भावनांच्या ग्रे शेड्स.. ( Series..) भाग 5

TheMindTalks
0

 

भावनांच्या ग्रे शेड्स.. ( Series..) भाग 5

·        अपराधीपणा (Guilt) आणि पच्छाताप (Remorse)

·        लज्जा(Shame) आणि खेद (Disappointment)

 

 

 

 

अपराधीपणा(Guilt) आणि पच्छाताप (Remorse)

 ज्यावेळी आपल्या समोर आलेल्या प्रतिकूल प्रसंगाचा अर्थ पुढीलप्रमाणे लावतो :

प्रतिकूल प्रसंगाचा अर्थ आपण आपल्या नैतिकतेच्या कसोटीशी लावतो.

आपण वा इतरांनी  तयार केलेल्या जगण्याच्या नियमांशी लावतो .

आपल्याला वाटते कि हे नियम नैतिकता आपल्याकडून ओलांडली गेलीय,

काहीतरी चुकीचे वागले गेलेय .

आपल्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्यात .

त्यामुळे आपल्यामध्ये अपराधीपणाची बोच हि हानिकारक नकारात्मकभावना आणि पच्छाताप हि उपयुक्त नकारात्मक भावना  ह्या दोन्हीही निर्माण होतात.         

                                                                   

ज्याप्रकारचे आपले निष्कर्ष ठळक असतात ती भावना प्रभावी ठरते .


आपले विचारांचे आवर्तन पुढीलप्रमाणे सुरु होऊन आपण त्यात गुरफटून जातो :

 नक्कीच मी खूप भयंकर चूक केली आहे वा पाप केले आहे .

ह्या सगळ्या प्रसंगाला फक्त मीच जबाबदार आहे त्यामुळे मी त्याची शिक्षा घेतलीच पाहिजे .

अश्या प्रकारच्या विचारांच्या आवर्तनामुळे सगळ्यांकडून क्षमेची याचना करत माफी मागत असतो . तसेच समोरच्याला बरे वाटावे, इतरांनी माफ करावे , म्हणून कोणत्याही पातळीवर जाण्याची तयारी असते अगदी स्वतःला गंभीर इजा दुखापत करण्याइतपत ही कृती होते .जर कोणी क्षमा करत असेल तर ती सुद्धा  सहजासहजी आपल्याकडून मान्य केली जात नाही त्या क्षमेच्या बदल्यात स्वतःकडून त्याची काहीतरी भरपाई कशी करता येईल याचा सतत विचार येतो ,स्वतःला दूषणे देत स्वतःचा तिरस्कार केला जातो .

पच्छातापात असताना आपल्याकडून पुढीलप्रमाणे स्वपरीक्षन केले जाते:

 आपल्याकडून झालेल्या चुकीच्या वागण्याचे वा इतरांना दुखावले गेल्याच्या कृतीचे परत सर्वांगाने विचार केला जातो.

आपल्याकडून खरंच "पाप " घडलेय का ह्याची तपासणी करतो .

आपण आपल्या वागणुकीची  डोळसपणे जबाबदारी घेतो म्हणजे आपल्या कृतीचा असा परिणाम होत असेल तर भविष्यात आपल्याकडून अशी कृती घडू देण्याची जबाबदारी घेतली जाते .

त्याचप्रमाणे ह्या प्रसंगाला अजून कोणते घटक कारणीभूत आहेत ह्याचाही विचार केला जातो .

आपण आपले हे विशिष्ट वर्तन कोणत्या संदर्भानुसार घडले हे ही चाचपडतो !

आपण चुकीचे वागलो आहोत ही जाणीव असते पण त्यामुळे आपल्याकडून खूपच भयंकर कृती  झालीय वा पाप झालेय अश्या प्रकारची भावना निर्माण होऊ देत नाही . समोरच्यानं आपल्याला क्षमा करावी ह्यासाठी आपण माघार घेऊन माफी मागतो पण ह्यात आपल्याला क्षमा मिळाली नाही तर स्वतःला इजा करून घेत नाही वा सतत समोरच्याकडे याचना ही करत नाही . आपण आपल्या कृत्याचे कारणे समजावून घेतो आणि त्यात आवश्यक ते बदल करत राहतो . इतरांनी आपल्या कृतीबद्दल  केलेली क्षमा वा शिक्षा बिनशर्तपणे मान्य करून पुढे जाण्याचे ठरवतो.

अपराधीपणाची टोचणी लागली असता आपण आहे तिथेच थांबून स्वतःला संधी नाकारतो तर पच्छातापात आपण आपल्या चुकीतून शिकून स्वतःला नवीन संधी देतो .

 

लज्जा(Shame) आणि खेद (Disappointment)

 ज्यावेळी आपल्या समोर प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते आणि आपण आलेल्या प्रतिकूल प्रसंगाचा अर्थ पुढीलप्रमाणे लावतो :

आपल्याला  आपली काही कमकुवत बाजू इतरांसमोर यायला नाही पाहिजे, ती समोर आलीय.

आपण ज्या लोकांशी जोडून आहोत त्यांची काही पडकी वा नकारात्मक बाजू इतरांच्या समोर यायला नको होती , ती आलीय.

आपल्याकडून  ज्या आदर्शवत वागणुकीची , वर्तनाची अपेक्षा केली जातेय त्यानुसार आपले वर्तन घडत नाही ,घडले नाही

अश्या विचारांच्या गोंधळामुळे त्यावेळी आपल्याला शरम वा लाज वाटने आणि खेद वाटणे ह्या दोन्ही नकारात्मक भावना जाणवतात .

ज्याप्रकारचे आपले निष्कर्ष ठळक असतात ती भावना प्रभावी ठरते .

  जेव्हा आपल्याला असे वाटते कि आपले जे गुपित वा कमकुवत बाजू , माहिती समोर आलीय त्याबद्दल च्या नकारात्मक बाजूमुळे इतर लोक आपल्याला स्वीकारणार नाही , आपल्यापासून लांब राहतील , आपल्याविषयी नकारात्मक मत बनवतील ! आपण आपल्या त्या विशिष्ट कमकुवत बाजूच्या नकारात्मक पैलूंचे अवास्तव आणि आवाढव्य चित्रण बनवतो .अश्या प्रकारचे विचार आले कि आपल्या मनात स्वतःची शरम वा लज्जा वाटते .

     अशी भावना जागृत झाली कि मग आपण लोकांना टाळायला लागतो, इतरांपासून स्वतःला लांब ठेवतो, अलग करतो कि जेणे करून आपली कमकुवत बाजू लोकांसमोर यायला नको किंवा त्याबद्दल च्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळणे सोपे जावे.

         तेच जर आपण आपली जी कमकुवत बाजू समोर आलीय तिचा स्वीकार केला, लोकांना तुमच्या कमकुवत वा नकारात्मक बाजू खरंच इंटरेस्ट आहे का किंवा त्यावरून इतर लोक तुमचे परीक्षण करत आहेत का याचा वास्तववादी विचार करून त्यातील तथ्य शोधत असू ,त्यातील नकारात्मक पैलूमुळे इतरांनी खरंच आपल्याला नाकारले आहे का आणि जर काही प्रमाणात नाकारले असेल तरी हे नाकारणे किती काळ टिकू शकते ह्याचा वास्तववादी विचार करत असेल तर आपल्याला खेद वाटतो .

  अश्या वेळी आपण सोशल कार्यक्रमामध्ये भाग घेणे,लोकांशी मिसळणे चालू ठेवतो. आपला सामाजिक समतोल आणि सहभाग पुनःप्रस्थापित करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत असतो.

जेव्हा स्वतःची लाज वाटते तेव्हा आपण इतरांपासून लांब जातो आणि स्वतःची कमकुवत बाजू वा वैगुण्यांबद्दल स्वतःला दोष देतो पण खेद वाटत असताना आपण आपल्या कमकुवत बाजूचा स्वीकार केलेला असतो त्याच प्रमाणे त्या कमकुवत वा वैगुण्यासह जगात मिसळण्याचा वास्तववादी प्रयत्न करत असतो. खेद वाटत असताना आपण आपला पूर्ण स्वीकार केलेला असतो पण त्याच वेळी खेद वाटणे हे त्या तात्कालिक प्रसंगाला दिलेली तात्पुरती प्रतिक्रिया असते तेच शरम वा लज्जास्पद वाटून घेणे हे दीर्घकाळ मनात राहते.


Rohini  Phulpagar

Consultant Psychologist Psychotherapist

9604968842

www.GetHealthyMind.in

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)