इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे - मोफत सिरीज - भाग 4

TheMindTalks
0

वेदना ह्या कधीच एकट्या येत नाहीत, वेदना नेहमी नकारात्मक भावनांसोबत येतात.

Mindfulness easy?

वेदनांच्या हातात हात घालून जोडीने येणारे नाकारात्मक भावनिक घटक म्हणजे - 

  • चिंता,
  • नैराश्य
  • राग,
  • ताण- तणाव,
  • अपराधी वाटणे,
  • दुखावले जाण्याची भावना.!

जेव्हा व्यक्ती वेदनांमधून जात असतो तेव्हा वेदना आणि वेदनेची अनुभूती व्यक्तीचे विचार आणि भावना प्रभावित करत असतात; त्याचप्रमाणे व्यक्तीच्या भावना आणि विचार सुद्धा वेदनेच्या तीव्रतेच्या आकलनावर प्रभाव टाकतात ! चिंता, नैराश्य, राग, तणाव ह्यांमुळे वेदनेची तीव्रता वाढते तशीच वेदनांमुळे सुद्धा चिंता ,राग , नैराश्य,तणाव वाढतात! वेदना आणि नकारात्मक भावना व्यक्तीला आपल्या सापळ्यात असे अडकवून ठेवतात.

 चिंतेमध्ये वेदनांमुळे काळजी,भीती, अस्वस्थता , ह्यापासून कधीच सुटका होणार नाही हा काढलेला निष्कर्ष व्यक्तीला मानसिकरीत्या दुर्बल करतो. तसेच मनात सतत दुखण्याबद्दल चे विचार घोळत असतात . जसे कि “रात्री खूप वेदना होत होत्या ,आज रात्री पण सुरु होतील . परत ते सगळे सहन करावे लागेल.” असे विचार वेदना सुरु होण्याआधीपासूनच सुरु होतात ज्या वेदनांचे ट्रिगर ठरू शकतात.

confusion

नैराश्य हा  एकटेपण, रिकामेपण, असहायता ,अगतिकता निर्माण करून मनाची दुखी अवस्था करते. वेदनांमुळे जगण्यातील ,दैनंदिन जीवनातील रुची आणि आनंद कमी होत जातो . “माझ्या वेदना कधीच दूर होणार नाहीत.  मला वेदनासोबतच जगावे लागेल मी कधीच इतरांसारखे आनंदी आयुष्य जगू शकणार नाही.” असे निराशाजनक विचार वेदना वाढवतात. 

सततच्या वेदनांमुळे स्वतःवर , कुटुंबातील व्यक्तींवर आणि एकूणच परिस्थितीवर कावल्यासारखे होते. स्वतःसकट सगळ्यांचा अगदी डॉक्टरांचा ही राग येतो .

व्यायसायिक तणाव ,  वैयक्तिक आयुष्यातील तणाव , इतरांबरोबरचे संबंध , स्वतःबरोबरच विसंवाद ह्या सगळ्या तणावामुळे वेदना टिकून राहतात .

आपल्यामुळे इतरना त्रास होतो कधी कधी हा विचार जे अपराधीपणाचे ओझे वाढवते त्याचा हि वेदना टिकून राहण्यास हातभार लागतो .

ह्या सगळ्यामुळे वेदनेने त्रस्त व्यक्ती एका दुष्टचक्रात अडकून पडते . इथे मानसिक आणि वर्तनिक असे दोन चक्र एकाचवेळी सुरु होतात

वेदना नकारात्मक भावना आणि अस्वस्थता वाढवते - मूड खालावतो - नैराश्य येते - वेदनेचे नकारत्मक आकलन निर्माण होत जाते - वेदना वाढतात . वाढलेल्या वेदना परत नकारात्मक भावना आणि अस्वस्थता वाढवतात . त्याचवेळी एका बाजूला वाढलेल्या वेदना आणि मग वेदनांमुळे शारीरिक क्रिया आणि कामे टाळणे, सतत कामे व शारीरिक क्रिया टाळण्यामुळे दैनंदिन क्रिया टाळण्याची वृत्ती वाढते - क्रिया मंदावल्यामुळे तेथील वेदना वाढतात - वेदना वाढल्याने परत क्रिया आणि कामे थाम्बवली जाणे - शारीरिक हालचाल थाम्बवल्याने तिथे वेदनांची तीव्रता वाढीस लागणे. हे असे दोन दुष्टचक्र हातात हात घालून चालत असतात.

हे जे वेदनेचे दुष्टचक्र सुरु होते ते आपला कसा घात करू शकतात..?

पुढील भागात आपण ते पाहुयात ...!!! 

ईथवर जर तुम्हाला व्यवस्थित समजले असेल तर आपल्या व्हाटसअप कम्यूनिटी ग्रुप वर आत्ताच सामील व्हा !!!!

आपण शिकुयात आणि आपल्या प्रियजनांनाही समृद्ध करूयात!! 

मन स्ट्रॉंग तर शरीर स्ट्रॉंग!!ही लिंक प्रत्येकाने शेअर करावी!!! 

https://chat.whatsapp.com/IXmXAXe6iDRCV73LqnFHs1


EARLIRE POST:-

इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे - मोफत सिरीज - भाग 3

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)