भावनांच्या ग्रे शेड्स.. ( Series..) भाग 6

TheMindTalks
0

 

भावनांच्या ग्रे शेड्स.. ( Series..) भाग 6

 

·        दुखावले जाणे (Hurt )आणि अपेक्षा भंग (Letdown)

·        हानिकारक राग(Unhealthy Anger) आणि उपयुक्त राग (Healthy Anger)

 

दुखावले जाणे (Hurt )आणि अपेक्षा भंग (Letdown)

ज्यावेळी आपल्या समोर प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते आणि आपण आलेल्या प्रतिकूल प्रसंगाचा अर्थ पुढीलप्रमाणे लावतो :

आपल्याला  अगदी वाईट पद्धतीने वागवले वा वापरले गेलेय .

अश्या प्रकारची वागणूक आपल्याला देणे योग्य नाही.

अश्या वागण्याला आपण पात्र नाही.

समोरच्याच्या दृष्टीने मला महत्व किंवा मान नाही .

इतर व्यक्ती किंवा एक स्पेशल व्यक्ती आपल्या नातेसंबंधांना योग्य तो सन्मान देत नाही.

त्यांच्या / त्याच्या दृष्टीने ह्या नात्याला,मला काही महत्व नाही.

आपल्यादृष्टीने हे नाते जेवढे महत्वाचे आहे ,तेवढे समोरच्याच्या दृष्टीने नाही, क्षुल्लक आहे.

त्यावेळी आपण दुखावलो गेलोय आणि अपेक्षाभंग झालाय ह्या भावना आपल्यात निर्माण होतात.

ज्याप्रकारचे आपले निष्कर्ष ठळक असतात ती भावना प्रभावी ठरते .

 जेव्हा आपण इतरांचे आपल्याबद्दलच्या वागण्याचे खूपच नकारात्मक चित्रण उभे करत असतो, पुढील प्रकारचे विचार येतात :

इतरांना आपली काळजी, कदर नाही .

समोरच्याला माझ्याशी काही देणंघेणं नाही .

मी एकटा पडलो /पडलेय  .

भूतकाळातीलही अश्याच प्रकारच्या घटना आठवत राहतात

त्यावेळी आल्याला दुखावले गेल्याची भावना जास्त जाणवते .मग आपण पुढीलप्रमाणे वर्तन करतो:

ज्या व्यक्तींमुळे असे जाणवते त्यांच्याशी संभाषण थांबवतो .

 ज्या प्रसंगामुळे हि जाणीव तीव्र झालीय त्याबद्दल समोरच्याशी बोलता आपण आपल्यातच दुर्मुखून राहतो  रुसून राहतो !                                                          स्वतःला दयनीय अवस्थेत ठेवून इतरांशी संबंध तोडतो .

 जेव्हा आपण समोरच्याच्या वागण्याचे वास्तववादी परीक्षण करायला लागतो, खरंच आपल्याला वाटते तसे इतरांचे आपल्यासोबतचे वागणूक अन्यायकारक आहे का ? आहे तर का आणि किती प्रमाणात आहे किंवा कोणत्या एका विशिष्ट गोष्टीबाबत आहे का ह्याचा विचार सुरु होतो तेव्हा आपल्याला दुखावले गेल्यापेक्षा अपेक्षाभंग जाणवतो . समोरच्या व्यक्तीचे आपल्यासोबतचे वागणे चुकीचे आहे ,पण ती व्यक्ती आपली काळजी ,कदर करत नाही असा अर्थ ना काढता त्याचे वर्तन चुकीचे ठरवतो त्यामुळे आपण स्वतःला दयनीय अवस्थेत बघतो पण त्याच वेळी इतरांशी जोडून राहतो .आपल्याला जेव्हा भूतकाळात त्यांनी समजून घेतले गेले ,काळजी घेतली गेली ह्या प्रसंगांची पण मनात नोंद होते . आपण आपली हि भावना दूर करण्यासाठी संभाषण तोंडात इतरांच्या दिशेने नातेसंबंध अजून चांगले होण्यासाठी प्रयत्न करतो त्यासाठी आपल्या भावना, विचार ,आणि प्रसंग ज्यांच्यामुळे म्हणजे ज्या व्यक्तींमुळे हे जाणवतेय त्यांच्याकडे व्यक्त करतो ,पोहोचवतो .इतरांनी ,समोरच्याने ह्या नात्याचा ,नातेसंबंधांचा आदर राखावा ,कदर करावी आणि आपल्यलाला योग्य तो सन्मान द्यावा हि आपली मागणी योग्य आणि सयंत शब्दात मांडू शकतो .

दुखावल्याच्या भावनेत आपण पुढाकार घेता इतरांनी पुढाकार घ्यावा ह्याची वाट बघत अजूनच त्या कोशात गुरफटून जातो , अपेक्षाभंगात आपल्याला अन्याय झाल्यासारखे वाटते , पण आपण हि भावना समोरच्यापर्यंत पोहचवण्याचा सकारात्मक  प्रयत्न करत असतो !!

 

हानिकारक राग(Unhealthy Anger) आणि उपयुक्त राग (Healthy Anger)

ज्यावेळी आपल्या समोर प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते आणि आपण आलेल्या प्रतिकूल प्रसंगाचा अर्थ पुढीलप्रमाणे लावतो :

आपण आपल्या ध्येयाला बाधाकारक वातावरण .

इतरांकडून आपल्या पर्सनल नियमांचे उल्लंघन होतेय.

 आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात लोक गरजेपेक्षा जास्त ढवळाढवळ करत आहेत.

आपल्या 'स्व ' वर  अतिक्रमण होतेय धक्का पोहोचतोय .

ज्याप्रकारचे आपले निष्कर्ष ठळक असतात ती भावना प्रभावी ठरते .

     इतरांच्या वागण्याचे आपण "जाणीवपूर्वक वा हेतुपुरस्सर वागणे" असे आपल्या मनात नकारात्मक अवडंबर करतो .इतरांचा हेतू हा दुर्भावनात्मक असल्याची खात्री झालेली असते. स्वतःला जे वाटते तेच रास्त आहे असे गृहीत धरले जाते !इतरांचे वाटणे चुकीचे ठरवले जाते ! घडलेले प्रसंग वा घटना आपण इतरांच्या दृष्टीने वा दुसऱ्या बाजूने पाहू शकत नाही ,असे जेव्हा घडते तेव्हा आपल्याला हानिकारक राग आलेला असतो .

 ह्या भावनेत :

आपण सूड घेण्याचे ठरवतो !

इतरांचे वागणे आणि बोलणे मनात सतत् घोळवत ठेवतो .

आपण समोरच्यावर कश्याप्रकारे मत करू शकू याचे आराखडे आणि चित्रण मनात उभे केले जाते .

आपल्याकडून  समोरच्यावर शारीरिक आणि शाब्दिक हल्ले केले जातात.

मनात अढी ठेवून वर वर गोड बोलले जाते आणि संधीची वाट पहिली जाते .

कधीकधी रागाने संबंध तोडले जातात किंवा तिसऱ्या व्यक्तीला त्रास द्यायला सांगितले जाते .

हे सगळे हानिकारक राग हि भावना  प्रबळपणे दर्शवते

उपयुक्त रागामध्ये आपण समोरचा हे मुद्दाम हेतुपुरस्सर वागला का हे शोधायचा प्रयत्न करतो किंवा

मग आपल्याला जरी असे वाटले तरी ते खरे नसण्याची शक्यता गृहीत धरली जाते .

ज्या प्रसंगामुळे हि असमाधानकारक स्थिती निर्माण झालीय तिला तोंड देण्यासाठी /सामोरे जाण्यासाठी पाऊल उचलले जाते.

आपला प्रयत्न अयशस्वी झाला तरी आक्रमक होता वास्तव स्वीकारून त्या स्थितीपासून स्वतःला दूर करतो किंवा सोडून द्यायला शिकतो .

आपण आपले मत ,आपल्याला झालेला किंवा होत असलेला त्रास आक्रमक होता इतरांपर्यंत पोहोचवतो . इतरांनी त्याचे आपल्यासोबत चे वागणे बदलावे हि आपली अपेक्षा त्याच्या कडे व्यक्त करतो पण अट्टाहास करत नाही.

हानिकारक  रागामध्ये शाब्दिक आणि शारीरिक आक्रमकता असते तर उपयुक्त रागामध्ये ठामपणा असतो.

 

Rohini  Phulpagar

Consultant Psychologist Psychotherapist

9604968842

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)