सायकोथेरपि आणि एंक्झाइटी

TheMindTalks
2


“Love looks forward, hate looks back, but anxiety has eyes all over its head.”

—Mignon McLaughlin (American journalist)

 एंक्झाइटी साठी जगभरात अनेक सायकोथेरपि चा वापर केला जातो . त्यात प्रामुख्याने कॉग्नेटिव्ह बिहेव्हरल थेरपी आणि माइंडफुलनेस थेरपी चा जास्त वापर होताना दिसतो. अनेक रिसर्च त्यांची परिणामकारकता दाखवतात.

एंक्झाइटी वर कॉग्नेटिव्ह बिहेव्हरल थेरपी आणि माइंडफुलनेस थेरपी कसे काम करते हे समजून घेण्याआधी एंक्झाइटी चे कॉग्नेटिव्ह (बोधनीक)  मॉडेल जाणून घेऊयात !




एंक्झाइटी च्या कॉग्नेटिव्ह(बोधनीक)मॉडेल चे केंद्रीय सिद्धांत :

धोक्याचे अतिरंजित मुल्यांकित चित्रण :

ह्या प्रक्रियेत कोणत्याही बाह्य वा शरीरांतर्गत  घटकाचे किंवा उद्दीपकाचे; स्वतःला आणि स्वतःच्या अस्तित्वाला अथवा कल्याणकारी अवस्थेला संभाव्य धोका ,भीती वा हानिकारक ठरू शकणारे अश्या पद्धतीचे निष्कर्षात्मक अनुमान काढले जाऊन त्यानुसार जलद ऍटोमॅटिक शारीरिक ,मानसिक आणी वर्तनिक  क्रिया घडून त्यातून व्यक्तीची सुरक्षितता आणि त्याचे अस्तित्वाबद्दल वारंवार खात्री तपासली जाते . ह्याला "धोक्याचे मूल्यांकन " असे म्हटले जाते .हे प्राथमिक मूल्यांकन असते .

हे धोक्याचे प्राथमिक मूल्यांकन सगळ्या चिंताविकारांच्या मुळाशी असते .धोक्याच्या मूल्यांकनामध्ये स्मरणशक्ती , एकाग्रता , निर्णयक्षमता, तर्कसंगती आणि अनुमानात्मक विश्लेषण ,विचार यांसह  विविध संज्ञानात्मक प्रक्रिया आणि  गोष्टींचा समावेशअसतो . हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहूया . समजा तुम्ही दुपारी एखाद्या रिकाम्या गल्लीतून जात आहेत, आणि तुमच्या कानावर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला; लगेच तुमचे स्नायू ताठ होतात , पाऊले जलद पडायला लागतात , हृदयाचे ठोके आणि श्वासांची गती वाढते , हा सगळा रिस्पॉन्स कुत्र्याच्या आवाजाला नसतो तर तुमच्या जागृतमनाने   माझ्यावर हल्ला होण्याचा धोका आहे काय ?" हे जे  धोक्याचे अतिरंजित मूल्यांकन केलेले असते त्याला असतो .

   वाढलेली असहायता :

 हे दुय्यम मूल्यांकन आहे ज्यात व्यक्तीची  संभाव्य धोका वा भीतीला सामना देण्याची क्षमता आणि त्याच्याकडच्या जमेच्या बाजूंचे निष्कर्षात्मक मूल्यांकन केले जाते .येणाऱ्या परिस्थितिला तोंड देण्याची माझी खरोखर क्षमता आहे काय ? ह्या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर व्यक्तीमध्ये  अगतिकता /असहायतेचि भावना निर्माण करते आणि त्याची एंक्झाइटी वाढवते.

प्राथमिक धोक्याचे मूल्यांकन, दुय्यम असहायतेचे मूल्यांकन  निर्माण करते  किंवा आपण असे हि म्हणू कि संभाव्य धोका किंवा हानीच्या अनुमानात्मक प्रक्रियेत हे दोन्ही एकाचवेळी कार्य करतात.  धोक्याचे मूल्यांकन च्या प्रमाणात असहायतेचे मूल्यांकन वाढले तर एंक्झाइटी पीक पॉईंट वर जाते . आपण आधीचे कुत्रा भुंकण्याचे उदाहरण पहिले , त्यात जर तुम्हाला तुम्ही आधी  एखाद्या कुत्रासोबत खेळण्याचा अनुभव असेल तर तो अनुभव जमेस धरून आपण त्याला हाताळू शकतो हा विश्वास तुमची असहायतेची भावना कमी करून एंक्झाइटी कमी करते .

   सुरक्षा माहितीकडे दुर्लक्ष :

यामध्ये आपल्याकडच्या जमेच्या बाजू किंवा माहितीकडे  ,क्षमतेकडे दुर्लक्ष केले जाते .ह्यामुळे धोक्याच्या मूल्यांकनामध्ये उपयोगी माहिती दडपली जाऊन एंक्झाइटी  वाढते तर असहायतेच्या मूल्यांकनामध्ये सामना देण्याची क्षमतेचे चुकीचे अनुमान काढले जाऊन एंक्झाइटी  वाढत राहते . ह्याचा दुसरा असं परिणाम होतो कि  व्यक्ती संभाव्य भीती किंवा धोका टाळण्यासाठी अतर्कसंगत मार्गाचा वापर केला जातो . उदा stage anxiety   चा व्यक्ती माझे  चारचौघात हसू होईल ह्या संभाव्य भीतीने लोकांसमोर वा सभेत बोलण्याचे टाळतो . आपल्या आधीच्या उदाहरणात पाहिल्याप्रमाणे जर आपण कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आल्यावर संभाव्य धोक्याच्या मूल्यांकनात जर सुरक्षित माहितीचा वापर केला जसे कि हा कुत्रा बांधलेला असू शकतो  किंवा तो घरच्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भुंकत असेल तर आपली भीती कमी होते.      

अयोग्य चिंतनशील किंवा रचनात्मक विचार :

जेव्हा आपण चिंतात्मक अवस्थेत असतो तेव्हा योग्य रचनात्मक विचाराना जागा नसते .   योग्य रचनात्मक विचार हे संथ आणि तर्कसंगत आणि परिणामकारक असतात कारण त्यांना पूर्ण परिस्थीतीचे अवलोकन करून आपले प्राथमिक आणि दुय्यम मूल्यांकन तपासून आपल्याकडची सुरक्षा माहितीचा उपयोग करण्याबद्दल चे  आराखडे मांडायचे असतात . चिंताअवस्था असलेल्या व्यक्ती अस्वस्थ असल्याने  अयोग्य ,अतर्कसंगत विचार चालू होतात . उदाहरण म्हणजे हेल्थ एंक्झाइटी असलेल्या व्यक्तीच्या मनात छातीत कसली संवेदना आली कि हार्ट अटॅक चा धोका जाणवून एंक्झाइटी  वाढते .

·        स्वतःशी अविरत क्रिया

एंक्झाइटीचा अटॅक हा काही सेकंदापासून काही तासापर्यंत राहतो . काही GAD चे लोक म्हणतात कि त्यांच्यापासून चिंता कधीच दूर जात नाही . एखाद्या दुष्टचक्रासारखी चिंता स्वतःशी अविरत फिरत राहून टिकून राहते . एकदा का चिंताविकार कार्यरत झाला कि वेगवेगळ्या क्रियेद्वारे तो व्यक्तीशी अविरत प्रक्रिया करत राहतो. प्रथम चिंता अवस्थेत व्यक्तीचे लक्ष स्वतःकडे केंद्रित होते ,त्यामुळे एंक्झाइटी निर्माण करणारे विचार आणि वागणे त्याच्या लक्षात येते आणि हा अतिजागृतपणा हि एंक्झाइटी वाढवते. दुसरे म्हणजे चिंतात्मक अवस्थेमध्ये काही प्रसंगी व्यक्तीचे वर्तन हि बिघडून जाते . जसे कि एक्झाम  एंक्झाइटी मध्ये पेपर देताना व्यक्ती पूर्णपणे ब्लॅन्क होते किंवा तिला खूप घाम सुटतो . ह्या लक्षणांकडे लक्ष दिल्याने व्यक्तीची पेपर  लिहिण्याच्या क्षमतेवर साहजिकच परिणाम होतो . आणि शेवटी एंक्झाइटी चे अँक्सिअस व्यक्तीने केलेले अनुमानात्मक निष्कर्ष हि हे चक्र कार्यरत ठेवतात .अँक्सिअस व्यक्ती एंक्झाइटी अवस्थेचे अतिशय भीतीदायक चित्रण मनात करुन लवकरात लवकर ह्यातून सुटका झाली पाहिजे नाहीतर अजून काही तरी वाईट घडेल असे अतिरंजित संभाव्यता निर्माण करून चिंता/ काळजी / भीती वाढवत राहतात . ह्या पद्धतीत व्यक्ती खरोखरच  " चिंताग्रस्त होण्याच्या भीतीने चिंताग्रस्त होतो .

·        कॉग्नेटिव्ह प्रायमसी    :

एंक्झाइटी चे कॉग्नेटिव्ह मॉडेल सांगते कि सगळ्या एंक्झाइटीचा केंद्रबिंदू हा धोक्याची मानसिक संकल्पना आहे जो संभाव्यतेचे अतिरंजित आणि  अवास्तव धोकादायक चित्रण तयार करतो आणि वास्तवात तोंड देण्याच्या च्या क्षमतेला  अतिशय दुबळा , कमजोर,असहाय ,अगतिक करतो . ह्यातून असे दिसते कि भीती वा चिंताविकार  निर्माण होण्यास आणि ती टिकून राहण्यास सुरुवातीच्या पायरीमध्ये निर्माण झालेले  बोधनात्मक घटक  वा कॉग्निटिव्ह फॅक्टर्स हे प्राथमिक कारण ठरते . जसे आपण कुत्रे भुंकण्याचा उदाहरणात पहिले कि व्यक्तीचे पहिले बोधन मला धोका आहे असेच झाले होते . स्वच्छतेच्याओब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डरमध्ये व्यक्तीचे चिंता वाढवणारे बोधनात्मक घटक "घाण माझ्यासाठी हानिकारक आहे" असतात.

एंक्झाइटी च्या कॉग्नेटिव्ह(बोधनीक)मॉडेल चे केंद्रीय सिद्धांत कडे काळजीपूर्वक पाहिल्यास असे लक्ष्यात येते कि एंक्झाइटी ला कारणीभूत ठरणाऱ्या मानसिक संकल्पना व्यक्तीचे  विचार ,भावना आणि वर्तन प्रभावित करतात .

High Anxiety = ↑ threat probability/severity + ↓ coping and safety

 Low Anxiety = ↓ threat probability/severity + ↑ coping and safety

 Moderate Anxiety = ↔ threat probability/severity + ↔ coping and safety

·        कॉग्निटिव्ह बिहेव्हरल थेरपी आणि एंक्झाइटी

कॉग्निटिव्ह बेहेविअरल थेरपी  चे साधे सूत्र आहे ; "आपण ज्याप्रक्रारे विचार करतो त्याप्रकारे घडतो " आणि चिंताविकार मध्ये हि उपचाराची सुरुवात हि विचारांच्या दिशेपासून होते. सर्वसाधारणपणे व्यक्तीला  आपले विचार आपल्याला अस्वस्थ करतात हे ओळखता येत नाही ; ते  प्रसंग , घटना वा इतर व्यक्तींना आपल्या  अस्वस्थतेसाठी जबाबदार धरतात . साधारणपणे व्यक्ती आपल्या चिंतेला / टेन्शन ला आपल्या बोधनात्मक  विचारांपेक्षा इतर बाह्य घटकांना जबाबदार धरतात . उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर परीक्षेला बसणार आहे आणि त्याने येणार पेपर खूपच अवघड असेलअसे अनुमान काढले  तसेच त्याने केलेल्या तयारीवर  विश्वास नसेल तर पेपर द्यायच्या आधीची त्याची anxiety  वाढलेली असेल . तेच जर परीक्षेला बसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने पेपर सोपा असेल असे अनुमान काढले आणि त्याचा त्याच्या तयारीवर विश्वास असेल तर त्याची एंक्झाइटी  कमी असेल .

कॉग्निटिव्ह थेरपी मध्ये पुढील गोष्टींवर भर दिला जातो :

एंक्झाइटी सायकोएज्युकेशन : ह्यामध्ये सायकोथेरपीस्ट कडून व्यक्तीला चिंताविकार  म्हणजे काय , त्याचे लक्षणे आणि उपचारपद्धतींविषयी माहिती दिली जाते .तसेच त्याला चिंताविकार चे निदान का केले गेलेय कोणत्या प्रकारचा चिंताविकार आहे त्याची लक्षणे ह्याबद्दलही शिक्षित केले जाते . व्यक्तीला विचार  ,भावना आणि वर्तन  ह्या त्रिमूर्तींमधील आपसातील संबंध शिकवला जातॊ

प्रसंग : वर्गात प्रक्टिकल चे प्रेसेंटेशन देणे

विचार : प्रेझेंटेशन देताना अडखळलो किंवा महत्वाचे पॉईंट्स विसरलो तर माझ्यावर हसतील

भावना : अस्वथ आणि भीती

वर्तन : बोलताना गडबडने ,अडखळणे वा प्रझेंटेंशन च्या दिवशी गैरहजर राहणे

कॉग्निटिव्ह (बोधनीक) पुनर्रचना   : बोधनीक पुनर्रचना ह्यामध्ये व्यक्तीचे अयोग्य आणि अतर्कसंगत मानसिक  संकल्पना शोधण्यात थेरपिस्ट मदत करतात .तसेच हे जे काही अयोग्य आणि हानिकारक विचार भावना वर्तन आहेत त्याना योग्य आणि उपायकारक विचार भावना आणि वर्तन च्या दिशेने प्रवाहित करतात . प्राथमिक धोक्याचे मूल्यांकन आणि द्वितीय असहाय्यतेचे मूल्यांकन, सुरक्षिततेच्या माहितीचा योग्य वापर हे सगळे घटक ह्या पुनर्रचनेमध्ये येतात . हा थेरपीचा महत्वाचा भाग असतो . तसेच इथे संकल्पनांची पुनर्बांधणी केली जाते जेणेकरून चिंताविकारमधील व्यक्ती चे निष्कर्षात्मक घटक अधिक सकारात्मक आणि तर्कसंगत उपायकारक बनतात . ह्यात  थेरपिस्ट काही कॉग्नेटिव्ह टेक्निक शिकवतात ज्याची व्यक्तीने प्रॅक्टिस करणे अपेक्षित आहे .

एक्सपोजर अँड सिस्टिमिक डिसेन्सीटायझशन : ह्यात व्यक्तीला  ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टीच्या कमी तीव्रतेपासून जास्त तीव्रतेपर्यंत सामोरे जाण्यास शिकवले जाते . जसे एखाद्या स्टेज अंक्सझाइटी च्या मुलाला आधी / जणांच्या ग्रुप समोर बोलण्यास लावणे , नंतर / जणांचा ग्रुप नंतर १०/१५ जणांच्या ग्रुप समोर बोलण्यास तयार करणे अश्या पद्धतीने त्याला हळूहळू जास्त लोकांसमोर बोलण्यास तयार करणे .

सिस्टिमिक डिसेन्सीटायझशन मध्ये  ज्या  गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीची हळूहळू सवय करून घेऊन त्याबद्दलची भीती कमी करणे . जसे एखाद्या पॅनिक डिसऑर्डर च्या व्यक्तीला गर्दीत त्याला पॅनिक अटॅक येऊ शकतो हि भीती वाटत असते तर त्याला मिन साठी गर्दीच्या ठिकाणी थाम्बायला लावणे हि वेळ हळूहळू  वाढवत नेवून त्याची भीती कमी करने . ह्यात सवय हा घटक महत्वाचा ठरतो .

रीलॅक्ससेशन : ह्यात व्यक्तीला रिलॅक्स करण्याचे वेगवेगळे टेक्निक शिकवले जातात .


माइंडफुलनेस थेरपी आणि एंक्झाइटी

माईंडफुलनेस थेरपी मध्ये व्यक्तीमध्ये सजगता आणि जागरूकता निर्माण केली  जाते . वेगवेगळ्या मेडिटेशन च्या टेक्निक ने व्यक्तीला चालू क्षण मध्ये राहण्याचे ट्रेनिंग दिले जाते तसेच आपल्याला घाबरावणाऱ्या विचारांना ओळखणे, त्यांना तटस्थपणे पाहणे आणि त्यांच्यापासून पळ न काढता भीतीदायक विचारांना आणि भावनांना सामोरे जाण्यास शिकवले जाते .

ह्या थेरपीमध्ये अँक्सिअस व्यक्तीला आपल्या भावना आणि विचारांप्रती तटस्थपणा , नॉन - जजमेंटल व्ह्यू , सजगता आणि जागरूकता ह्या स्किल्स शिकवल्यामुळे त्या आपल्या एंक्झाइटी ला बळी न  पडता त्यावर मात करू शकतात .

औषधोपचार आणि  सायकोथेरपी ह्या एकत्र उपचार पद्धतीमुळे आपण

एंक्झाइटी वर सहजपणे मात करू शकतो .

 

रोहिणी फुलपगार

Psychotherapist

7840908441

themindtalks4u@gmail.com

 





 

Post a Comment

2Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Thank you so much madam खुप छान clear झाल what is anxiety and how to overcome it ....🙏

    ReplyDelete
Post a Comment