इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे - मोफत सिरीज - भाग 1

TheMindTalks
0

 सर्वसमावेशक आरोग्याशी सुसंवाद : "मन, शरीर आणि आत्मा”

Mind, Body, Soul...

इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे म्हणजेच मन आणि शरीर आरोग्य दिन जगभरात साजरा केला जातोय त्यातील ही आहे ह्या वर्षीची थीम. 

आजच्या धावत्या जगात मानसिक आरोग्य ही अतिशय महत्वाचे झालेले आहे !!!

हा दिवस साजरा करण्याची अनेक कारणे आहेत. 

जसे की इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे आपल्या शारीरिक ,मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यामध्ये मन-शरीर ह्यामधील महत्वाचा संबंध मान्य करते. 

आधुनिक जीवनशैलीमध्ये आरोग्यसंगोपनात समग्र म्हणजेच जैविक, सामाजिक, मानसिक आणि आध्यात्मिक घटकांचा समावेश करण्यासाठी जागरूकता वाढवते॥। 

ताण तनाव व्यवस्थापन आणि मानसिक लवचिकता वाढवण्यासाठी काही कौशल्ये निर्मिती करते,

सुसंवादी जीवनाचा पाया हा स्व-काळजी आणि स्व- आदर वर अवलंबून असल्याचे दाखवून ह्यांची जोपासना करण्यास प्रोत्साहन देते.

सर्व समावेशक आणि सर्वांगीण आरोग्याच्या दिशेने वैश्विक वाटचाल करण्यास दिशा देते.

वेदनेशी मन आणि शरीर ह्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. 

जेव्हा एखादी व्यक्ति निरोगी नसते तेव्हा ती  कोणत्या न कोणत्या वेदनेमध्ये असतेच मग त्या शारीरिक वेदना असो वा मानसिक वेदना असोत ! 

शारीरिक वेदना ही मानसिकतेला अस्वस्थ करत जाते तर मानसिक अस्वस्थता शरीरात कुठे न कुठे वेदनेची अनुभूति निर्माण करते. 

चला तर मग आज इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे च्या निमित्ताने आपण वेदना उपचार आणि व्यवस्थापन करताना मानसशात्र कसे उपयोगी ठरते हयाबद्दल अगदी सर्वांना समजेल आशा सोप्या भाषेत जाणून घेवूयात.

सविस्तर माहिती पाहुयात पुढील भागात.. 

पुढील पोस्ट:-

Emotional Wellness..
मनाला पण इन्फेक्शन होते काय ?


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)