इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे - मोफत सिरीज - भाग 3

TheMindTalks
0

१८७३ पासून वेदना संबंधित आतापर्यत अनेक थेअरी वा सिद्धांत मांडले गेलेत... 

Mind theories
अनादि काळापासून वेदनेवर शारीरिकउपायांबरोबरच  मानसिक उपाय करायची परंपरा सुरू आहे...  

1873 पासून ज्या फेमस थेअरी आहे त्यात सामील आहेत - 

इंटेन्सिव्ह थेअरी,

स्पेसिफिक थेअरी,

स्ट्रॉन्गस थेअरी,

पॅटर्न थेअरी,

सेंट्रल स्मेशन थेअरी ! 

१९६० साली आलेल्या गेट कंट्रोल थेअरी आणि न्यूरोमॅट्रिक्स थेअरी ने दाखवून दिले कि वेदनेच्या आकलनामध्ये ,संक्रमणामध्ये आणि मूल्यांकनामध्ये मनो-सामाजिक आणि शारीरिक घटक प्रभाव पडतात आणि जुनाट वेदना वा दुखणे दीर्घकाळ टिकवून ठेवण्यात पण ह्या घटकांचा मोठा सहभाग आहे. 

ह्या थेअरीज आतापर्यंत वेदना उपचारांचा सगळा भर जो जैविक उपचारांवर होता तो बदलण्यास आणि वेदना उपचारात जैविक घटकांसोबत  मानसिक आणि सामाजिक घटकांचा समावेश करण्यास महत्वाचे कारण ठरलेल्या आहेत

Khalil Gibran

वेदनेचे स्वरूप पाहत असताना त्यात आपल्याला मानसिक घटक पुढील ठिकाणी दिसून येतात :

वेदनेची जागा : वेदनेची विशालता, वेदनेचा अनुभव (जसे जळजळ झाल्यासारखी वेदना , ठणकत असल्यासारखी वेदना,तीक्ष्ण टोकदार वस्तू टोचत असल्यासारखी वेदना )

भावनिक प्रतिसाद : तीव्र नकारात्मक  मानसिक अवस्था (जसे चिंता , मळमळणे , नैराश्य , भीती , थकून व हातपाय गळून गेल्यासारखे वाटणे )

मूल्यांकन : ह्यामध्ये वेदनेचे आकलन आणि वैचारिक प्रतिसाद (जसे सहन करू शकत नाही ,दयनीय अवस्था, वैताग आलाय, चीडचीड होतेय , ह्यापासून सुटका कधी होईल)

Lawrence Stone

दुर्दैवाने वेदना ह्या कधीच एकट्या येत नाहीत... येताना कोणाकोणाला सोबत घेऊन येतात ...?

पुढील भागात आपण ते पाहुयात ...!!!

ईथवर जर तुम्हाला व्यवस्थित समजले असेल तर आपल्या व्हाटसअप कम्यूनिटी ग्रुप वर आत्ताच सामील व्हा !!!!

आपण शिकुयात आणि आपल्या प्रियजनांनाही समृद्ध करूयात!! 

मन स्ट्रॉंग तर शरीर स्ट्रॉंग!!ही लिंक प्रत्येकाने शेअर करावी!!! 

https://chat.whatsapp.com/IXmXAXe6iDRCV73LqnFHs1


 NEXT POST:-

इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे - मोफत सिरीज - भाग 2


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)