी डिंकाच्या आशेने मी जरी बाभळीच्या जवळ गेले असेल तर मला अनेकदा काट्याच्या पण प्रसाद मिळालाय.
" टणक, टोकदार काटे असलेली बाभूळ.."
अशीच तीच्याबद्दल ठाम समजूत(core beliefs) झाली ना माझी!
अशा आपल्या अनेक ठाम समजूती असतात.(core beliefs). आणि हे core beliefs तयार होण्यास आपले संगोपन, संस्कार, लहानपणा पासून आलेले जगाचे आपले अनुभव, आजूबाजूच्या लोकांनी, घरातील माणसांनी मनावर बिंबवलेले काही विचार, हे सगळे घटक हातभार लावतात. ह्या आपल्या ठाम समजुती नुसार (core beliefs) आपले विचारांचे प्रवाह ही तयार होतात..
तर्कसंगत आणि अतर्कसंगत..
Rational and Irrational हे दोन प्रवाह core beliefs मधून निघतात.
जास्त त्रास हा आपल्याला अतर्कसंगत विचार प्रवाहा मुळे होतो(irrational thoughts).बहुतेक भावनिक गुंतावळ (emotional turmoil) पण ह्यानेच तयार होते.
बरं.. हे काय कायम जागृत नसतात तुमच्याकडे. तुमचे core beliefs हे मनात निद्रिस्त अवस्थेत असतात. जणू काही सुप्त ज्वालामुखी..पण ह्याला हवा देणारे कारण घडले की हा होतो ना जागृत ! आणि तो अतर्कसंगत विचार प्रवाह ला activate करतो , चालना देतो त्यामुळे होते काय की अतर्कसंगत (irrational)
प्रवाहावर आधारित negative, नकारात्मक विचारांची मालिकाच तयार होते ना डोक्यात ! आणि मग आपण बरोबर ह्या भावनिक दुष्ट चक्रात अडकतो..
बहुतेक सर्वसामान्य माणसामध्ये खुप वेळा असलेला core belief म्हणजे " जर मी तुमच्या साठी एवढे करतेय/करतोय ,तर समोरच्याने माझ्या point of view ने जगाकडे पाहावे'".
हा आपला core beilfe (ठाम समजूत) मग आपण सगळीकडे लागतो, जोडीदाराला, मुलांना, आई वडील, नातेवाईक, सहकारी, अगदी सोसायटी तील लोकांना पण...
ह्या core beliefs मुळे अतर्कसंगत विचार प्रवाह (irrational thought process) तयार होतो की मी म्हणेल ते दुसऱ्या नी ऐकलं पाहिजे, मी सांगेल तसे वागले पाहिजे.
पण जर का तुमच्या point of view ने जगाकडे पाहायचं नाकारलेच कोणी, तुम्ही म्हणाल तसे वागायला नकार दिला तर लगेच सुप्तावस्थेतील ज्वालामुखी जागा होऊन अतर्कसंगत (irrational) विचारांना आग देतात आणि मग पुढे सगळे इमोशनल रामायण घडते, आणि वर्तणुकीचे महाभारत पण !!!
माझा पण core belief होताच ना की बाभळी ला काटेच असतात आणि अतर्कसंगत विचार सुद्धा की एवढे काटे असणारें काटेदार झाड कधी तरी सुंदर दिसत असेल का?
माझ्या ह्या अतर्कसंगत विचारामुळे माझे तिच्या सौंदर्या कडे कधी लक्षच गेले नाही!
ज्या ज्या वेळी असे इमोशनल वादळ येण्याची वेळ येते ना तेव्हा आपण आपल्या core beliefs ना वेळोवेळी तपासून बघायची गरज आहे आणि तर्कसंगत विचार करण्याची सवय सुद्धा लावली पाहिजे हो की नाही?
मी तर आता माझ्या अतर्कसंगत विचारांना नेहमी घासून, तासून ,पुराव्यावर तावून सुलाखून घेते... म्हणूनच मला बाभळीतले दिसू लागललेय.
रोहिणी फुलपगारClinical psychologist
+91 9604968842