Internet Addiction Disorder (IAD) Today's Highest Important Factor...

TheMindTalks
0

 इंटरनेट एडीक्शन डीसओर्डर. (IAD)


आताच्या काळात इंटरनेट आणि मोबाईल हि व्यक्तीची महत्वाची गरज बनली आहे. करोना नंतर तर इंटरनेट हे आपल्या आयुष्याचा एक भागच झाला आहे. आर्थिक,शैक्षणिक घटकांचे आयाम बदललेत. बहुतेक सगळे व्यवहार हे इंटरनेट च्या माध्यमातून केले जातात. इंटरनेट ने महत्वाचा भाग होवून आपल्या आयुष्यात अतिक्रमण केले आहे. आपण ह्या मायाजाल च्या जास्तीत जास्त अधीन होत चाललो आहोत , इंटरनेट अधिक वापराने व्यसनाधीन व्हायला लागलो आहोत .

इंटरनेट च्या ह्या व्यसनामुळे मानसिक आरोग्याबाबत नवनवीन समस्या निर्माण होत आहेत, ज्याला Cyber Psychiatrist Disorder किंवा  Internet Addiction disorder  असे म्हटले जाते .

हे इंटरनेट अडीक्शन वेगेवगळ्या प्रकारचे असते जसे कि - 

सतत नवीन माहिती शोधण्याचा अनियंत्रित आवेग (compulsive information seeking) :  ह्यात व्यक्तीला सतत वेगवेगळी माहिती शोधण्याचा छंद जडतो. ती माहिती शोधणे गरजेचे नसले तरी सतत वेगवेगळ्या साईट ना  भेट देणे व त्यावरील माहिती वाचत राहणे ह्याचे व्यसन जडते.

इंटरनेट जुगार आणि खेळ व्यसन (online gaming and gambling addiction) : ह्यात व्यक्ती प्रोग्राम केलेल्या खेळांच्या अधीन होतात . तसेच इंटरनेट वरील जुगाराच्या जसे रमीसारख्या खेळाच्या मोहाचे बळी ठरतात. इंटरनेटच्या माध्यमातून सतत गरज नसताना खरेदी (online shopping ), ट्रेडिंग चे व्यसन जडले जाते .

सायबर नातेसंबंध व्यसन (cyber relationship addiction) : ह्यात व्यक्ती इंटरनेट च्या माध्यमातून निर्माण झालेल्या नातेसंबधामध्ये गुंतून जातात. तसेच नवनवीन आभासी नातेसंबध निर्माण करण्याकडे कल वाढतो.  वास्तव नात्यांपेक्षा आभासी नात्यांना जास्त महत्व  दिले जाते त्यामुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात .

सायबर लैंगिक व्यसन  (cyber sex addiction ): ह्यात व्यक्तीला इंटरनेट च्या माध्यमातून लैंगिक दृश्ये जसे कि पोर्नोग्राफी बघण्याचे किंवा ते डाऊनलोड करण्याचे व्यसन जडते .

इंटरनेट अडीक्शन डीसओर्डर. (IAD) मुळे व्यक्तीला पुढील समस्यांना सामोरे जावे लागते :

Ø  शारीरिक ,मानसिक आणि सामाजिक समस्या निर्माण होतात .

Ø  आत्मविश्वास कमी होतो , स्व-आदर आणि सुरक्षिततेची भावना कमी होते .

Ø  नैराश्य ,चिंताविकार वाढतात . स्वभावामध्ये आक्रस्ताळेपणा आणि चीडचीड निर्माण होते .पटकन राग येतो. झोपेच्या समस्या, जेवणाच्या समस्या वाढतात

Ø  एकाग्रता कमी होत जाते परिणामी कार्यक्षमतेवर नकारत्मक परिणाम होतो .

Ø  शारीरिक आरोग्याच्या समस्या जसे कि पाठदुखी ,मानदुखी , स्नायूदुखी, डोकेदुखी सुरु होते. डोळे कोरडे होत जातात, दृष्टीदोष निर्माण होतो . अपचनाचा त्रास  आणि एसिडीटी सुरु होते .

Ø  एकटेपणा वाढत जावून एकलकोंडेपणा निर्माण होतो . इंटरनेट शिवाय इतर कृतीन्मधील आवड निघून जाते

Ø  कुटुंबामधील संवाद संपून विसंवाद वाढतो त्यामुळे वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वास्थ बिघडते .

Ø  आर्थिक संकट निर्माण होते .

इंटरनेट अडीक्शन डीसओर्डर. (IAD) वरील उपाय :

ह्यात महत्वाची गोष्ट हि आहे कि पूर्णपणे इंटरनेट वा मोबाईल चा वापर बंद करणे हा ह्यावर उपाय नाही .

त्यासाठी पुढील काही गोष्टी अमलात आणाव्यात :

·       I.A.D बद्दल जास्तीत जास्त जागरुकता वाढवणे.

·      इंटरनेट आणि मोबाईल चा वापर गरजेपुरता करणे ह्यासाठी स्वतःवर आणि मुलांवर काही बंधने लादून घेणे .

·       जास्तीत जास्त सामाजिक आणि कौटुंबिक सहभाग वाढवणे .

·      काही मानसिक समस्या मुळे जसे कि डिप्रेशन, ओ.सी.डी. चिंताविकार, एकटेपणाची आणि अगतिकतेची तीव्र भावना ह्यामुळे जर इंटरनेट चा अतिवापर वाढला असेल तर त्यावर मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून उपचार व मार्गदर्शन घेणे .

·   इंटरनेट आणि मोबाईल च्या वापरामुळे विचार भवना आणि वर्तन ह्याबाबत समस्या निर्माण होत असतील तर त्यावर मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून उपचार व मार्गदर्शन घेणे .

·       कौटुंबिक संवाद वाढवणे आणि सुसंवाद करणे .

·       इंटरनेट अडीक्शन डीसओर्डर ला सामोरे जाण्यासाठी च्या कॉपिंग स्किल्स विकसित करणे .

·       सामाजिक आणि कौटुंबिक आधार देणे . स्व-संयम निर्माण करणे .

आपण इंटरनेट आणि मोबाईल चा संयमित आणि नियंत्रित वापर करून व स्वंयशिस्त च्या मदतीने इंटरनेट अडीक्शन डीसओर्डर ला आपल्यामधून हद्दपार करू शकतो .

  

Rohini Phulpagar

Psychologist

9604968842

Themindtalks4u@gmail.com

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)