भावनांच्या ग्रे शेड्स.. ( Series..) भाग १

TheMindTalks
5

आजच्या अतिशय महत्वाच्या काळात भावभावना आपल्यावर कशा जादू करतात ते जाणून घेऊयात.!  


आपण या सिरीज मध्ये एकानंतर एक भावनांबद्दल विचार करणार आहोत .. 
...
तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा .. !  

...

"भावनांच्या ग्रे शेड्स" (सिरीज - भाग १) मध्ये तुमचे स्वागत आहे ... 



कितीतरी वेळा असे होते आपल्याला समोरचा विचारतो "काय कसे आहेत ?
आपण ही लगेच म्हणतो "आय एम फाईन, मी ठीक आहे, चांगला आहे..!

पण खरोखरच आपण ठीक असणे किंवा चांगले असणे म्हणजे काय हे आपल्याला माहीत असते का? 

आपल्यातील कितीतरी लोकांना आपली मनाची अवस्था, आपल्या भावना योग्य शब्दांत मांडता येत नाहीत कारण त्या ओळखायला आपल्याला शिकवलेच नसते ! 

त्यामुळे ओळखता ही येत नाही .! काय वाटते तुम्हाला ? 

तुम्हाला जाणवतेय तुम्ही आता कोणती भावनिक स्थिती अनुभवत आहेत ?
आपल्या भावनांबद्दल किती जागरूक आहोत आपण !

भावनिक स्थिती बद्दल जागरूकता निर्माण करण्याआधी आपण भावना म्हणजे काय ते पाहू ! भावना किंवा
इमोशन च्या खूप शास्त्रीय व्याख्या आहेत पण साधे सोपे करून सांगायचे तर "आपल्या भावना म्हणजे
विशिष्ट्य वेळी विशिष्ट्य उद्दीपकामुळे (stimulus ) अनुभवत असलेली एक जटील अनुभूती की ज्यामुळे आपल्या
शारीरिक आणि मानसिक अवस्थेत बदल तर होतोच तसेच त्याचा आपल्या विचार आणि वर्तनावर ही प्रभाव
पडतो. 

थोडक्यात काय तर एका विशिष्ट्य अनुभवाला दिली जाणारी प्रतिक्रिया की जिचे पडसाद आपल्या
शरीरावर ,मनावर उमटतात आणि ते पडसाद आपले विचार आणि वर्तन पण ठरवतात.

आपल्या कडून दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया किंवा आपल्या ह्या भावना किती प्रकारच्या असतात ? 
आपल्याला किती माहिती आहेत? 


जेव्हा आपण आपल्या मनाची अवस्था वर्णन करतो तेव्हा आनंदी, ख़ुशी, दुःखी, निराश, राग ह्याच्यापुढे बहुतेकदा आपण जात नाही . बरोबर आहे, आपल्या ह्या भावना सकारात्मक आणि नकारात्मक असतात

पण हे हि माहित असणे महत्वाचे आहे की नकारात्मक भावनांमध्ये उपयुक्त नकारात्मक भावना आणि त्रासदायक नकारात्मक भावनांचे वर्गीकरण येते. 

आता तुमच्या मनात आले असेल की सकारात्मक भावनांचा काय आणि कसा फायदा होतो हे सगळ्यांनाच माहीत आहेत, पण नकारात्मक भावना कश्या काय उपयुक्त वा फायदेशीर असतात? हे समजून घेण्याआधी उपयुक्त नकारात्मक भावना कोणकोणत्या असतात ते जाणून घेऊया !

काळजी, दुःखी,पच्छाताप, निकोप राग, निकोप मत्सर,निकोप शत्रुत्व, नाराजी खेद ह्या साऱ्या उपयुक्त भावना आहेत

आता हानिकारक नकारात्मक भावना जाणून घेऊ : चिंता,नैराश्य,अपराधीपणाची भावना (gult ), अपेक्षाभंग (hurt ), हानिकारक राग,हानिकारक शत्रुत्व,हानिकारक मत्सर,स्वतःबद्दल शरमेची भावना(shame). आता तुम्हाला ह्या भावना वाचतानाच हळूहळू लक्षात येत असेल की हानिकारक आणि उपयुक्त भावनांमध्ये काय फरक आहे !

आपण सतत सकारात्मक भावना नाही अनुभवत किंबहुना नकारात्मक भावना जास्त अनुभवतो ! 

पण ज्यावेळी ह्या नकारात्मक भावना आपल्यामध्ये असतात त्यामुळे आपल्या जगण्यातील आनंद, आवड कमी होत जाते . मग आपण डायरेक्ट नकारात्मक भावनेकडून सकारात्मक भावनेवर उडी नाही मारू शकत. हे असे लगेच वळणे जमत नसल्यामुळे आपण त्या भावनांमध्ये अडकून पडतो. अगदी सरळ करून सांगायचं तर बोगद्याच्या एका टोकाला तुम्ही एखाद्या नकारात्मक भावनेने उभे आहेत दुसऱ्या टोकाला सकारात्मक भावना आहे की जी तुम्हाला हवी आहे पण हे जे मधले अंतर आहे ते एका उडीत पार करता येत नाही मग ह्या अंतराचे काय करायचे ? 



इथे आपल्याला उपयुक्त नकारात्मक भावना मदतीला येतात ! 


बघा ना, चिंता(anxiety ) वाढवण्यापेक्षा काळजी (concern ) करणे ,नैराश्यात (depression ) जाण्यापेक्षा नाराजी, अपराधीपणाचे ओझे बाळगण्यापेक्षा पच्छाताप, अपेक्षाभंग कुरवाळत बसण्यापेक्षा खेद हि काही उदाहरणे झाली .

उपयुक्त नकारात्मक भावनामध्ये जरी नकारात्मक दृष्टिकोन दिसत असला तरी ह्या वास्तववादी असतात म्हणजे नकारात्मक घटनांबद्दल नकारात्मक जाणीव निर्माण होते पण त्यात हरवून न जाता त्या तुम्हाला परिस्थितीचे योग्य अवलोकन करू देतात. उदा. उपयुक्त मत्सर मध्ये आपल्याला समोरच्या व्यक्तीचा मत्सर का वाटतोय? त्याच्या कोणते गुण आपल्यात नाही आणि ते साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न करतो म्हणजेच काय तर आपण आपल्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो ! हानिकारक मत्सर मध्ये असे काही न घडता आपण ज्या व्यक्तीचा मत्सर करतो...

त्याबद्दल सतत रागात असतोच पण त्याच वेळी मी त्या सारखा नाही ह्या विचाराने स्वतःलाहि कमी लेखत असतो !

आपल्याला सगळ्यांना आपल्याला कोणती भावना जाणवू नये हे कळते पण त्याबदल्यात कोणती भावना आपण जाणवू शकतो हे माहीत नसते .

वेगवेगळ्या भावभावनांचे इंद्रधनू आपल्यात असणे हे आपल्या मनुष्यपणाचे एक लक्षण आहे, पण म्हणून फक्त दोनच पूर्ण नकारात्मक वा पूर्णसकारात्मक भावना आपण अनुभवायला पाहिजे हे मानणे पण योग्य नाही मधल्या ही भावना अनुभवल्या पाहिजेत,जाणून घेतल्या पाहिजेत!


----------

दुसऱ्या भागात आपण पाहुयात "उपयुक्त नकारात्मक भावना.."
...
काय आहेत ह्या इंद्रधनू मधील मधल्या भावना... ज्या सकारात्मक आणि नकारात्मक भावनांच्या मधल्या भावना असतात ??????




Rohini Phulpagar
www.GetHealthyMind.in

Post a Comment

5Comments

Post a Comment