ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स - भाग-1

TheMindTalks
1

ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स (ANTs)

 (भाग-1)

Automatic negative thoughts


 आज सकाळी जरा गडबडीत  हॉस्पिटलमध्ये जायला निघाले,लिफ्ट मधून बाहेर आले तर सोनाली समोरच भेटली.चेहरा उतरला होता तिचा! "काय ग? अशी का सुकलेली दिसतेय !" विचारल्या वर  म्हणाली, ताई बघ ना, लोक अशी कशी वागतात? घरातले पण ! ऑफिस मधले पण ! मला कोणी समजूनच घेत नाही. कुठे काही कमी पडले तर माझ्यामुळे च कसे होते?  मी कशी काय जबाबदार असते सगळ्याला! भावनेच्या वेगात बडबड चालू होती. शेवटी म्हणाली ,विचार करून करून डोक्याला मुंग्या आल्यात !

तिला म्हणाले, ये  संध्याकाळी भेटायला.. तुझ्या डोक्यातील मुंग्यांना औषध करूया!

               खरेच आहे, डोक्याला पण येतात मुंग्या! हातापायाला येतात तश्या! ह्या डोक्याच्या मुंग्या सतत डोक्यात चावत राहतात आणि आपण त्यांना खाद्य पुरवत असतो. ह्यांना डोक्यात प्रवेश कुठून मिळतो ? त्या कोठून बाहेरून येत नाहीत आपल्या विचारामध्येच असतात त्या!
            आपल्या डोक्यात सतत काहीतरी विचार येत असतात. काही विचार आणावे लागत लागत नाही तर ते आपोआप येतात. involuntary असतात म्हणजे ते विचार करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागत नाही म्हणून त्यांना automatic thoughts असे म्हणतात. काही विचार positive असतात . जसे, उद्या कॉलेज मध्ये मी माझी assignment लवकर सबमिट करेल, माझी assignment लवकर पूर्ण झालेली बघून सर खुश होतील. किंवा आज संध्याकाळी मी छान तयार होऊन फिरायला जाईल व ही संध्याकाळ कुटुंबासोबत आनंदाने एन्जॉय करेल , मी परवाच्या कार्यक्रमांत मोरपंखी पैठणी घालेन.., मुलाला डब्यात काहीतरी छान देईल, स्वारी अगदी खुश होईल.. मैत्रिणीचा वाढदिवस तिला सरप्राईज देऊन साजरा करेल.. असेच अनेक विचार की जो विचार आल्यावर तुम्हाला छान वाटते.. एक सकारात्मकता तुमच्यात भरून राहते.
                    काही विचार न्यूट्रल असतात, ते जस्ट येतात आणि जातात. जसे, सलमान खान चा नवीन movie release झालाय! किंवा शेजारच्या फ्लॅट मध्ये खूप दिवस कोणी आले नाही, समोरचे भाडेकरू जास्त बोलत नाही, आज अमुक सीरिअल च्या एपिसोड मध्ये काय दाखवतील!
असे की ज्या विचारामुळे तुमच्या मानसिकतेत काही फरक पडत नाही, ते येतात आणि जातात!

             पण असे ही काही automatic thoughts आहेत की जे एकदा सुरू झाले की तुमची पूर्ण मानसिकता व्यापून टाकतात.

Automatic     A
Negative        N
Thoughts       Ts
 Automatic negative thoughts - ह्यांनाच आपण मुंग्या म्हणतो आणि ह्याच डोक्याला जास्त त्रास देतात!

ह्या ANTs म्हणजे काय?


    एखाद्या भावनिक(emotional) किंवा प्रासंगिक (situational) कारणा ला ,मग ते कारण एखादी घटना असो, एखादा विचार असो वा एखादी बातमी असो, त्या trigger ला दिलेला मानसिक प्रतिसाद(mental response) ! बरं परत हा जो मानसिक प्रतिसाद आपण देतो तो imaginary असतो आणि आपली सगळी mental activity पूर्णपणे कामाला लागते म्हणजेच मानसिक क्रिया सुरू होते. मुंग्या जश्या वारुळातून एका मागोमाग एक बाहेर येत असतात तसेच हे ANTs पण एका मागोमाग एक बाहेर पडतात ,साखळीच असते!ते ऑटोमॅटिक असतात ,आपल्या जाणिवेच्या/नेणिवेच्या आत बाहेर असतात! जश्या लाह्या फुटतात तश्याच ह्या आपल्या डोक्यात सतत pop-up होत असतात!

ह्या automatic negative thoughts(ANTs) ची त्यांची स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत ,
जसे:

काहीही प्रयत्न न करता हे तुमच्या डोक्यात pop up होत असतात.
हे इतके तीव्र असतात की ते डोक्यात चालू असताना त्या प्रवाहात तटस्थ राहण व्यक्तीला मुश्किल होते.
हे तुम्हाला एकटे सोडत नाही,त्यांच्यात सातत्य असते. अमुक वेळेसाठी तुमच्या मनात येऊ आणि नंतर तुला मोकळे सोडू असे काही करत नाहीत.
हे तुम्हाला पोखरत असतात,जे काही प्रत्यक्ष घडलंय, घडतय ह्या पासून व्यक्ती ला दूर नेतात.
हे निरुपयोगी असतात तसेच ह्या विचारामुळे व्यक्ती च्या मनात तीव्र नकारात्मक भावना निर्माण होतात व त्या नकारात्मक भावनेमुळे व्यक्ती खरी /सत्य परिस्थिती बघू शकत नाही.
हे विचार व्यक्तीला खरे वाटू लागतात आणि  त्यांना facts म्हणून स्वीकारतात व त्या विचारांबरोबर वाहत जातात.
हे ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स (A N Ts) तुम्हाला एका दुष्ट चक्रात अडकवतात ,जी नकारात्मकता ह्या विचारामुळे व्यक्तीत भरून राहते त्यापासून व्यक्ती स्वतःला मोकळे करता येत नाही.
   ह्या ANTs मध्ये व्यक्ती इतका गुरफटला जातो की त्याचा स्वतःशी तसेच आजूबाजूच्या परिस्थिती शी संघर्ष चालू असतो. ह्या तीव्र, सातत्यपूर्ण पोखरणाऱ्या विचारांमुळे व्यक्तीचा मनातील संघर्ष तीव्र होतो व त्याचे प्रतिबिंब इतर नात्यावरच्या संबंधात दिसते. 

(क्रमशः)

                 
 रोहिणी फुलपगार
क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट,सायकोथिरपिस्ट.

https://www.themindtalks.com/



Post a Comment

1Comments

  1. खुप छान व महत्वपुर्ण माहीती आहे

    ReplyDelete
Post a Comment