आरोग्या विषयी
चिंता (Health Anxiety )
परवा
माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. ती रूरल पब्लिक हेल्थ सेंटर मध्ये काम करतेय,"
अगं, मला न आज  काल सारखी मुलांची आणि आमच्या दोघांची चिंता वाटत राहते, आता सगळीकडे कोरोनाबद्दल
ऐकून, वाचून मला सतत वाटत राहते की मी घरी जाताना करोनाचे इन्फेक्शन तर नेत नाही ना
! मिस्टर पण कामानिमीत्त घराबाहेर असतात, ते करोना बाधितांच्या संपर्कात तर येत नसतील
? माझ्या दोन्ही मुलांपैकी एखाद्याला  थोडा
जरी खोकला आला, अंग गरम वाटले कि मला घाबरायला होते !  माझ्या डोक्यात सतत हेच विचार घोळत असतात की आम्हा
दोघांना किंवा मुलांना कधीही लागण होऊ शकते..  असे झाले तर मी काय करू ?  मी ह्याला सामोरीच जाऊ शकणार नाही !  मला  माझ्या  कुटुंबाच्या आरोग्याची चिंता सतत भेडसावत राहतेय.
 त्यामुळे माझे कश्यात  लक्ष  ही  लागत  नाही
."
स्मिता
सारखी  स्थिती थोडयाफार फरकाने बहुतेक जणांची  आहे !
वेळोवेळी
आपण आपल्या आणि आपल्या जिवलगांच्या तब्बेती विषयी, आरोग्या विषयी काळजी करत असतो आणि
घेत ही असतो ! आपल्या आणि आपल्या जिवलगांच्या आरोग्याची काळजी घेणे हे योग्य आणि नॉर्मल
ही आहे पण हीच   काळजी जेव्हा तीव्र चिंतेत
बदलते तेव्हा आपण  ह्या अवस्थेला आपण हेल्थ एन्झाइटी  किंवा  आरोग्याची अतीचिन्ता असे म्हणतो !
एखादी
व्यक्ती आरोग्याने परिपूर्ण आहे असे आपण कधी म्हणू शकतो ?  बहुतेकांना कोणत्याही व्याधी, रोग,आजार,व्यंग्य वा
जखमा नसणे म्हणजे आरोग्याने परिपूर्ण असणे असे वाटते !  पण आरोग्याची परिभाषा व्यक्तिनुरूप, कालानुरूप आणि
संदर्भानुसार बदलत जाते ! जसे एखाद्या तंदुरुस्त खेळाडू ला पायाचे मुरगाळणे हे अनारोग्य
वाटू लागते, त्यामुळे तो पाहिजे तसे खेळाचे प्रदर्शन करू शकत नाही,  तो स्वतःला आजारी समजू शकतो पण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला
की ज्याचे मधुमेह वा अस्थमा असे निदान झाले आहे हे त्याला अनारोग्य वाटत नाही, त्याने
ह्या गोष्टी नियंत्रणात ठेवल्यामुळे  तो स्वतःला
आजारी मानत नाही. म्हणजेच आरोग्याची व्याख्या ही रोग, व्याधीं किंवा व्यंगा च्या पलीकडे
जावून त्यात व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि 
सामाजिक स्थितीचा पण अंतर्भाव केला गेला 
आहे . 
तर
आपल्या ह्या  " आरोग्याची अतीतीव्र चिंता "  असणे   किंवा  “ HEALTH
ANXIETY “ असणे म्हणजे काय हे पाहू !
     " ज्यावेळी  एखाद्याला स्वतःला वा आपल्या अगदी जवळच्या माणसांना,
जोडीदार, मुले, आई वडिल वा भाऊ बहीण यांपैकी कोणाला तरी गंभीर जीवघेणा आजार झाला आहे
किंवा होणार असल्याची  शक्यता आहे याची  सतत आणि तीव्र चिंता जाणवते त्या स्थितीला आरोग्यविषयी
चिंता विकार किंवा हेल्थ एन्झाइटी असे म्हणतात "
 हेल्थ एन्झाइटी मध्ये लोकांना कॅन्सर,  हार्ट अटॅक, मानसिक आजारापासून अस्थमा, अर्धांगवायू
वा  किडनी फेल, मेंदूचे आजार, आताच्या स्थितीत
करोना इत्यादी होण्याची चिंता आणि भीती वाटत असते.  ह्या प्रकारच्या चिंतेत  एका विशिष्ट्य आजाराबद्दल चिंता नसते तर होऊ घातलेल्या
आजाराच्या तीव्रतेची, गंभीरतेची चिंता असते आणि तो  जीवघेणा असू शकतो ह्याची भीती ही असते.  उदा . एखाद्याला छातीत  थोड्या वेगळ्या संवेदना जाणवल्या किंवा हालचाल जाणवली
तर लगेच आपल्याला हृदयाचे दुखणे सुरु झाले की काय चिंता पोखरत राहाते . 
पुढील  स्थितींत आरोग्य चिंता विकार आपल्याला 
त्रासदायक  ठरतो  : 
1.     ज्या वेळी ही चिंता तीव्र आणि
अधिक प्रमाणात असते . 
2.     वास्तविक मध्ये गंभीर वैद्यकीय
समस्या  निर्माण होण्याची काहीही शक्यता नसताना
त्याबद्दल सतत विचार  करत  राहणे . 
3.     मेडिकल एक्स्पर्ट कडून खात्रीदायक
आश्वासन मिळूनही आणि तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल येऊन ही चिंता कायम राहते . 
4.     सतत आपल्या शरीरातील संवेदनांप्रती,
क्षुल्लक हालचाली वा छोट्या छोट्या बदलांप्रती अती जागरूक असणे . तसेच आपले कुटुंबीय,
मित्र, मैत्रिणी डॉक्टर यांच्याकडून स्वतःला काही आजार नाही याची पुनः पुन्हा खात्री
करून घेणे .                                                                         
5.     आजारी लोकांना भेटणे वा त्यांच्याशी
संपर्क ठेवणे टाळणे .                                                                                                           
6.     गुगल वा इंटरनेट वर आपल्याला
जाणवत असलेली लक्षणा बद्दल सतत माहिती शोधत 
राहणे व त्या माहितीचा आपल्या लक्षणांशी संबंध जोडणे .                                                                                                                   
7.     सतत वेगवेगळ्या तपासण्या करून
घेणे आणि वेगवेगळे डॉक्टर्स  वा स्पेशालिस्ट
बदलत  राहणे .                                                                                                               
8.     ही सगळी  लक्षणे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी साठी दिसणे
.                                                                                                                   
9.     वरिल  गोष्टींचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तींवर
नकारात्मक परिणाम होऊन तणाव  निर्माण होणे
.
आरोग्याची चिंता
का निर्माण होते ?
व्यक्तीला आरोग्यविषयी तीव्र
चिंता का वाटत असते ? अशी कोणती गोष्ट आहे की जी आपली चिन्ता सतत तेवत ठेवते ! संशोधनाअंती
हे सिद्ध झालेय की हेल्थ एंक्झायटी च्या मुळाशी आपल्या आरोग्य आणि रोग संबंधित काही
अतार्किक विचारधारा,  घट्ट उराशी कवटाळलेले
समज, विश्वास, आपले काही नियम आणि त्यावर आधारित आपले अंदाज असतात !  हे सगळे त्या दिव्यातील तेलाचे काम करतात जेणेकरून
चिंतारुपी ज्योत  सतत  तेवत राहते !
जसे
की :   मी माझ्या शरीरात
जाणवणारे कोणतेही बदल वा लक्षणे मग ती  सौम्य
असली तरी मी गांभीर्याने घेतलीच पाहिजे. माझ्या शरीरात घडणारे अंतर्गत वा बाह्य संवेदना
मी लगेच मेडिकल एक्स्पर्ट ला सांगितलेच पाहिजे . माझ्या लक्षणांचे निदान झालेच पाहिजे.
माझा डॉक्टर खात्रीशीर असला पाहिजे आणि त्याने माझी  प्रत्येक शारीरिक
संवेदना,
बदल आणि लक्षणे
यांची कारणे आणि उपचार मला
समजावलेच पाहिजे . हे
आणि असे  काहीसे  नियम तयार करतात . 
 ह्या  नियमांवर
आधारित परत स्वतःच अंदाज  ही बांधतात,
जसे : शरीरात जो काही अस्वस्थपणा जाणवतो वा काही बदल जाणवतात ते गंभीरच असणार ! जर माझ्या डॉक्टरने काही टेस्ट करायला सांगितले म्हणजे नक्कीच मोठा प्रॉब्लेम आहे ! जर डॉक्टर च्या लक्षात माझा काय प्रॉब्लेम आहे हे येत नाही म्हणजे काहीतरी गंभीर आहे ! मी जर आता तपासण्या केल्या नाही तर महत्वाचे क्लू निसटतील !माझ्या डॉक्टरांकडून चूक होऊ शकते,दुसरे डॉक्टर्स बहुतेक योग्य सल्ला देतील ! ( हे नियम आणि अंदाज स्वतःला आणि जिवलगांना ही लावले जातात. )
हेल्थ एंक्झायटी  कशी विकसित होते
- Ø  नकारात्मक आरोग्यानुभव:
जसे
ओळखीतील व्यक्तीचा गंभीर आजार वा मृत्यू.स्वतःचा आधीचा मेडिकल प्रॉब्लेम. मीडिया,सोशल
मीडिया,इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून मिळणारी नकारात्मक माहिती.
 - Ø  असुरक्षिततेची भावना:
स्वतःबद्दल वा जवळच्या व्यक्ती बद्दल आरोग्याविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण होणे
.
 - Ø  आरोग्यविषयी नियम आणि अंदाज:स्वतःचे
आरोग्यविषयी स्वतःचे नियम आणि अंदाज सुरु होतात . जसे की मी कसे आणि का वागावे ह्याचे
माझे नियम आणि आरोग्याबद्दल माझे  अंदाज की
जे बरोबरच असल्याची ही माझी खात्री आहे.
 - Ø  अतिजागरूकता: ह्या
नियमांमुळे आणि अंदाजांमुळे आरोग्या प्रति वा 
लक्षणांप्रती अती संवेदनशीलता वाढते ,अतिजागरूकता वाढते.
 - Ø 
भावनात्मक
आणि वर्तनात्मक बदल :भावनात्मक आणि वर्तनात्मक बदल जसे
अत्याधिक चिंता,भीती, दैनंदिन क्रियांमध्ये अती जागरूकता दाखवणे.
 - Ø  परिणामस्वरूप हेल्थ एन्झाइटी विकार
 
ही
हेल्थ एंझाइटी प्रत्येकाला कधी तरी जाणवते,पण ती सौम्य प्रमाणात असल्यामुळे आपल्या
नियंत्रणात असते! तिचे रूपांतर तीव्र स्वरूपात झाल्यास व आपल्या दैनंदिन  क्रियेंमध्ये त्यामुळॆ तणाव निर्माण होत असेल  तर त्यावर उपचार घेणे योग्य ठरते ! सायकोथेरपि आणि
वैद्यकीय मदतीच्या साहाय्याने व्यक्ती ह्यावर मात करू शकतात !
रोहिणी
फुलपगार
सायकोथेरपीस्ट
9604968842
www.gethealthymind.in
.

