
द सिक्रेट इंग्रीडिएंट्स
(The secrete ingredients )
कुंग
फु पांडा हा
मूव्ही ज्यांनी ज्यांनी
पाहिलाय त्यांना गुंगवून ठेवतो
! मला स्वतःला ही
कुंग फु पांडा च्या
सगळ्या सिरीज प्रचंड
आवडतात ! मी कुंग फु पांडा जेव्हा
जेव्हा बघते तेव्हा दरवेळी
मला त्यातून काहीतरी नवीन
सापडतच असते ! काल एका चॅनेल वर
हा लावला होता . त्यातील एक
दृश्यात पांडा निराश
होऊन त्याच्या डॅड
कडे जातो , डॅड त्याला
धीर देत असताना
एक सीक्रेट सांगायला
लागतात , " तुला
आज मी माझ्या
खास स्पेशल सूप
चे रहस्य सांगतो !" पांडा एकदम
उत्सुकतेने ऐकायला लागतो.. डॅड
इकडे तिकडे बघत पुढे
सांगू लागतात ," माझ्या एकदम
खास अश्या स्पेशल सूप चे
रहस्य आहे मी
त्यात घालत असलेले
माझे स्पेशल घटक
आणि मसाले ! " पांडा अजून
लक्ष देऊन ऐकतो !
" आणि ते खास, स्पेशल घटक म्हणजे............ कोणतेच घटक
नाहीत !!"
आता आश्चर्यचकित होण्याची वेळ पांडा ची असते! मग डॅड समजावयाला लागतात, "माझ्या बाळा! एखादी
गोष्ट स्पेशल होण्यासाठी त्यात काही खास,घटक वा काही खास गुणधर्म शोधण्याची गरज नसते !
एखादी गोष्ट स्पेशल, खास बनवण्यासाठी आपल्याला त्यात जास्तीचे घटक टाकण्यापेक्षा त्या "स्पेशल वा खास"असण्यावर विश्वास ठेवावा लागेल ! मग ती गोष्ट आपोआप खास आणि स्पेशल होते ! "
मनापासून
आवडलं !! मी खास आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे हा
माझ्यावरचा विश्वास मला भरपूर आत्मविश्वास देऊन जातो ! मी स्पेशल आहे याची पावती किंवा मी स्पेशल आहे याचा पुरावा मी उगाचच आजूबाजूला शोधत असते . प्रत्येक नात्यात मी पार पाडलेल्या भूमिकेवरून माझे खास असणे ठरते आणि ते ठरवणारे पण मी सोडून बाकी सगळे असतात ! माझे नातेवाईक मला किती गुण देतात यावरून मी सुद्धा माझे स्पेशल असणे, नसणे ठरवते. प्रोफेशनल जगात किंवा
सामाजिक जगात मला मिळणाऱ्या शाबासकी वरून मी स्वतःला खास मानते वा माझ्यावर होणाऱ्या टीकेवरुन मी माझे खास असणे नाकारते !
का होत असेल
बरे असे माझ्याकडून ?
आपली
माणसांची एक प्रवृत्ती असते, आपल्याकडून प्रत्येक व्यक्तीला त्यात स्वतःला सुद्धा काही कंडिशन वा अपेक्षा लावल्या जातात , ह्या अपेक्षा लावणे पण कळतनकळतपणे होत असते. मी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
आणि प्रत्येक भूमिकेत अशीच वागली किंवा
वागलो गेलो पाहिजे ! माझ्याकडून जर ह्या टप्प्यांवर वा ह्या भूमिकांमध्ये माझ्या अपेक्षे नुसार वर्तन किंवा कृती नाही झाल्या, तर मी अयशस्वी, अपयशी ठरते/ ठरतो ! इथे माझे खासपण वा स्पेशल असणे माझ्या मी निर्माण केलेल्या नियमांवर अवलंबून असते !
हेच
आपण आपल्या आजूबाजूच्या
माणसांमध्ये पण पाहतो! आपण बनवलेल्या अटींमध्ये समोरच्या
व्यक्ती बसत नसतील, त्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर आपण त्यांचे वेगळ्या पद्धतीने मूल्यमापन करतो!
आपण
बनवलेले नियम पाळले गेले नाही तर
आपण त्यांचे खास असणे, स्पेशल असणे नाकारतो! ह्या प्रवृत्तीमुळे आपण आपल्याला, स्वतःला जसे आहोत तसे पाहू शकत नाही, असेच
समोरच्या व्यक्तींबाबत पण घडते! समोरची व्यक्ती फक्त माणूस म्हणून आपण पाहात नाही,प्रत्येकामध्ये स्वतःला पाहिजे ते गुणधर्म शोधायचा प्रयत्न करतो, स्वतः मध्येही हा शोध
चालूच ठेवतो त्यामुळेच बहुतेक आपण
आपला निखळ आनंद गमावून बसलोय !
कोणतीही अट वा कंडिशन न लावता स्वतःकडे बघायला शिकलात आणि स्वतःला स्वीकारायला शिकलात की तुमच्यातले स्पेशल असणे तुम्हाला कोणी न सांगता जाणवेल ! हाच नियम आजूबाजूच्या माणसांबाबतही लागू
होतो ...समोरच्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही कोणती अपेक्षा वा कंडिशन न लावता बघता, स्वीकारता तेव्हा त्याचे खास असणे, त्याचे स्पेशल असणे तुम्ही ओळखलेले असते !
जेव्हा आपण नदीच्या पाण्यामध्ये आपले प्रतिबिंब बघत असतो त्यावेळी ती नदी तुम्हाला तुम्ही आहे तसे दाखवतेच पण तुमच्या आजूबाजूला असलेली झाडे, तुमच्या चेहऱ्याजवळचे गवत, रानफुले आणि डोक्यावर असलेले
आकाश आहे तसे दाखवते
! काही अटी नसतात, अपेक्षा नसतात!! त्या वाहत्या नदी प्रमाणे
आपण ही आपल्या जगण्याला विना अट स्वीकारले तर आपले जगणे हे किती स्पेशल आहे, खास आहे हे दुसऱ्यांनी येऊन सांगायची गरज लागत नाही !
पांडा त्या दैवी स्क्रोल मध्ये जी वैशिष्टय शोधत असतो की जी त्याला ड्रॅगन वोरीयर म्हणून स्पेशल बनवणारी असतात, त्या मध्ये स्वतःचे प्रतिबिंब बघून नाराज होतो पण त्याच्या डॅड चे सिक्रेट इंग्रिडिएंट चे रहस्य ऐकून आपल्या प्रतिबिंबाकडे एका वेगळ्या आणि आत्मविश्वास पूर्ण नजरेने बघतो, तेच त्याला खास, स्पेशल बनवते !
आपण
ही आपल्यातील खास, स्पेशल इंग्रिडिएंट शोधणारी नजर आपल्या प्रतिबिंबावर टाकायला हरकत नाही !!
रोहिणी फुलपगार
क्लिनिकल
सायकॉलॉजिस्ट सायकोथेरपिस्ट
9604968842
www.evergreeneverhappy.blogspot.com