Attachment, Detachment & Awareness..!

TheMindTalks
4

 Attachment, Detachment & Awareness..!


परवा मी आणि माझे एक मित्र गप्पा मारत बसलो होतो, आम्ही दोघे ही समवयस्क असलो तरी मानसशास्त्र ह्या क्षेत्रात ते खूपच सिनिअर आहेत. तर आम्ही गप्पा मारत होतो, दोघांचा इंटरेस्ट विषय psychology असल्याने त्या संदर्भात चर्चा किंवा गप्पा होतात. बोलता बोलता आम्ही attachments, detachment ह्या पॉईंट्स वर आलो .आम्ही दोघेही आपापल्या संकल्पना आणि मते मांडत होतो.

   Attachment गुंतणे, संलग्न असणे, detachment अलिप्त राहणे आणि awarwness म्हणजेच साक्षीभाव..
  यातले पाहिल्या दोन क्रियाआपल्या सगळ्यांच्याच खूप जवळच्या आहेत आणि आपलं आयुष्य ही ह्या दोन क्रियेत बहुतांशी विभागले जातेय असे मला वाटते.
     सकाळी उठल्यापासून आपली attachment सुरू होते..आपण खूप साऱ्या गोष्टींशी attached असतो.अगदी चहाच्या कपापासून बस मधील ठरलेली सीट वा ऑफिस मधले आपले टेबल! आजूबाजूचे नाते आणि नातेवाईक, मित्र मैत्रिणी, शेजारी आणि आता social media वरचे न पाहिलेले दोस्त मंडळी ! बरं हे तुमचे  त्या त्या घटका बरोबर नुसतेच गुंतणे नसते तर त्या प्रत्येक घटका बरोबर च्या attachment सोबत expectations पण असतात.    तुम्ही म्हणाल की व्यक्ती /नात्यांच्या attachments सोबत expectations असतात पण वस्तू पासून कसल्या expectations? 

  किती जण मोबाईल काही कारणास्तव 3/4 तास charge नाही झाला, बंद पडला तर डिस्टर्ब होतात किंवा आपल्या ठरलेल्या सीट वर आपल्या वेळेत दुसरेच कोणी बसलेय हे पाहून किती जणांना राग येतो किंवा आवडता शर्ट /ड्रेस खराब झाला तर किती जण चिडचिड करतात !म्हणजे आहेत ना अपेक्षा वस्तूपासून पण!!
आणि ह्या अपेक्षा दुसऱ्या पार्टीकडून असल्या तरी ओझे मात्र स्वतः वर लादून घेतले जाते त्यामुळेच attachment किंवा गुंतणे हे जास्त त्रासदायक बनत जाते..
बरे आता जर detached व्हायचं तरी प्रॉब्लेम!अलिप्त व्हायचं म्हणजे एकदमच वैरागी होऊन जायचं.. काही संबंध नाही तुझा नि माझा! बरं ही अलिप्तता पण सुखदायक नाही..अलिप्तता आली की कोरडेपणा वाढतो. हा कोरडेपणा खूप सारे प्रॉब्लेम्स नव्याने निर्माण करतो.
 हे जे atachment/detachment  किंवा कश्यात गुंतून,संलग्न राहणे वा अलिप्त होणे हे काही नेहमीच त्रासदायक नसते.आपले जे कनेक्टेड असने असते ते पण आपण खूप आनंददायक करू शकतो आपण! आपल्याला आनंद आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या गोष्टींशी कनेक्ट वा attach होऊन!
उदा. मी सकाळी morning walk करताना mindful walk करते म्हणजे मी त्या स्पेसिफिक वेळे शी कनेक्ट होते.. माझे श्वास, शरीराची चालताना होणारी हालचाल ह्यांच्याशी attachment वाढवते त्याच वेळी मी detached पण होते..कशाशी तर तो क्षण सोडून भूतकाळात जमा झालेल्या वेळेशी, घटनांशी, तसेच भविष्यात काय वाढून ठेवलंय ह्या विचारानशी! म्हणजे एकाच वेळी मी attached ही आहे आणि detached ही!
      
Morning walk करताना क्षितीजातून हळूहळू  येणारा लालबुंद गोळा, त्याचा कोवळा सूर्यप्रकाश, सकाळी जाणवणारी थंड फ्रेश हवा ह्या सगळ्यांशी मी connect होत असताना समोर निसर्ग healthy detachment शिकवत असतो !
सूर्य कधी क्षितिजावर रेंगाळताना पाहिलाय का? तो किती सहजपणे क्षितिजाशी अलिप्त होऊन समोर विस्तीर्ण पसरलेल्या आकाशा कडे निघतो.. बरं हे अलिप्त होणे पण कोरडे नसते! आपल्या विविध रंगी छटा तो विखरून जातो! हे दृश्य खूप काही शिकवून जाते...साक्षीभाव शिकवते!
तसे निसर्ग आपल्याला सदा न कदा काही तरी शिकवत असतो फक्त आपले अवधान पूर्ण उघडे केले पाहिजे.. 
आता तर पानगळ आणि नवी पालवी फुटण्याचा मौसम सुरू आहे. एखाद्या वृक्षा च्या एका फांदीवर नवी पालवी फुटलेली असते,नवीन कोवळी पोपटी पाने त्यांचे अस्तित्व त्या वृक्षा शी बांधून घेत असतात आणि त्याच वेळी दुसऱ्या एखाद्या फांदीवरचे एखादे जीर्ण पान हळूच आवाज न करता त्या वृक्षाशी असलेली त्याची संलग्नता /गुंतवणूक एकदम सहजरित्या सोडून देत असते!
   
सहज मनात विचार येत असतो की ह्या परस्पर विरोधी क्रिया ज्या वृक्षा वर घडतात तो जर विचार करू शकत असता तर काय बरं विचार केला असता त्याने ? येणाऱ्याचे स्वागत करू आनंदोत्सव साजरा करू की जाणाऱ्या ला थांबवून ठेवू? इतक्या दिवसांची साथ सुटत आहे म्हणून दुःख करू? पण तो वृक्ष ह्या सगळ्या चक्राशी awarenesa दाखवतोय.. तटस्थ पणे ह्या दोन्ही क्रिया अनुभवत असतो.. ह्यालाच तर साक्षीभाव म्हणतात ना!
निसर्ग वसंतातला फुलोत्सव जेवढा साक्षी भावाने अनुभवतो तेवढ्याच साक्षीभावाने शिशिर मधली पानगळ, ग्रीष्मातला असह्य उकाडा, हेमंत मधील कडाक्याची थंडी आणि वर्षातील पावसाची झड पण अनुभवतोय..
पण कधी निसर्ग चक्र थांबले का? वसंतातला फुलोत्सव खूप नयनरम्य आहे, मानभावन आहे म्हणून तो वसंता बरोबर attachmen लांबवत नाही.. शिशिर मधील पानगळ नकोशी वाटते, निरुत्साही वाटते म्हणून तो detachecd होत नाही, ह्या प्रक्रिये पासून अलिप्त राहत नाही..निसर्ग ऋतूनुसार होणारे बदल बघतो, उपभोगतो  आणि बदल स्वीकारत जातो.. त्या बदला मध्ये गुंतून ही राहत नाही, कोरडे राहून अलिप्त पणे बदल बघत ही नाही पण हे सगळे अनुभवताना साक्षीभाव जपतो.  

हे सगळे आपल्या भोवताली घडतेय तर आपण ही निसर्गाला गुरु मानायला काय हरकत आहे? आपण ही शिकू शकतो ना attachment, detachment आणि अवेअरनेस ची कला त्याचाकडून! पण हे इतक्या सहजी नाही होत आपल्याकडून.
मीच माझ्या मित्राला परवा म्हणत होते की इमोशनल गुंतवणूकीतून बाहेर पडायला खूप जणांना त्रास होतो, त्यावर त्यांचं म्हणणं असं की खूप जणांना हा त्रास आहे की त्रासाचं illusion आहे (विभ्रम) आहे ह्यात फरक करता येत नाही आणि मग attachment ही punishment होते.
(भावनिक भ्रम/विभ्रम हे स्वतंत्र लेखाचे विषय आहेत.. वेळ मिळाला की त्यावर लिहिल)
इथे मला कमळाच्या पानांची आठवण येते! खूप लोक अलिप्ततेचे उदा.देताना कमळांच्या पानांचं देतात की ते पाण्यात राहून ही ओले होत नाही किंवा त्याचावर पाणी थांबत नाही.. पण मला ते साक्षीभवाचे,अवेअरनेस चे उत्तम उदा वाटते. कमळाचे पान पाण्याच्या थेंबाला आपल्यात घेते, तो इकडून तिकडे घरंगळत जाणारा थेंब पाहत आनंद घेते आणि परत अलगद पाण्यात सोडते.. स्वतः ओले न होता!
  पानाने कसे आल्या त्या क्षणाचा जेवढ्या उत्कटतेने आनंद घेतला तेव्हढ्याच साक्षीभावाने तो क्षण संपल्याचे पण स्वीकारले.
    हा अश्या प्रकारचा अवेअरनेस आपण आपल्या विचारात ,भावनांमध्ये आणि रोजच्या  आयुष्यात आणू शकलो की attachment आणि detachment च्या खेळात आपण अडकणार नाही. सोप्पं आहे हे करणं पण!
  
आला तो क्षण /प्रसंग मग तो आनंदाचा, दुःखाचा, अपेक्षा पूर्तीचा, अपेक्षा भंगाचा कोणताही असो उत्कटतेने जगायचा आणि तो क्षण/प्रसंग संपला की तेवढ्याच खुल्या उदार मनाने तो भूतकाळात जमा झाल्याचं मान्य करायचे आणि नवीन क्षणाला तयार राहायचे.. कोणत्या च क्षणात/प्रसंगात कुठल्याही अपेक्षेने न गुंतता!जगात कोणतीच गोष्ट, मग ती व्यक्ती, तिचा स्वभाव, नाते, वस्तू , विचार, भावना कायम टिकणारी नाही. हा अवेअरनेस एकदा आला की कमलदलाप्रमाणे स्वतः ओले न होता आलेला क्षण आनि जाणारा क्षण उपभोगता येतो.

"शेवटी काय, कोरडेपणा वाढला की तडा जातो आणि खुप ओल असेल तर शेवाळ वाढते...!!!!"

रोहिणी फुलपगार
सायकॉलॉजिस्ट,सायकोथेरपिस्ट
+91 96049 68842

Post a Comment

4Comments

  1. Khup chhan lekh ahe ...🙏👌

    ReplyDelete
  2. Thought provoking article. कमळाच्या पानाचं उदाहरणं एकदम योग्य

    ReplyDelete
Post a Comment