पर्सनॅलिटी आणि पर्सनॅलिटी चे सिद्धांत च्या मागच्या भागात आपण पर्सनॅलिटी बद्दल माहिती घेतली , ह्या भागात पर्सनॅलिटी विकासातील सुरुवातीची आणि महत्वाची थेअरी बद्दल माहिती घेणार आहोत .....
मनोविश्लेषणाचा सिद्धांत म्हणजेच सायकोअनलाइटिक थेअरी
सायकोअनलाइटिक थेअरी म्हणजेच मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडनारे डॉक्टर सिगमंड फ्रॉइड हे एक ऑष्ट्रीयन न्यूरॉलॉजिस्ट होते . त्यांचे मानसशात्र ह्यामध्ये महत्वाचे योगदान आहे. मनोविश्लेषणाचा सिद्धांत मुळे मानसशात्रात अनेक संशोधनाना चालना मिळाली. फ्रॉइड ह्यांनी आपल्या क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये डिप्रेशन आणि अँक्सिटी च्या पेशंट च्या निरीक्षणातून आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडला आहे , त्यात वेळोवेळी कालानुरूप बदल केलेत आणि झालेत .
डॉक्टर सिगमंड फ्रॉइड ह्यांनी सायकोअनलाइटिक थेअरी
तीन भागात विभागली :
१ टोपोग्राफिकल मॉडेल ज्यामध्ये मनाच्या
संरचनेचा समावेश केलाय.
२ पर्सनॅलिटी संरचना मॉडेल ज्यामध्ये अंतःप्रेरणा आणि इच्छांच्या सिद्धांत चा समावेश केलाय
३ मनोलैंगिक (सायकोसेक्सुअल) मॉडेल ज्यामध्ये पर्सनॅलिटी विकासाचे टप्पे मांडले आहेत .
आपण प्रत्येक सिद्धांतविषयी च्या प्रत्येक भागाविषयी जंणून घेणार आहोत
टोपोग्राफिकल मॉडेल (1916-17) :
डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी मनाला हिमनगाची उपमा दिली आहे , हिमनग जसा एकूण आकाराच्या एकपट भाग पाण्यावर असून जो दिसतो व
नऊपट भाग पाण्याखाली असून तो दिसत नाही
तसेच मनाचे हि आहे. आपल्याला जाणवत असलेले
मन हे मनाचा एकपट भाग आहे कि जो सचेतन ,जागरूक आहे पण आतमध्ये खोलवर असलेले नऊपट भाग हा अवचेतन आणि
निद्रिस्त आहे .
डॉक्टर सिगमंड फ्रॉइड ह्यांनी मनाला तीन भागात विभागले :
अवचेतन मन
निद्रिस्त मन
सचेतन मन : आपले विचार ,कृती , इच्छा ,अपेक्षा, आठवणी ह्या सगळ्याबद्दल जाणीव असलेले आणि त्यानुसार आपल्याला मार्गदर्शित करणारे आपली चेतना म्हणजेच आपले सचेतन मन ! व्यक्ती काय विचार करत आहे आणि काय वर्तन करत आहे हे व्यक्तीला पूर्णपणे माहित असते . पण ह्या जागृत मनावर अवचेतन आणि निद्रिस्त मनाचा प्रभाव असतो . एखादी व्यक्तीच्या काय इच्छा आहेत, काय विचार आहे हे तिला माहित असते पण त्या इच्छा किंवा तसे विचार का आहेत ह्याबद्दल व्यक्ती अनाभिज्ञ असते . उदा . एखादी व्यक्ती जर गाडी चालवत असेल तर गाडीचा स्पीड, ट्रॅफिक, आजूबाजूचा निसर्ग, स्वतःच्या शरीरातील संवेदना , विचारप्रक्रिया ह्या सगळ्याबद्दल मनात जागरूक क्रिया चालू असतात .
अवचेतन मन : अवचेतन मन अश्या गोष्टी साठवत असते कि ज्यावेळी व्यक्तीला गरज असेल त्यावेळी त्या जागृत मनात प्रवाहित करता येतील . बहुतेक वेळा जागृत मन ह्या अवचेतन मनातील घटकांविषयी अनभिज्ञ असते , पण ट्रिगर फॅक्टर मिळाला कि सचेतन मनाला अवचेतन मनातील घटकांची जाणीव होते
उदा . एखादी व्यक्ती शांतपणे पुस्तक वाचत बसली आहे, जेव्हा आजूबाजूला लोक आवाज आणि गोंगाट करतात तेव्हा ती व्यक्ती रागात येते आणि आजूबाजूच्या लोकांना आवाज किंवा गोंगाट कमी करण्याबद्दल सूचित करते. जेव्हा व्यक्ती पुस्तक वाचत असते तेव्हा जागृत मन हे पुस्तकातील घटक आणि
आजूबाजूचे वातावरण ह्याबद्दल जागरूक असते , रागाचा लवलेश हि नसतो , पण त्याला पोषक घटक मिळाल्यामुळे तो अवचेतन मनातून सचेतन मनात प्रवाही झाला .
निद्रिस्त मन : निद्रिस्त मन हे आपल्या सगळ्या अंतःप्रेरणा,आपल्या धारणा , सुप्त इच्छा ,आकांक्षा ,ध्येय उद्दिष्टे,
आपल्या भावना , दडपलेल्या कटू आठवणी आणि प्रतिमांचे भांडार असते . निद्रिस्त मनाला आपण सहजासहजी स्पर्श करू शकत नाही पण आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वावर किंवा पर्सनॅलिटी च्या विकासात निद्रिस्त मनाचा प्रभाव असतो . हे निद्रिस्त मन सुप्त ज्वालामुखीसारखे आहे, त्यातील घटक जरी सचेतन मनात प्रवाही होत नसतील तरी सचेतन मनाच्या सगळ्या क्रिया, विचार प्रक्रिया , वर्तन निद्रिस्त मनातील घटक मार्गदर्शित करत असतात.
उदा . एखादी व्यक्ती जर प्रत्येक कामात परफेक्ट चा फारचआग्रह धरत असेल तर यामागे त्याच्या निद्रिस्त मनातील लहानपणची एखादी कटू आठवण वा कोणीही मला कोणत्याही बाबतीत नावे ठेवू नये हि सुप्त आकांक्षा असू शकते कि जी व्यक्तीलाही ज्ञात नसते.
डॉक्टर सिगमंड फ्रॉइड ने पुढे जाऊन 1923 ला टोपोग्राफिकल मॉडेल मध्ये सुधारणा करत पर्सनॅलिटी विकासाचे संरचनात्मक मॉडेल मांडले; त्यानुसार पर्सनॅलिटीचे तीन घटक सांगितले गेले : ईड, इगो , सुपर इगो. आणि हे तिन्ही घटक मिळून व्यक्तीच्या जटिल व्यक्तिमत्वाला आकार देतात.
पर्सनॅलिटी संरचना मॉडेल (1923-49)
- ईड
: हा एक असा घटक आहे कि जो व्यक्तीच्या जन्मापासून त्याच्या पर्सनॅलिटी सोबत असतो ;
हा पैलू पूर्णपणे निद्रिस्त असून आदिम आणि सहजप्रवृतीच्या वर्तनाचा ह्यात अंतर्भाव असतो . फ्रॉइड च्या मते आपल्या मानसिक ऊर्जेचे
ईड हे
स्रोत असून त्यापासून पर्सनॅलिटी चे प्राथमिक घटक निर्माण होतात. ईड चे कार्य हे आनंद तत्त्वाद्वारे चालते कि ज्यात आपल्या सर्व इच्छा ,वासना गरजा ह्यांचे
तातडीने
समाधान होण्याची धडपड चालू असते ,.जर या गरजा ताबडतोब पूर्ण झाल्या नाहीत तर परिणामी व्यक्तींमधे चिंता , तणाव निर्माण होतात .उदाहरणार्थ, भूक किंवा तहान वाढल्यास त्वरित
खाण्याचा किंवा पिण्याचा
प्रयत्न केला जातो . ईड
आयुष्याच्या प्राथमिक टप्प्यात खूप महत्वाचा आहे, बाळाच्या गरजा भागल्या जातात कि नाही हे त्यामुळे सुनिश्चित होते .जर अर्भक भुकेले किंवा अस्वस्थअसेल तर
तो किंवा ती ईड च्या
मागण्या पूर्ण होईपर्यंत रडतील. तथापि, या गरजा त्वरित पूर्ण करणे नेहमीच वास्तववादी किंवा अगदी शक्य नसते. जर व्यक्ती
पूर्णपणे आनंदाच्या तत्वानुसार
वागत राहिली तर ती व्यक्ती आपली लालसा पूर्ण करण्यासाठी इतरांच्या मालकीच्या वा हातातील वस्तू हिसकावून घेतील असे आढळेल .अशा प्रकारचे वर्तन विघातक
आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य असेल.
फ्रॉईड च्या मते ईड आनंद तत्वामुळे निर्माण झालेला ताण
प्राथमिक प्रक्रियेद्वारे कमी करण्याचा
प्रयत्न करते ज्यात ईड इच्छित गोष्टीची गरज पूर्ण करण्यासाठी त्याची मानसिक प्रतिमा बनवते त्यात समाधानी होते . उदा . आपण हाय वे ला प्रवास करतोय ,आणि आपल्याला खूप भूक लागलीय पण प्रवासात हॉटेल दिसत नाही , आपण हॉटेल दिसले कि जेवू हा विचार करत गाडी चालवत असतो पण सोबत हॉटेल , जेवणाची काय ऑर्डर देणार ह्याची कल्पनाचित्र बनवत असल्याने भुकेमुळे निर्माण झालेला ताण काही प्रमाणात कमी होतो .
- इगो : इगो हा पर्सनॅलिटी चा असा
घटक आहे जो वास्तवाला सामोरे जाण्यासाठी जबाबदार असतो. फ्रॉईड च्या मते इगो हा ईड पासून विकसित होतो आणि
ईड च्या आनंदतत्वामुळे निघालेले आवेग हे बाह्य वास्तववादी जगात स्वीकार्य असतील अश्या पद्धतीने व्यक्त होतात ह्याची खात्री करतो . इगो सचेतन , अचेतन आणि निद्रिस्त मन
असे सगळीकडे कार्य करतो.
इगो चे कार्य वास्तव तत्वावर चालते ज्यात तो ईड च्या इच्छा आणि वासना वास्तववादी आणि सामाजिक दृष्ट्या योग्य मार्गाने पूर्ण होतील ह्यासाठी धडपडत असतो . वास्तव तत्व एखाद्या आवेगाला पूर्ण करायचे कि त्याचा त्याग करायचा
हे त्याच्या
फायदा आणि नुकसानीच्या निष्कर्षानुसार ठरवते . बहुतांश वेळा
ईड चे आवेगाचे विलंबनाने हि समाधान होते आणि इगो व्यक्तीला रास्त ठिकाण आणि योग्य वेळ ,काळ पाहून वर्तनाची परवानगी देतो. उदा .आपण
हाय वे ला भुकेले आहोत , हॉटेल आणि काय जेवायचे ह्याचे हि कल्पनाचित्र तयार केले पण तरीही आपण कोणत्याही कळकट ,मळकट वा अस्वच्छ ठिकाणी बसून भूक शांत करण्यासाठी कसलेही अन्न खाणार नाही , भुकेला जरा अजून
तिष्ठत ठेवून आपण योग्य जागेची आणि योग्य अन्नाची वाट बघू शकतो, ह्यासाठी इगो मदत करतो .
इगो , ईड च्या अपूर्ण आवेगामुळे म्हणजे ज्या
गरजा पूर्ण झाल्या नाहीत , त्यामुळे निर्माण होणार ताण हि दुय्यम प्रक्रियेद्वारे कमी करतो ; ह्यात तो ईड ने प्राथमिक प्रक्रियेद्वारे तयार केलेल्या मानसिक प्रतिमेशी मिळतीजुळती प्रतिमा वास्तविक जगात शोधण्याचा प्रयत्न करतो . उदा. व्यक्तीने अन्नाची जी मानसिक प्रतिमा तयार केलीय त्यानुसार हॉटेल मध्ये जेवण ऑर्डर करतो .
- सुपरइगो : पर्सनॅलिटी विकास मधील
शेवटचा घटक म्हणजे सुपरइगो. सुपर इगो हा व्यक्तीच्या पर्सनॅलिटी चा असा घटक आहे कि ज्यात
आपले पालक आणि समाजाकडून मिळालेल्या आणि आपल्या कुवतीनुसार चांगले वाईट ठरवलेल्या नैतिक मापदंडाचा आणि आदर्श मूल्यांचा अंतर्गत साठा असतो . सुपर इगो अनुमानात्मक निर्णय घेण्यासाठी व्यक्तीला मार्गदर्शन करतो . डॉक्टर सिगमंड फ्रॉइड च्या मते, वयाच्या पाचव्या वर्षी सुपर इगो उदयास येऊ लागतो.
सुपरइगो चे दोन भाग आहेत:
१. इगो आयडियल ज्यामध्ये चांगल्या वर्तनाचे मापदंड आणि नियमांचा समावेश आहे. पालक आणि
व्यक्तीच्या दृष्टीने
महत्वाच्या असलेल्या इतर
व्यक्तींना रुचेल ,मान्य होईल अश्या वर्तनांचा समावेश होतो. या नियमांचे पालन केल्याने व्यक्तीमध्ये आत्मप्रतिष्ठा ,अभिमान, मूल्य जोपासल्याची आणि
पूर्णत्वाची भावना निर्माण होतात.
२ सद्सद्विवेकबुद्धी ज्यामध्ये पालक आणि समाज ह्यांच्या दृष्टीने वाईट वा त्याज्य ठरवलेल्या वर्तनाच्या
माहितीचा समावेश होतो .ही वर्तणूक बर्याचदा निषिद्ध असते आणि वाईटाकडे नेत असते ,परिणामी ,
व्यक्तीमध्ये शिक्षा किंवा अपराधीपणाची आणि पश्चात्तापाची भावना निर्माण होते .
सुपरइगो व्यक्तीचे वर्तन परिपूर्ण आणि सभ्य करण्यासाठी कार्य करते.ते ईड च्या सगळ्या अस्वीकार्य आकांक्षा आणि वासना दडपून टाकते आणि इगो वास्तव तत्वांवर काम करण्यापेक्षा आदर्श तत्वांवर कसे काम करू शकेल ह्यासाठी प्रयत्न करते . सुपर इगो हा सचेतन ,अवचेतन आणि निद्रिस्त मनामध्ये हजर असतो !
एकमेकांमधील स्पर्धात्मक घटकांमुळे ईड, इगो आणि सुपर इगो मध्ये सतत खटके उडत असतात . फ्रॉईड ने
द्वंदात्मक वा दोलायमान स्थिती असूनही विधायक कार्य करण्याच्या इगो च्या क्षमेतला इगो स्ट्रेंग्थ म्हटले आहे .चांगली इगो स्ट्रेंग्थ असलेली व्यक्ती आहे प्रभावीपणे ईड आणि सुपर इगो चा दबाव मॅनेज करण्यास सक्षम,असते
तर ज्यांच्याकडे जास्त इगो स्ट्रेंग्थ आहे
किंवा खूप कमी इगो स्ट्रेंग्थ आहे अश्या व्यक्ती विचलित होणाऱ्या आणि ताण वाहणाऱ्या असतात .
डॉक्टर सिगमंड फ्रॉइड मते, निरोगी व्यक्तिमत्त्वाची गुरुकिल्ली म्हणजे ईड, इगो आणि सुपर इगो यामध्ये योग्य समन्वय आणि संतुलन !
(
ROHINI
PHULPAGAR
PSYCHOTHERAPIST
7840908441
Email : themindtalks4u@ gmail.com
पुढील भागात आपण मनोविश्लेषण म्हणजेच सायकोअनलाइटिक थेअरी बद्दल उर्वरित माहिती जाणून घेऊ .
Very helpful and interesting knowledge is shared by you mam... We are really thankful to you, And wish to know more about this topic.
ReplyDeleteSure.. thank you
DeleteGreat knowledge explain by great person ..thanks mam..
ReplyDeletevery helpful information 👌👍
ReplyDeleteUseful information mam
ReplyDelete