इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे - मोफत सिरीज - भाग 5

TheMindTalks
0

वेदनेचे कॉग्निटिव्ह डिस्टोरशन असतात

Cognitive Distortions
वेदनेचे जे दुष्टचक्र सुरु होते त्यात वेदनेच्या आकलनाचा मोठा भाग असतो आणि हे आकलन वेदनेशी संबंधित विचारांवर अवलंबून असते.

वेदनेचे कॉग्निटीव्ह डिस्टोरशन -  


  • वेदनेला अतिरंजित पद्धतीने पाहणे, 
  • वेदनेच्या छोट्या परिणामालासुद्धा अवास्तव मोठे करणे, 
  • वेदनेबद्दलचे विचार मनात घोळत ठेवणे आणि आपण वेदनेला सहन करूच शकणार नाही ,
  • सहन करूच शकत नाही अशी ठाम समजूत करून घेणे.

वेदनांमुळे सतत स्वतःला आणि इतरानंही दोष देणे.

  • सगळे डॉक्टर्स बिनकामाचे आहेत, 
  • माझा आजार ह्यांना सापडत नाही, 
  • मीच कमनशिबी आहे ज्यामुळे माझ्यावर योग्य उपचार होत नाही,
अश्या पद्धतीने दोषरोपन करत राहायचे. 

इतर बाकी उपलब्ध घटक लक्षात न घेता वेदनेबद्दलचा नकारत्मक निष्कर्ष काढायचा माझी ह्या वेदनेपासून कधीच सुटका होणार नाही.

पूर्ण वातावरणातील एका क्षुल्लक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्यातून पाहिजे तोच अर्थ घेणे  
उदा. मी एवढ्या वेदनेत आहे , कोणाला माझी काळजी नाही ,सगळे मजेत आहे.

सगळ्या गोष्टी स्वतःवर घेणे - जसे मीच काहीतरी पाप केले आहे म्हणून ह्या वेदना माझ्या मागे लागल्यात.

आतापर्यंत मानसिक घटकांचे वेदनेमधील स्थान लक्षात आले असेलच . त्यामुळे वेदनेवरच्या उपचारांमध्ये  मानसिक उपचार हा महत्वाचा उपचार आहे . ह्या उपचारांचा हेतू थेट वेदना नष्ट करणे नसून व्यक्तीमध्ये स्व-कार्यक्षमता आणि स्व-नियंत्रण वाढवणे , वर्तन आणि विचार ह्यामध्ये योग्य ते बदल करून घेणे ,  स्वीकार आणि सजगता वाढवणे आणि एकूणच व्यक्तीची जगण्याची गुणवत्ता सुधारणे हा हेतू आहे . ह्यात व्यक्तीच्या दुर्लक्षित  केलेल्या भावनिक , वैचारिक आणि वार्तनीक घटकांवर भर दिला जातो.वेदनांवर मानसशात्रीय उपचार करताना मनोशारीरिक टेक्निक, वर्तनविषयी दृष्टिकोन आणि  सायकोथेरपी ह्यांचा वापर केला जातो.

मनोशारीरिक टेक्निक मध्ये बायो फीडबॅक हि टेक्निक वापरली जाते जेणेकरून व्यक्ती हातात असलेल्या माहितीवरून निष्कर्ष काढून स्वतःला नियंत्रित करू शकतो उदा .एखाद्या व्यक्तीला ह्या टेक्निकच्यामुळे शरीरातील कोणते स्नायू वारंवार ताठरले जातात हे कळले कि तो त्या स्नायूंना शिथिल करण्याच्या  पद्धतींचा उपयोग करून तेथील वेदना कमी करू शकतो.

वर्तन दृष्टीकोनातून उपचार करताना वापरल्या जाणाऱ्या टेक्निक:-
  • वर्तन बदल (Behavior Modification ) 
  • पोटातून श्वसन (Diaphragmatic Breathing) 
  • स्नायू शिथिल करणे (Progressive  Muscle Relaxation)
  • ऑटोजेनिक ट्रेनिंग, 
  • व्हिजुअल आणि गाईडेड इमेज.

सायकोथेरपी मध्ये उपचारांचा केंद्रबिंदू हे वेदनेचे आकलन आणि अनुभूती असते . वेदनेच्या आकलन प्रक्रियेत निर्माण होणारे नकारात्मक विचार आणि भावनांची पुन:रचना केली जाते त्याचप्रमाणे ताण-तणावाचे व्यवस्थापन कसे करायचे, वेदनेमुळे निर्माण होणारे नकारात्मक विचार आणि भावना ह्यांबद्दल सजगता वाढवणे. 

आपल्या वेदनेच्या अवस्थेचा तिरस्कार करण्यापेक्षा वेदना अवस्थेचा स्वीकार करणे. ह्या सगळ्या टेक्निक सायकोथेरपी मध्ये वापरल्या जातात. 

तसे पहिले तर वेदना उपचार पद्धतीमध्ये एका पद्धतीवर विसंबून न राहता बहुआयामी पद्धतींचा म्हणजेच जैविक, मानसिक ,सामाजिक पद्धतींचा वापर करून समग्र उपचार केले जातात आणि त्याचा पिडीत व्यक्तीला व त्याच्या कुटुंबियांना फायदा होतो .

वेदना उपचारांमध्ये मानसिक उपचार घटकांचा समावेश केल्यास त्याचे अनेक फायदे मिळतात . सायकोथेरपी मध्ये शिकलेल्या कौशल्यामुळे  पिडीत व्यक्ती वेदनांचे स्व-व्यवस्थापन करू शकतात. स्वतःच्या नकारात्मक भावना आणि विचार-वर्तन सकारात्मकतेकडे व सृजनतेकडे वळवतात त्यामुळे त्याच्या आयुष्याचे नियंत्रण वेदना च्या हातात न राहता व्यक्ती त्याच्या दैनंदिन आयुष्याची गुणवत्ता वाढवून बंद खोलीतून बाहेर पडून सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगतात.


हे जे वेदनेचे दुष्टचक्र सुरु होते ते आपला कसा घात करू शकतात..?

पुढील भागात आपण ते पाहुयात ...!!! 

ईथवर जर तुम्हाला व्यवस्थित समजले असेल तर आपल्या व्हाटसअप कम्यूनिटी ग्रुप वर आत्ताच सामील व्हा !!!!

आपण शिकुयात आणि आपल्या प्रियजनांनाही समृद्ध करूयात!! 

मन स्ट्रॉंग तर शरीर स्ट्रॉंग!!ही लिंक प्रत्येकाने शेअर करावी!!! 

https://chat.whatsapp.com/IXmXAXe6iDRCV73LqnFHs1

आधीचे सर्व भाग येथे वाचायला मिळतील :- 

इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे - मोफत सिरीज - भाग 1

इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे - मोफत सिरीज - भाग 2


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)