टीकास्त्र
(भाग २)
टीकास्त्रा सामोरे जायचे असेल तर कसे जायचे ?
आपल्या
पुराणांनुसार सगळ्या अस्त्रांना तोड आहे अगदी ब्रम्हास्त्राला सुद्धा ! मग टीकास्त्र
कसे अपवाद ठरेल? टीकास्त्राला सामोरे जाण्यासाठी एक वेगळे शस्त्र व्यक्तीला तिच्यात
निर्माण करावे लागेल ! त्याची जडणघडण व्यक्तीला तिच्या विचारांत, स्वतःत, खूप आतमध्ये
करावी लागेल !
ऑना इलेनार रुझवेल्ट म्हणतात, " तुमच्या संमतीशिवाय दुसरे कोणीही तुमच्या मनात कनिष्ठपणाची वा गौणत्वाची भावना निर्माण करु शकत
नाही "
त्याचप्रमाणे तुमची कितीही कठोर
आलोचना झाली वा टीका झाली तरीही जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला अधिकार वा परवानगी देत नाही तोपर्यंत कोणीही तुमच्यात
दुखावलेपणाची वा स्वतःबद्दल शरमेची भावना निर्माण
करू शकत नाही.
आपल्यावरील
टीकेला / आलोचनेला सहज आणि सकारात्मक पद्धतीने सामोरे जाण्यासाठी व्यक्तीने प्रयत्नपूर्वक
पुढील कौशल्य आत्मसात करायला पाहिजेत :
A.
स्वतःला आहे तसे स्वीकारणे
: इतरांच्या मान्यतेसाठी धडपड करण्यापेक्षा ,इतरांच्या नजरेत स्वतःची प्रशंसा / कौतुक बघण्याची आपली आस
पोसायची सोडून स्वतःला आहे तसे स्वीकारायाला हवे. जेव्हा व्यक्ती समोरच्यांकडून मान्यतेची
वा सन्माननीय वागणुकीची अपेक्षा ठेवते तेव्हा ती स्वतःला गौण स्थानी मानते म्हणजे जर
तिचे महत्व कोठे अधोरेखित होत नसेल तर ती आनंदी राहू शकत नाही ! व्यक्तीचे आनंदी असणे,
समाधानी राहणे हे इतरांनी अधोरेखित केलेल्या अर्थावर, इतरांच्या दृष्टीने असलेल्या
महत्वावर अवलंबून असते! मग अश्या लोकांकडून टीका झाल्यावर वा त्यांच्या नजरेत प्रशंसा
ऐवजी नाराजीची झलक दिसली की व्यक्ती विचलित होते. आता आपल्याला महत्व मिळणार नाही,
मी जी काही अर्थपूर्ण होते, ती पत वा क्रेडिट
आपण गमावल्याची तिची धारणा होते मग इतरांना खुश
करण्यासाठी, त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याची व्यक्तीची धडपड सुरु होते ! आपल्यावर
होणारी टीका /आलोचना कशी ही
करून टाळणे वा थांबवणे हा
ह्या सगळ्या धडपडीचा उद्देश असतो
पण जेव्हा व्यक्ती तिचा स्वतःचा गुणदोषा सकट
स्वीकार करायला लागते तेव्हा तिला इतर लोक
तिच्यात शोधत असलेल्या आणि आलोचना होत असलेल्या वैशिष्ट्यांची गरज वाटत नाही
आणि फरक ही पडत नाही त्यामुळे ती तिच्या व्यक्तिमत्वाचे
एखाद दुसऱ्या गुणधर्मा आधारे परीक्षण करून स्वतःचे नकारार्थी मूल्यांकन नाकारते !
" माझे काही वागणे, राहणीमान समोरच्याला
आवडत नसेल, पण म्हणून मी त्यासाठी स्वतःला दोष देऊन माझ्यात गौणत्व नाही निर्माण करणार
! "
" माझ्या बिझनेस पार्टनर ला माझे निर्णय
आवडत नाही ह्याचा अर्थ असा नाही की माझी निर्णय
क्षमता कमकुवत आहे, माझा माझ्या कुवतीवर पूर्ण विश्वास आहे ! "
" माझ्या मित्रांना माझा भिडस्त स्वभाव
आवडत नाही याचा अर्थ मी समाजात वावरण्यास लायक नाही असा होत नाही, मी माझ्या पध्दतीने
समाजात योग्य रीतीने मिसळत आहे ! "
" माझे राहणीमान माझ्या पतीला गावंढळ वाटत असेल याचा अर्थ
असा नाही की मी योग्य पत्नी नाही, मी मला कम्फर्टबल
अश्या पेहरावात आत्मविश्वासपूर्ण पत्नीची सगळी कर्त्यव्य करतेय ! "
" माझा बॉस माझ्या कामावर टीका करतोय म्हणजे
मी अकुशल कामगार आहे असे नाही, मला माझ्या
कामाचे योग्य आणि पुरेसे ज्ञान आहे जे मी कुशलतेने वापरतोय ! "
ज्यावेळी आपण स्वतःला कोणत्याही मापदंडाशिवाय
स्वीकारायला लागतो ना तेव्हा आपण इतरांच्या
नजरेतून वा चष्म्यातून स्वतःकडे पाहण्याचे सोडून देतो. एकादा हे सोडून देणे जमले कि आपल्याला
ना नाकारले जाण्याची
भीती वाटते ना कोणाच्या
नजरेतुन पत घसरण्याची !
B.
स्वतःचे परीक्षण : आपल्यावरील टीकेमुळे / आलोचनेमुळे आपल्यात कोणत्या
भावना, कोणते विचार निर्माण होतात हे पाहणे.
त्यासाठी टीकेला रिस्पॉन्स देण्याआधी एक दोन मिनिटे पॉझ घेऊन मनात उठलेले तरंग त्रयस्थपणे
पाहणे ! टीकेला, आलोचनेला कोणता अर्थ लावला
जातोय वा टीकेचा कोणता अर्थ काढला जातोय, तो अर्थ का काढला जातोय ह्याचे वस्तुनिष्ठ
परीक्षण करणे.
"माझ्या राहणीमानावरून माझ्यावर टीका होतेय,
माझ्या पतीने अशी टीका करू नये हि अपेक्षा
आहे आणि तरीसुद्धा तो करतोय म्हणून मी दुखावलेय का? " दुखावल्याच्या भावनेने
मी अस्वस्थ होत आहे ? "
"माझे मित्र मी भिडस्त असल्यामुळे मी समाजात
मिसळू शकत नाही अशी टिपण्णी करतात, माझ्यात हे स्किल्स कमी आहे हे मला लज्जास्पद वाटतेय
का? "
"माझ्या पार्टनर ने माझ्या निर्णयात ढवळाढवळ
करू नये अशी माझी अपेक्षा असताना तो माझ्या निर्णयक्षमतेवर प्रश्न करतोय म्हणून मी
दुखावलोय का? तो कमी लेखतोय, मला दुखावतोय, ह्या भावनेने मला टीका सहन होत नाही? "
अश्या प्रकारे आपल्या भावनांचे विश्लेषण करून
त्यांना व्यावहारिक आणि वस्तुनिष्ठ उत्तरे
शोधायची सवय लावू घेणे.
C.
वास्तवाचा स्वीकार करणे : व्यक्तीवर
टीका टिपण्णी केली गेलीय वा आलोचना झालीय हे
तिने स्वतः मान्य करणे. जेव्हा आपण म्हणतो की माझ्याबाबतीत समोरच्याने असे बोलायला
नको होते, वागायचे नव्हते, त्यावेळी आपण समोरच्या व्यक्तीचे वर्तन नाकारण्याचे प्रयत्न
करत असतो ! पण व्यक्तीने जर त्या टीकेचा जागरूकपणे
स्विकार केला तर तो उघडया डोळ्यांनी आपल्या वरील टीका टिपण्णीच्या कन्टेन्टकडे पाहू
शकतो ! आलोचना ज्या वैशिष्ट्यांवर, गुणधर्मांवर होतेय, ते घटक जर खरच तुमच्या प्रगतीच्या
आणि सुधारणेच्या आड येत असेल तर नक्कीच सुधारणा करायला वाव आहे. अश्यावेळी टीका करणाऱ्या
बाबत पूर्वग्रह बाजूला ठेवणे कधीही चांगले !
पण तुमचे वैशिष्ट्य, गुणधर्म तुमच्या प्रगतीला
वा सुधारणेला बाधा ठरत नाही, फक्त समोरच्या व्यक्तीला खटकतात म्हणून त्यात काही बदल
करण्याच्या मागे न लागता सर्वांगीण विकासासाठी
त्यांच्यामध्ये अजून सुधारणा करणे.
टीकेला सामोरे जाताना व्यक्ती एवढ्या जरी तयारीने
गेली, तरी समोरून येणारी टिपण्णी, आलोचना कितीही तीव्र, जहाल असो, व्यक्तीचे प्रतिसाद
देणे, विचलित होणे हे तिच्या स्वतःच्या नियंत्रणात
असेल ! हे नियंत्रण जमले की टीकास्त्र तुमच्या दृष्टीकोणापुढे निष्प्रभ होईल!
आपला अमूल्य वेळ आणि जीवन हे निरर्थक टीकेच्या
/ आलोचनेच्या नकारात्मक गर्तेत गटांगळ्या खात
घालवण्यापेक्षा तिला ओलांडून पुढे जाणेच फायदेशीर ठरते !
आनंद बक्षी सरांनी पण म्हटलेच आहे, " कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम हैं
कहना I छोडो बेकार की बातों को, कहीं बित न जाये रैना..
(याआधीचा
भाग ह्या www.evergreeneverhappy.blogspot.com लिंक वर)
रोहिणी फुलपगार
सायकॉलॉजिस्ट , सायकोथेरपीस्ट
9604968842
www.evergreeneverhappy.blogspot.com