सवयीची ऊर्जा

TheMindTalks
0
 

 राकेश ला एका ठिकाणी क्लायंट ला भेटण्यासाठी जायचे होतेत्यासाठी तो वेळेवर निघाला पण रस्त्यात एक दोन ठिकाणी ट्राफिक लागले, लोकांनी आडवी तीडवी वाहने घुसवली होतीपरत त्याच्या ड्राइव्हर ला गाडी काढायला जमत नव्हती. राकेश ची चिडचिड आणि राग मनातल्या मनात वाढत चालला होता . उशीर होणारमग क्लायंट काय विचार करणार ह्याबद्दल विचारट्राफिक का लागलेयलोक अश्या कश्या मुर्खासारख्या गाड्या घुसवतात , ड्राइवर पण मंद मिळालाय त्याला साधे गाडी काढता येत नाही ह्या सगळ्या विचारांनी अस्वथ होऊन जागच्याजागी चरफडणे चालू होते . एकदाचा नियोजित ठिकाणी पोहोचला पण क्लायंट ला उशीर होणार होता . परत एकदा त्याचे आतल्या आत वैतागने आणि चरफडणे चालू झाले . हे असे  प्रसंग थोड्याफार फरकाने प्रत्येकजन अनुभवत असतोच . आपण सतत धावत,पळत असतो मनाने आणि शरीराने ! मनासारखे गणित जुळून आले नाही कि वैतागत असतो; तडफडत असतो . आपली ती सवयच झालेली असते ना कारण ह्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देण्याची सवय नसते .

आपण जे सतत आणि वारंवार करतो तेच आपण असतो ! पण ह्या सवयीची आपल्याला जाणीव ही नसते . " मला खूप वेळा तसे बोलायचे नव्हते पण काय करू माझ्याकडून बोलले जाते !" मी खूप वेळा ठरवतो  कि असे वागायचे नाही किंवा असे व्यक्त व्हायचे नाही पण माझ्याही नकळत मी परत तसेच  वागतो किंवा व्यक्त होतो ." हा अनुभव हि बहुतेकांना येतोच . का आपण परत परत त्याच जुन्या पॅटर्न नुसार वागत असतो ? अशी कोणती शक्ती आपल्याला परत परत त्याच ठिकाणी नेवून उभी करत असते ? ती ताकदवान शक्ती आहे आपली सवय ऊर्जा !

आपण जिवंतपणी स्वर्गात किंवा नरकात राहू शकतो पण त्यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग आपण निवडत नसून आपली सवय उर्जाशक्ती निवडते. एक घोड्याची आणि माणसाची प्रसिद्ध झेन लोककथा आहे ; एक व्यक्ती घोड्यावरून जात असतोघोडा वेगाने पळत असतो . दुसरा व्यक्ती घोड्यावरील व्यक्तीला विचारतो कि तू कुठे चालला आहे? पहिला व्यक्ती म्हणतो घोड्याला विचार तोच मला घेऊन जात आहे! आपलेही तसेच आहे आपली सवय ऊर्जा आपल्याला मार्गदर्शित करत असते  आणि आपण ही त्यानुसार वागत असतो . सवयी ऊर्जा  आपल्या वर्तनाची पद्धत,विचार करण्याची पद्धत,समायोजनाची पद्धत, आपले आनंद,आपले दुःख ,आपली अभिव्यक्ती ह्या  सगळ्यांवर नियंत्रण ठेवते . त्यामुळेच व्यक्ती त्याच्या जिवंतपणी स्वर्ग किंवा नरक अनुभवू शकते.

आपल्यात निर्माण झालेली सवय उर्जेला सर्वस्वी आपण जबाबदार नसतो तर आपले पालक,मित्र आणि समाज ह्यांच्या कृती आणि धारणांचा हि त्यावर प्रभाव असतो ! रात्री जागून नेटफ्लिक्स वरच्या सिरीज बघण्याच्या सवयींवर मित्र आणि सोबत्यांच्या प्रभाव जास्त असतो ! अरे ला कारे उत्तर देण्याची सवय असो वा  एखाद्या व्यसनाची सवय किंवा मनात डुख धरून नंतर वचपा काढण्याची सवय ह्या सगळ्या समाज,पालक आणि सभोवतालच्या लोकांच्या धारणांनी प्रभावित असतात .

 काही सवयीचे बीज आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेले असते .

"नातू अगदी आजोबांवर गेलाय , जरा मनाविरुद्ध झाले कि आदळआपट सुरु ! " किंवा "माझी आजी अशीच होती , माझ्या मुलीसारखी तिला टापटीप लागायची, हिच्या सारखीच तिला इकडची गोष्ट तिकडे चालायची नाही !"  अशी वाक्ये अनेकांच्या परिचयाची असतील. ह्या सवयी ऊर्जा पाझरत नवीन पिढीपर्यंत पोहोचतात .

ऍरिस्टॉटल ने म्हटले आहे कि आपण आपल्या कृतींची बेरीज असतो आणि म्हणून आपल्या सवयी आपल्याला वेगळे करतात .सवयीची ऊर्जा जिथे आपल्याला एक निश्चित पद्धतीने मार्गदर्शित करत असते त्याच वेळी हे ही खरे आहे कि आपण आपली नकारात्मक हानिकारक  सवय ऊर्जा बदलू शकतो, तिला मार्गदर्शित करू शकतो . वर सांगितलेल्या झेन कथेमध्ये पहिली व्यक्ती म्हणते कि मला माहित नाही ,घोडा कुठे घेऊन चालला आहे ; पण त्या व्यक्तीच्या हाती घोड्याचा लगाम आहे आणि तो त्या घोड्याला मार्गदर्शित हि करू शकतो नि काबू हि करू शकतो! हा लगाम म्हणजे सजगतेचा, माइंडफुलनेस चा सराव ! जरी आपल्याला स्वतःला बदलण्याची कितीही इच्छा असेल तरी जोपर्यंत आपण सवयीच्या उर्जेवर काम करत नाही तोपर्यंत स्वतःला बदलू शकत नाही . माइंडफुलनेस च्या सरावाने आपण आपल्यातील सवयीचे बीज आणि त्यासोबत असणाऱ्या उर्जेला ओळखू शकतो . तिचे निरीक्षण करून रूपांतरण हि करू शकतो .माइंडफुलनेसचा सरावामुळे  आपण नवीन,अधिक कार्यात्मक सवयी ऊर्जा निर्माण  करू शकतो . समजा आपण आपल्याबद्दल एखादी नकारात्मक कमेंट ऐकली तर आपले चेहऱ्याचे हावभाव बदलतात.आपल्याला तसे करायचे नसेल हि  पण तसे ऑटोमॅटिकली होऊन जाते . हि जुनी सवय ऊर्जा बदलून तिच्या जागी नवीन सवय ऊर्जा निर्माण करताना ,जेव्हा आपण अशी नकारात्मक कमेंट ऐकतो तेव्हा जाणीवपूर्वक श्वास घ्या आणि त्यावर लक्ष केंद्रित करा . सुरुवातीला असा जाणीवपूर्वक श्वास घेणे अवघड जाईल ,तो नैसर्गिकरित्या जमणार नाही आणि त्यावर लक्ष हि केंद्रित होणार नाही  पण जसा सराव  होईल, जसजशी जाणीवपूर्वक श्वास घेण्याची सवय वाढेल  तसे हि सवय ऊर्जा निर्माण होईल आणि जुन्या सवयीला रूपांतरित करेलकाही सवयी ऊर्जा बदलणे फार कठीण आहे. जसे कि धूम्रपान ही एक सवय ऊर्जा आहे जी सोडून देणे कठीण जाते पण ह्यावर ची गुरुकिल्ली आहे माइंडफुलनेस ! जेव्हा धूम्रपान करता असू  तेव्हा माइंडफूलनेस च्या प्रॅक्टिस ने आपण जाणत असतो कि आपण धूम्रपान करत आहोत .जसजशी  ह्या सवयीच्या ऊर्जेबद्दल आपली सजगता अधिकाधिक खोलवर जाते तसे आपण आपले आजारी फुप्फुसे पाहत जातॊ . मग आपल्याला आपले फुप्फुसे ,आपले आजारपण आणि ज्यांच्यावर आपले प्रेम आहे अश्या जिवलगांमधील लिंक दिसते . आपल्याला जाणवते कि आपली काळजी घेणे म्हणजेच जे आपल्याला प्रिय व्यक्ती आहेत त्याची काळजी घेणे ! म्हणूनच आपल्या जिवलगांसाठी आपण आपली, आपल्या फुप्फुसांची काळजी घ्यायला लागतो . माइंडफुलनेस चा सराव आपल्यामध्ये अशी अंतर्दृष्टी निर्माण करतो .

आनंदी असणे,उत्साही आणि सकारात्मकअसणे  ह्यासारख्या पॉझिटिव्ह सवयी ऊर्जा असल्या तरी निगेटिव्ह सवयी ऊर्जा पटकन आणि वेगाने निर्माण होतात असे आढळून येते . आपण आपल्या नकारात्मक सवयींना ओळखले पाहिजे, त्यांना स्वीकारले पाहिजे आणि त्याचे रूपांतर अधिक सकारात्मक ऊर्जेमध्ये करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित केले पाहिजे. जेव्हा आपण आपल्या छोट्या मुलाला एखादी गोष्ट शिकवत असतो तेव्हा ती गोष्ट शिकण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगत असतो किंवा प्रॅक्टिस करून घेत असतो ,त्याच प्रमाणे आपल्याला निगेटिव्ह सवयी ऊर्जेचे पॉझीटीव्ह सवयी ऊर्जेमध्ये रूपांतरण करण्यासाठी सवयीबद्दलच्या सजगतेचा, माइंडफुलनेस चा पुन्हा पुन्हा सतत सराव करावा लागतो .भिंत रंगवताना एक कोट पुरेसा नसतो तर दुसरा ,तिसरा कोट द्यावा लागतो ह्याच पद्धतीने आपली हानिकारक सवय ऊर्जा माइंडफुलनेस च्या सरावाने कशी बदलायची हे शिकावे लागते.

 

Rohini Phulpagar

Psychotherapist

7840908441

themindtalks4u@gmail.com


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)