समाधान आणि आनंद

TheMindTalks
0

समाधान आणि आनंद


परवा माझ्या  एका  कलीग अरुणा  ने माझ्याशी बोलताना सांगितले की तिची  एक दूरची चुलत सासू घरी राहण्या साठी येणार होती.
पण ती अरुणा ला अजिबात आवडत नाही!  भूतकाळात त्या सासूच्या वागण्याने आणि बोलण्याने ही खूप दुखावलीय.. त्या घटनेला पण पाच वर्षापेक्षा अधिक काळ लोटलाय पण मी काहीच विसरले नाही किंवा विसरू शकले नाही..मी जेव्हा ह्या सगळ्या बद्दल त्यांना बोलेल तेव्हाच मला समाधान भेटेल!
मी तिला विचारले की आता तुला हे सगळे बोलून कश्याचे समाधान भेटेल? त्यावर तिचे म्हणणे होते की मला जसा त्रास झाला, अपमानास्पद वाटले तसेच त्यांना पण जाणवेल आणि ह्याचे मला समाधान वाटेल!
 मग आनंदाचे काय? तिचा गोंधळलेला चेहरा बघून म्हणाले की अगं तू बोलून रिकामी होशील समाधान मिळेल तुला पण तू आनंदी होशील का? यावर विचार कर मग त्यांच्याशी बोल!
आपण ही जवळपास असेच करत असतो ना! समाधान शोधत असतो पण ते शोधताना आपण आपले सुख, आनन्द हरवून टाकतो.
काय असतो समाधान आणि आनंदातील फरक!
समाधान हे तात्पुरते असते आणि ते बाहेरील गोष्टींवर अवलंबून असते.ते तुम्हाला आनंद देते पण तो आनंद दीर्घकाळ टिकत नाही. समाधानासाठी तुम्हाला अनेक गोष्टींची आवशक्यता असते. मस्त चारी ठाव बासुंदी पुरी चे जेवण समाधान देते आणि समाधानाने येणारा आनंद पण! कोणी आपल्या ला अपमानास्पद बोलले आणि आपण लगेच प्रत्युत्तर दिले तर समाधान मिळते! घर, कार , गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, दागिने  , प्रॉपर्टी हे सगळे आपल्याला समाधान देतात ! आणि आपण एका गोष्टीत समाधानी झालो की लगेच दुसऱ्या गोष्टी च्या मागे लागतो..समाधानाने मिळणारा आनंद हा शॉर्टटर्म असतो तसा नसता तर ह्या गोष्टी नाहीश्या झाल्यावर आपण दुःखी झालो नसतो.
  जिथे समाधानासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज असते तसे आंनदाचे नाही.. आनंद ही आपल्या मनाची अशी अवस्था आहे की ती आतून येते, बाहेर काय परिस्थिती आहे ह्याचे देणेघेणे नसते.   ताटात   बासुंदी पुरीचे जेवण असो वा पिठले भाकरी ,अन्नाचा आनंद घेणाऱ्याला काही फरक पडत नाही.. आपल्याकडे आलेल्या शब्दात आनंद अर्थ, अपमान शोधत नाही. आनंदी राहण्यासाठी मोठे घर,कार, दागदागिने ह्या कश्याची म्हणून गरज नसते. गरज असते त्या तुमच्या आत लपलेल्या किंवा दडवून ठेवलेल्या आनंदी वृत्ती ची! प्रयत्न पूर्वक तिला विकसित करण्याची! आपण कधी कधी म्हणतो ना की एवढ्या दुर्लभ स्थितीतही हा माणूस स्थिर कसा काय? तो स्थिर राहतो कारण तो आतून आनंदी आहे.. आनंद आपल्याला स्थिरता देते तर समाधान आपल्याला अस्थिरता देते! आपण बहुतेक समाधान आणि आनंद यात गल्लत करतो! समाधानआपल्याला आपले पांचेइंद्रिय देतात,जे खूप कमी काळासाठी असते पण आनंद हा आपली वृत्ती आहे जी आपल्यासोबत आयुष्यभरासाठी सोबत करते!
  अरुणा जे मला नंतर बोलली की मी त्यांना बोलेल आणी मला समाधान ही मिळेल पण सुख वा आनंद मिळणार नाही! मी त्यांना दुखावले ही मला टोचणी लागून राहील.. माझा असा स्वभाव नाही ,मी माझ्या
स्वाभाविकतेच्या विरुद्ध वागल्याचे दुःख ही होईल! त्यापेक्षा भूतकाळातील घुडून गेलेल्या घटना आता मी दुरुस्त करू शकत नाही हे समजून त्यांना माफ करावं आणि मी ही आनंदी जगावे ,त्यांना ही आनंदी करावे,हे अगदी बरोबर आहे ना !


रोहिणी फुलपगार
क्लीनिकल सायकॉलॉजीस्ट सायकोथेरपिस्ट
9604968842

www.evergreeneverhappy.blogspot.com

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)