भूतकाळात स्वतःमध्ये काही ठिकाणी निर्माण झालेली आगतिकतेची आणि असहाय्य असल्याची भावना स्वतःबद्दल राग आणि शरम निर्माण करते..

TheMindTalks
0

 ही जाणीव ही मनातला भूतकाळ विसरू देत नाही... 

bitter past memories

... तर ... आपण जेव्हा हा होऊन गेलेला त्रासदायक भूतकाळ सध्या वर्तमानात जगत असतो तेव्हा त्यावेळी अनुभवलेले नकारात्मक विचार, भावना ,अपमान, शरम ही सुद्धा मनात जीवंत ठेवत असतो, त्यांचे चर्वण,रवंथ करत राहतो. ह्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर ही नकारात्मक परिणाम होत असतो. 

एकतर आपण भूतकाळातील गोष्टी जीवंत ठेवल्या असल्यामुळे वर्तमानाचा खऱ्या अर्थाने आनंद घेवू शकत नाही. वर्तमानातील घटना, नातेसंबंध,कुटुंब ह्यावर ही दूरगामी परिणाम होतात. 

मनात काही कारण नसताना नकारात्मक भावनांची ये जा चालू असल्याने शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो कारण नसताना अंगदुखी, सांधेदुखी, अर्धशिशी, डोकेदुखी मागे लागते.

सतत नकारात्माक उत्तेजत अवस्था तुमचे ब्लड प्रेशर कमी जास्त करत राहते.

नकारात्मक विचारांमुळे होणारे परिणाम आणि त्यांची दिसणारी मानसिक लक्षणे:

  • स्वभाव चिडचिडा होणे, 
  • पटकन राग येणे, 
  • कारण नसताना रडू येणे, 
  • आगतिक आणि असहाय वाटणे, 
  • मनात सूडाची भावना तीव्र होणे, 
  • हरल्याची भावना असणे 

भूतकाळाचे ओझे कधी अपराधिपणा, शरम तर कधी दुखावले जाणे, कधी खूप अन्यायकारक वागणूक ह्यांचे भार वाहत राहते . मग कधी कधी व्यक्ति खरंच वैतागून जातो की आपण ह्या सापळ्यातून  बाहेर पडू की नाही ? 

जो बीत गया है वो गुज़र क्यों नहीं जाता? संपून का जात नाही ही सगळे मनातून?

ह्या सापळ्यात आपण कायमस्वरुपी अडकून न पडता त्यातून बाहेर निघू शकतो. ही काम फार अवघड नाही  त्यासाठी आपण त्या भूतकाळात का अडकून पडलो आहोत ,आपल्या कोणत्या भावना आणि आपला स्वतःबद्दलचा कोणता दृष्टीकोन आपल्याला त्यात अडकवून ठेवतो ह्याचा शोध घेणे हि गरजेचे ठरते.

खूपवेळा  भूतकाळातील काही घटकांशी मग ते व्यक्ति , प्रसंग वा वस्तु असो ,आपण भावनिकरित्या जोडलेलो असतो किंवा त्या घटकांवर भावनिक रित्या अवलंबून असतो. त्या घटकांकडून अपेक्षित प्रतिसाद वा वागणूक मिळाली नसल्यास आपला झालेला भ्रमनिरास आपण नाकारत राहतो. तो/ ती अशी कशी वागू शकते किंवा असा प्रसंग माझ्याबाबत कसा काय घडू शकतो ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या नादात आपण तो भूतकाळ खूप लांबपर्यंत वाहत नेतो .

कधी कधी भूतकाळातील घटकांबद्दल असलेला राग, द्वेष , तिरस्कार जो त्यावेळी निर्माण झाला होता, पण त्याला निवळू न दिल्याने तो भूतकाळाला जीवंत ठेवतो .

भूतकाळात स्वतःमध्ये काही ठिकाणी निर्माण झालेली आगतिकतेची आणि असहाय्य असल्याची  भावना स्वतःबद्दल राग आणि शरम निर्माण करते, ही जाणीव ही मनातला भूतकाळ विसरू देत नाही.

आता ह्यातून बाहेर कसे पडायचे ? वाचत रहा  ... 

त्याचा पहिला भाग येथे वाचा - जो बीत गया है वो गुज़र क्यों नहीं जाता ?

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)