पर्सनॅलिटी आणि पर्सनॅलिटी थेअरीज

TheMindTalks
3

 

पर्सनॅलिटी आणि पर्सनॅलिटी थेअरीज

 

 1.पर्सनॅलिटी  

   

आपण जेव्हा एखाद्याबददल प्रभावित होतो आणि त्याच्याबद्दल बोलतो किंवा आपल्याला कोणाचे वर्णन करायचे असेल तर, "त्याची पर्सनॅलिटी च तशी आहे " ,किंवा "काय जबरदस्त पर्सनॅलिटी आहे !" असे म्हणतो . एखाद्याचे वागणे आवडले नाही तरी "तो असाच वागणार ! पर्सनॅलिटी मध्येच प्रॉब्लेम आहे." अशी आपली वाक्ये असतात. किंवा एखादा व्यक्ती दिसायला आकर्षक वाटलं नाही तरी “किती गबाळी पर्सनॅलिटी आहे”! असा  ठप्पा मारून मोकळे होतो. इतके सहजपणे आपण ह्या " पर्सनॅलिटी " शब्दाला वापरत असतो पण आपल्यातील कित्येकांना पर्सनालिटी म्हणजे एकंदर काय आहे ,त्याचा आपल्या व्यक्तिमत्व विकासात काय भूमिका असते हे माहित नसते.

पर्सनॅलिटी ह्या शब्दाला मराठीत व्यक्तिमत्व असे म्हणतात; पण पर्सनॅलिटी हाच शब्द सामान्यपणे आपल्या बोलीभाषेत आपण वापरतो !

ह्या आर्टिकल मधून आपण पर्सनॅलिटी म्हणजे काय ; वेगवेगळ्या मानसशात्रज्ञानानी मांडलेल्या पर्सनॅलिटी च्या वेगवेगळ्या थिअरीज ; त्यांची   व्यक्तीच्या एकूण व्यक्तिमत्व विकासात असणारी भूमिका ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत .

पर्सनॅलिटी ह्या शब्दाचा उगम ज्या पर्सोना नावाच्या शब्दापासून झालाय त्याचा अर्थ होतो मुखवटा ! एक नट  रंगमंचावर वावरताना एखाद्या भूमिकेसाठी मुखवटा धारण करतो ; पेर्सोना चा अर्थ हा मुखवटा आहे.  आणि बहुतेक त्यामुळेच आपण नॉर्मली  व्यक्तीचे बाह्य वर्णन, बाह्य स्वरूप ,दिसणे ,पेहराव  आणि त्याचे बाह्य वर्तनावरून एखाद्याची पर्सनॅलिटी ठरवतो . व्यक्तीचे बाह्यस्वरूप म्हणजे  त्याचे दिसणे, रंगरूप , त्याची शरीरयष्टी , कपड्यांची स्टाईल , बोलण्याची आणि हावभाव वा व्यक्त होण्याची पद्धत, त्याच्या सवयी म्हणजे एकूण काय तर आपल्याला दिसत असलेली त्याची छबी ! त्यामुळेच ज्याची हि छबी आकर्षक त्याची पर्सनॅलिटी आकर्षक  आणि ज्याची छबी अश्या मापदंडात बसत नाही त्याची पर्सनॅलिटी अनाकर्षक असे आपण ठरवून टाकतो !

 


पण वास्तवात  असे नसते ! फक्त बाह्य गुणधर्म व्यक्तीची पर्सनॅलिटी ठरवत नाही !

                    जर बाह्य गुणधर्म हेच पर्सनॅलिटी चे मापदंड असतील  तर आपण जॉर्ज वॉशिंग्टन ,  डॉक्टर बी.आर.आंबेडकर , जॉर्ज कार्व्हर,अब्राहाम लिंकन .महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री , बाराक ओबामा , ह्यांची पर्सनॅलिटीचे कसे आणि कुठे मूल्यांकन करणार कारण ह्या थोर लोकांचे बाह्य दर्शन आकर्षक कॅटेगरीत मोडणारे नाही !

इथे आपल्या हे लक्षात येते कि पर्सनॅलिटी म्हणजे असे काहीतरी आहे कि ज्यात बाह्य स्वरूप आणि बाह्यपैलू पेक्षा अधिक वेगळे घटक समाविष्ट आहेत.


पर्सनॅलिटी हि अश्या काही वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत आणि बाह्य गुणांची गोळाबेरीज असते कि जे  व्यक्तीला इतरांपासून वेगळे आणि एकमेवाद्वितीय बनवते.

पर्सनॅलिटी च्या अनेक व्याख्या आहेत,पण मानसशात्राच्या दृष्टीकोनातून पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तीची आपल्या भोवतालच्या वातावरणाचे ,परिस्थितीचे अवलोकन करून  भावनिक ,वैचारिक आणि वर्तना द्वारे त्या त्या परिस्थीतीशी समायोजन करण्याची विशिष्ट आणि एकमेवाद्वितीय शैली .

ह्यातून आपल्या लक्षात येते कि पर्सनॅलिटी मध्ये फक्त व्यक्तीचे रंगरूप , शरीरयष्टी , कपड्यांची फॅशन एवढेच येत नाही तर व्यक्तीचे विचार ,भावना , आकलन , बुद्धिमत्ता,मानसिकता , दृष्टीकोन ,समायोजन क्षमता , वर्तन हे सगळे घटक येतात .

पर्सनॅलिटी हि व्यक्तिनिष्ठ असते म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटी मध्ये फरक असतो . अगदी एकाच गर्भाशयातून जन्मलेल्या आणि एकाच घरात वाढलेल्या दोन जुळ्या भावंडाची पर्सनॅलिटी हि भिन्न असते . अश्या भावंडांचे बाह्य रूप कितीही एकसारखे असले तरी विचार ,भावना ,आकलन , मानसिकता वर्तन हे वेगळे वेगळे असतात . हेच घटक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळे करतात .

अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे पर्सनॅलिटी हि दगडावरची रेघ नसते , ती वेळेनुसार काळानुसार,अनुभवानुसार बदलत असते.

    आपल्यासमोर लहानपणापासून ते आतापर्यत अनेक व्यक्ती येतात. काही काही त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वागण्याने बोलण्याने खूप काळ  आपल्या लक्षात राहतात. आपण कधी  कधी हि व्यक्ती अशी का आहे ह्या बद्दल विचार करत असतो किंवा आपल्यात ,स्वतःत  हि असे अनेक पैलू आढळतात, ज्याबद्दल आपण विचार करायला लागतो कि मी असा का आहे !   माझे वागणे असे का असते !  

 व्यक्ती व्यक्तीमधील हा फरक का असतो , एकाची पर्सनॅलिटी दुसऱ्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटी शी तंतोतंत का जुळत नाही ह्याची कारणे शोधण्याचा फार पूर्वीपासून प्रयत्न चालू आहे . असे कोणते घटक आहेत कि जे व्यक्ती ची विशिष्ट  पर्सनॅलिटी निर्माण करण्यात कारणीभूत आहेत ह्याबद्दल अनेक शास्त्रज्ञानामध्ये  मतमतांतरे आहेत . प्रत्येकाने आपले मत सिद्ध करण्यासाठी  वेगवेगळे थेअरी वा सिद्धांत  मांडलेत .

असे चार महत्वाचे  सिद्धांत पर्सनॅलिटी च्या निर्मिती आणि विकासात  महत्वाचे मानले जातात :

सायकोअनलाइटिक थेअरी

ह्युमॅनिस्टिक थेअरी

ट्रेट थेअरी

बिहेव्हिरिस्ट थेअरी

सायकोअनलाइटिक थेअरी : ह्या सिद्धांत नुसार व्यक्तीची  पर्सनॅलिटी  हि त्याच्या अंत:प्रेरणेचे आणि पालकांच्या प्रभावाचे सारांश असते .

ह्युमॅनिस्टिक थेअरी :  ह्युमॅनिस्टिक सिद्धांत सांगते की व्यक्ती आंतरिकदृष्ट्या चांगले असतात, त्यांच्यामध्ये स्वतःला अधिकाधिक चांगले बनवण्याची  जन्मजात ओढ असते. हा सिद्धांत व्यक्तीच्या स्व संकल्पनेच्या आधारावर तयार केला जातो, ज्यामध्ये व्यक्तीचे स्वतःबद्दलची आदर्श  'स्व' ची संकल्पना  आणि प्रत्यक्षातील  'स्व'  ह्यांचा समावेश असतो !

ट्रेट थेअरी :  हा सिद्धांत असे मानतो की पर्सनॅलिटी  ही आंतरिक आणि स्थिर गुणधर्म वैशिष्ट्यांनी बनलेली असते .

बिहेव्हिरिस्ट थेअरी : ह्या सिद्धांतानुसार एखादी पर्सनॅलिटी निर्माण होण्यात शारीरिक आणि अनुवांशिक घटकांपेक्षा बाह्य वातावरण आणि सामाजिक घटकांची  महत्वाचा भूमिका असते . या सिद्धांतानुसार, पारितोषिक आणि शिक्षेद्वारे वर्तन शिकवले जाते आणि शिकवलेल्या वर्तनातून पर्सनॅलिटी ला घडवले जाते .

त्यातील काही महत्वाचे सिद्धांत आपण ह्या आर्टिकल च्या पुढील भागांमध्ये  पाहणार आहोत.

 (क्रमश:)

( पुढील भागात जाणून घेऊ सिगमंड फ्रॉईड ची सायकोअनलाइटिक  थेअरी ) 

 

ROHINI PHULPAGAR

PSYCHOTHERAPIST

9604968842

 

 

Post a Comment

3Comments

Post a Comment