आता ह्यातून बाहेर कसे पडायचे ?
म मित्रांनो, आत्तापर्यन्त आपण पहिले की -
मनात काही कारण नसताना नकारात्मक भावनांची ये जा चालू
असल्याने शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो कारण नसताना अंगदुखी, सांधेदुखी,
अर्धशिशी, डोकेदुखी मागे लागते.
सतत नकारात्माक उत्तेजत अवस्था तुमचे ब्लड प्रेशर
कमी जास्त करत राहते .नकारात्मक विचारांमुळे स्वभाव चिडचिडा होणे,पटकन राग येणे,
कारण नसताना रडू येणे, आगतिक आणि असहाय वाटणे, मनात सूडाची भावना तीव्र होणे,
हरल्याची भावना असणे, ई ही मानसिक लक्षणे
जाणवतात.
भूतकाळाचे ओझे कधी अपराधिपणा, शरम तर कधी दुखावले जाणे, कधी खूप
अन्यायकारक वागणूक ह्यांचे भार वाहत राहते.
त्यातून बाहेर यायला प्रयत्न आपल्यालाच करायला लागतील.
त्यातून तुम्ही अगदी सोप्या रीतीने बाहेर येऊ शकता !!!
त्यावर आम्ही हमखास उपाय करतो, आमच्या विविध क्लाईंटना आलेले चांगले अनुभव अभ्यासून त्यातील काही उपाय येथे देत आहोत:
- ईतरंबरोबर वर्तमानात संवाद वाढवणे,
- वेगवेगळे छंद जोपासणे,
- जुन्या गोष्टी सोडून द्यायला शिकणे
- क्षमा आणि कृतज्ञता ह्या सकारात्मक भावनांचा सराव करणे.
- आपल्या नियंत्रणात जे जे आहे ते ओळखून जे नियंत्रानाबाहेर आहे त्याला महत्व न देणे.
- जे नियंत्रणात आहे त्यात सुधारणा करत राहणे.
- भूतकाळातील घटकांशी कोणत्या नकारात्मक भावना व विचार जोडले गेलेत हे ओळखायला शिकणे
- त्यातून सकारात्मक भावना आणि तर्कसंगत विचारांमध्ये रूपांतरण करणे
- वास्तव स्वीकारणे.
- भूतकाळ हा घडून गेलाय ,त्याचे बरे-वाईट परिणाम सुद्धा घडून गेलेत आणि आता कितीही वाटले तरी मी भूतकाळ बदलू शकत नाही हे कायम लक्षात ठेवणे
- चालू क्षणांमध्ये जाणीवपूर्वक आणि सजगतेने राहण्याचा सराव ठेवणे.
- वेगवेगळ्या सामाजिक कौटुंबिक उपक्रमामध्ये सहभाग घेणे.
- माइंडफुलनेस वाढविणे !
आम्ही वेगवेगळ्या उपलब्ध उपायांद्वारे तुम्हाला आणखीन मदत करू शकतो .. आमच्या ग्रुप मध्ये आजच सामील व्हा आणि दिलेल्या वेळेत पर्सनल कॉल करा!!
लक्षात ठेवा -
Very nice post, hope so being so good
ReplyDelete