*गौतम बुद्ध : मनोवैज्ञानिक*
(बुद्ध पौर्णिमा निमित्त)
सुमारे 2500 वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतमाने "बुद्धत्व" प्राप्त झाल्यानंतर बौद्ध धर्माची स्थापना केली. आज जगातील प्रभावी आणि अग्रगणी असलेल्या धर्मांपैकी चौथ्या क्रमांकावर असलेला तो एक प्रमुख धर्म आहे. जगभरात त्याचे 660 दशलक्ष अनुयायी आहेत आणि जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी नऊ ते दहा टक्के बौद्ध समाज आहे.
बौद्ध धर्माचे हे एवढेच वैशिष्ट्य नाही. बौद्ध धर्माचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे हा धर्म मानवी मानसिक प्रक्रियेवर सखोल चिंतन करणारा धर्म आहे. बौद्ध धर्म मानसशास्त्र, भावना ,आकलन, वर्तन, आणि प्रेरणा यांचे उपचारांसह विश्लेषण करतो ! बुद्धांच्या शिकवणीचे पाहिले वैशिष्ट्य हे आहे की 'सर्व गोष्टींचा मध्यबिंदू "मन " आहे ! मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते, ते सर्व वस्तूंवर अंमल चालवते, त्यांची निर्मिती करते, मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते, ते मानसिक शक्तींचे प्रमुख आहे आणि ज्या बाबींकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार ! '
बुद्धांच्या शिकवणुकीचे दुसरे वैशिष्ट्य असे की 'आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम होतो अश्या सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे. जे जे वाईट आहे , वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते ते मनातूनच उत्पन्न होते. जे जे चांगले आहे , चांगल्याची संबंधित आहे ,त्याच्या अधीन आहे, ते सर्व मनातूनच उत्पन्न होते!'
बुद्धांनी कोणत्याही बाह्य शक्तींपेक्ष आंतरिक ,मानसिकशक्तीला सर्वश्रेष्ठ मानलेआहे.बौद्धवाद हा तथाकथित धर्मांच्या व्याख्येत बसत नाही तर ते जगण्याचे तत्वज्ञान आहे, सहज सोपे ,सुंदर आणि आनंदी कसे जगायचे याचा परिपाठ बौद्धतत्वज्ञान घालून देतात.
मानवाच्या आतापर्यंत च्या इतिहासात मानवी जडणघडणीचे आणि विकासाचे केलेले अनेक प्रयत्न समोर आलेत , मानवाची ह्या प्रवासात त्याचे दुःख, अडचणी त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्याची आणि आयुष्यात आनंदाचा शोध घेण्याची धडपड सतत दिसून येते . हा जो आनंदाचा शोध आहे तो जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात चालू आहे, वैयक्तिक आयुष्य, सामाजिक आयुष्य ,रोजच्या जगण्याच्या पातळीवर वाआध्यात्मिक पातळीवर!
शोध हा निरंतर चालू आहे !
ह्या शोधाचे मूळ बुद्धांनी आपल्या शिकवणुकीत मांडले, त्यांचे जे चार आर्यसत्य आहेत आणि अनित्य व शून्यवाद यातून त्यांनी काही तथ्ये समोर मांडली.
आर्यसत्याचे आधारे त्यांनी जगात दुःख आहे, त्या दुःखाला कारणं आहेत, त्या दुःखांचे ,निवारण होऊ शकते, आणि हे दुःख निवारण्यासाठी मार्ग ही उपलब्ध आहेत हा संदेश मानवजातीला दिला. अधिक विस्तृतपणे, मानवी आयुष्य हे गुंतागुंतीचे आहे आणि राग, द्वेष, इच्छा ,आकांक्षा,विश्वासघात, लबाडी ,निराशा , लोभ,आदी विकारांनी भरलेले आहे. या विकारांनी येणारे वैफल्य म्हणजेच दुःख! पाहिजे ते न मिळणे व नको ते समोर असणे म्हणजेच दुःख.. आणि ह्याचे तुमच्या जीवनात अस्तित्व आहे हे मान्य करणे ,स्वीकारणे ! ह्या दुःखाला कारणे आहेत ,ती कारणे कुठे बाहेर नाहीत तर मनुष्याच्या आतमध्येच दडली आहेत, ती म्हणजे आपल्या उत्कट इच्छा, अनावर ओढ, एखादया गोष्टींची तीव्र आसक्ती,ह्याला बुद्धांनी तृष्णा म्हटले आहे. मानवी मन ह्या तृष्णेतून बाहेर पडू शकते ,योग्य आणि अयोग्य यात निवड करून आपले दुःख निवारण करू शकते , दुःखाच्या कारणामधून बाहेर पडायचे अनेक मार्ग ही उपलब्ध आहेत की जे मनुष्याने अंगीकारल्यास त्याचे आयुष्य अधिक आनंदी होईल!
बुद्ध अजून पुढे सांगतात की सृष्टीतील सर्व बदल हे अनित्य आहेत म्हणजेच परिवर्तनशील आहेत. परिवर्तनशिलता हा सृष्टीचा नियम आहे, सजीव आणि निर्जीव दोन्हीही अनित्य आहेत. जसे नदीतील दगड पाण्याच्या प्रवाहाने क्षणोक्षणी घासले जातात पण ही क्रिया स्पष्टपणे दिसून येत नाही. खडक वा दगड सातत्याने घासले गेल्यामुळे त्यापासून रेती तयार होते. त्याचप्रमाणे एखादा जीव लहानाचा मोठा होतो तेव्हा त्यामध्ये होणारे परिवर्तन एकदम होते असे नाही. "कोणतीही वस्तू स्थिर नसते तर गतिशील असते " हा आधुनिक विज्ञानाचा नियम बुद्धांच्या प्रतित्यसमुत्पाद वादातील " अनित्यवादाची" परिणीती आहे !
गतिशीलतेच्या प्रक्रियेनंतर ची अवस्था प्राप्त झाली की पहिली अवस्था संपुष्टात येते म्हणजेच शून्यात जाते. एक अवस्था संपल्याशिवाय दुसरी अवस्था शक्य नाही, अर्थात एक शून्यात गेली की दुसरी निर्माण होते याला प्रतित्य समुत्पाद वादातील "शून्यवाद" म्हटले गेलेय. या सिद्धांतानुसार काहीतरी निर्माण होण्यासाठी काहीतरी अस्तित्वात असले पाहिजे. जसे वाफ निर्माण होण्यासाठी पाणी अस्तित्वात असणे आवश्यक आहे.
एखाद्या कार्यामागे एखादे कारण असले पाहिजे हा बुद्धांनी सांगितलेला शून्यवाद आज कार्यकारणभावाचा सिद्धांत म्हणून विज्ञानात मान्य झाला आहे.
बुद्धांच्या शिकवणुकीचे हे सार मानवाच्या भावभावनांचे आणि त्याच्या ताण तणावाचे मूळ अधिक स्पष्ट करते की जे आज ही लागू पडत आहे.
बुद्धांच्या प्रतित्यसमुत्पाद वादानुसार तुमच्या ताण तणावाला, दुःखाला काहीतरी कारणीभूत आहेत आणि हे जे "काहीतरी" आहे ते तुमच्या आत, विचारांत आहे! तुमच्या दुःखाचे कारण आहे तुमचे विचार की जे तुमच्या तृष्णेतून, दृष्टीकोनातून , अपेक्षा मधून येतात.
आजच्या सगळ्या ताण तणावाच्या कार्यशाळा ,आणि मानसोपचरांचा गाभा पण ह्यावरच आहे की "तुमचा दृष्टीकोन तुमचे विचार ठरवतात, विचारानुसार भावना निर्माण होतात आणि भावनानुसार वर्तन घडते! त्यामुळे दृष्टीकोन योग्य ठेवून विचारांवर नियंत्रण ठेवले की भावनांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते आणि त्यानुसार वर्तनावर व एकूणच ताणावर आणि दुःखावर ही!"
त्याचप्रमाणे बुद्धांनी सांगितलेल्या गतीवादाच्या नियमानुसार जगात एकच गोष्ट सत्य आणि निरंतर टिकणारी आहे ,ती म्हणजे *सदोदित होणारे बदल!* मानवी ताणाचे निवारण करताना हा नियम महत्वाचा वाटतो, आताची परिस्थिती, दुःख हे कायम नसणार ,ते बदलणारच आहे त्याप्रमाणेच आताचे आनंद, सुख ही कायमस्वरूपात राहणार नाही त्यामुळे दुःखाचा, वेदनेचा तिटकारा वा सुखाची तृष्णा ,आसक्ती ह्या तुम्हाला तणावात घालणार हे एकदा समजावून घेतले की व्यक्ती कमीप्रमाणात विचलित होते.
बुद्धांनी नुसतेच मनुष्याच्या ताणाचे ,दुःखाचे कारणे सांगितली नाहीत तर ते कशाप्रकारे दूर करता येईल हे त्यांच्या अष्टांग मार्गातून शिकवले पण आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक उपजीविका,सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी ही ती आठ सूत्रं आहेत.
ह्या अष्टांग सूत्रानुसार , व्यक्तीने वस्तूनिष्ठ आणि सारासार दृष्टिकोन अंगिकरायची सवय करणे वस्तू, माणसे कोणत्याही पूर्वग्रहदूषित नजरेने न बघता आहे तसे बघणे आणि स्वीकारणे, वास्तवाचा स्वीकारणे, आपले ध्येय, वचन हे आपल्या आटोक्यातील आणि सत्या च्या वास्तवाच्या जवळ असणारे असावेत.आपले वागणे, बोलणे, कर्म ह्यामध्ये दुराग्रह, पूर्वग्रह, वा आकस नसावा. जास्तीत जे योग्य वास्तव,तर्कसुसंगत, आणि इतरांना व स्वतः ला ही कमीत कमी त्रासदायक, दुःखदायक असेल असे आपले वागणे, बोलणे, कर्म, कृती आहार ,विहार असावेत हे बुद्ध शिकवतात.
अष्टांगिक मार्ग म्हणजे स्वत:नेच स्वत:चा मार्गदर्शक बनणे होय. येथे कोणीही मध्यस्थ नाही. आपणच सर्व काही आहे.
‘अत्त दिप भव’ म्हणजे स्वयंप्रकाशीत व्हा, असे भगवान बुध्दाने सांगितले आहे. आपणासच स्वत:चा उध्दार करायचा आहे. दुसरा कोणी आपला उध्दार करु शकत नाही. स्वत:चे जीवन पायरी पायरीने घडवायचे आहे.
गौतम बुद्धांनी मानवी मनाचा आणि मनोव्यापारांचा केलेला इतका सखोल अभ्यास आणि विवेचन, मनाचे संस्कार इतरत्र अभावानेच आढळते. ते पहिले मनोवैज्ञानिक आहेत की ज्यांनी मनाचे , विचारांचे जगाला पटवून दिलेले महत्व आजही जगभरात टिकून आहे ज्यामुळे आज 2500 वर्षेनंतरही त्यांची तत्वे सगळ्या मानसोपचार आणि मनोचिकित्सा उपचारांचा, ताणतणाव च्या ,मोटिव्हेशनल वर्क शॉप चा महत्वाचा भाग ठरत आहेत!!
रोहिणी फुलपगार
सायकॉलॉजिस्ट
9604968842