इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे - मोफत सिरीज - भाग 2

TheMindTalks
0


वेदना उपचारांमध्ये मानसशास्त्रचा उपयोग

Mind body soul


आज आपण वेदना उपचारांमध्ये मानसशात्र ची काय भूमिका आहे आणि त्याचा वेदनांचा उपचार करताना काय फायदा होतो ते जाणून घेवूयात.

बहुतेकांना नेहमी प्रश्न पडतो कि शारीरिक वेदना जसे मानदुखी, डोकेदुखी, कंबर, हातपाय, पोट ह्या सगळ्यांच्या वेदनांमध्ये मानसशास्त्र संबधित उपचार का सुचवीत असतात? 

मला ही माझ्या प्रॅक्टिस मध्ये अनेकवेळा हाच प्रश्न विचारला जातो कि - 

  • मॅडम माझी मान,पाठ दुखत आहे तरी मला तुमच्याकडे काऊन्सेलिंग साठी का पाठवले आहे?
  • मी काय वेडा आहे काय?

ह्या प्रश्नांच्या उत्तरांकडे जाण्याआधी आपण वेदनेबद्दल जास्त जाणून घेऊयात.

द इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ पेन नुसार वेदना म्हणजे प्रत्यक्ष ऊती दुखापतीने किंवा संभाव्य ऊती दुखापतीने निर्माण होणारा अप्रिय संवेदी आणि भावनिक व्यक्तिसापेक्ष अनुभव !

इथे व्यक्तिसापेक्ष आणि भावनिक हे शब्द महत्वाचे आहेत.

जरी वेदना ह्या वैश्विक असल्या तरी त्याच्या व्यक्तिसापेक्ष गुणधर्मामुळे  व्यक्तिनुरूप त्याची व्याख्या बदलते. वेदनेचा अनुभव हा व्यक्तिसापेक्ष आहे म्हणजे एकाच प्रकारच्या दुखापतीने वा दुखण्याने एकाच वयोगटातील,एक लिंगी, एकाच आर्थिक -सामाजिक परिस्थिती असलेल्या दोन भिन्न व्यक्तींना जाणवणारी वेदना आणि तिची तीव्रता एकसारखी नसते. उदा . एकाच वयाचे ,एकाच सामाजिक ,आर्थिक परिस्थिती असलेल्या वैभव आणि अमेय  चा एकाच वेळी अपघात होवून जर डाव्या पायाला इजा झाली तरी त्यांना होणाऱ्या वेदना आणि त्यांची त्यांना जाणवणारी तीव्रता हि भिन्न असते ! जर कारण एक आहे तर परिणाम सारखाच पाहिजे ! पण तसे घडत नाही !

... १८७३ पासून वेदना संबंधित थेओरी मांडलेल्या आहेत त्या बद्दल सविस्तर माहिती पाहुयात पुढील भागात..

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)