नार्सिसस - तो फक्त स्वतःच्याच प्रेमात होता...

TheMindTalks
0

ग्रीक पुराणातील प्राचीन आख्यायिकेनुसार...

Narcissism 

ग्रीक अर्काडियात, त्याकाळी सौंदर्याचा जबरदस्त आविष्कार म्हणता येईल असा "नार्सिसस" नावाचा तरुण राहत होता. चंद्रदेवी अप्सरा सेलेन आणि तिचा मर्त्यभूमितील पती एंडीमिओन ह्यांचा नर्सीसस हा तिच्याप्रमाणेच  अत्यंत रूपवान असा  राजपुत्र होता, त्यामुळे तो कायम स्वतःच्याच प्रेमात असायचा!!

एक उन्हाळ्यात, तो निर्मळ झऱ्यापाशी पाणी प्यायला बसला. पाण्यात पाहताच त्याला पहिल्यांदा त्याचे अद्भुत प्रतिबिंब दिसले.!! ते प्रतिबिंब इतके सुंदर होते की, प्रथम पाहताच तो त्याच्या मोहपाशात सापडला. 

दिवसरात्र तो तेथेच बसून राहिला. रोज सुर्य ढळत होता, पक्षी गात होते, पण नार्सिससला याची पर्वा नव्हती. त्याला फक्त आपलेच प्रतिबिंब दिसत होते. 

एकदा त्याला भावना अनावर झाल्या आणि तो त्या प्रतिबिंबाला स्पर्श करण्यासाठी पुढे झुकला. पाणी हलले, प्रतिबिंब विरघळले. तो दुःखात गेला, ईतक्यात त्याने अचानक पाण्यात उडी मारली. पोहता येत नसताना सुद्धा !!!! तिथे एक मोठा स्प्लॅश झाला, पुन्हा धीर गंभीर शांतता.!! 

आता त्या झऱ्याच्या काठाशी नार्सिसस बसलेला नव्हता, त्याच्या जाण्याने तिथे फक्त एक सुंदर पांढरे एकटे फूल उगवले होते.!!! 

नार्सिससचे सुंदर रुप तेथेच झऱ्यात बुडून राहिले, आणि तो स्वतःच आपल्या स्वतःच्या प्रेमाच्या सापळ्यात अडकून मरण पावला. 

तर मित्रांनो, वरील कथेतून काय समजते ?

राजपुत्र कायम पाण्यात दिसलेल्या आपल्या स्वत:च्या प्रतिबिंबाच्या प्रेमात होता. सारखे सारखे त्याकडे पाहतो आणि नेहमी तो अत्यधिक मोहित होतो. आपल्याच प्रतिमेच्या प्रेमात वारंवार पडतो आणि त्या व्यतिरिक्त त्याला ईतर काहीही सुचत नाही! 

आपली प्रतिमा सोडून त्याला दुसरे काही सुचत नाही आणि ज्या प्रतिबिंबाच्या तो इतका प्रेमात पडतो, पछाडला जातो त्याला प्राप्त करू शकत नाही ह्या वेदनेमध्ये त्याचा अंत होतो.  

नार्सीससच्या ह्या आख्यायिकेवरून स्वतःच्या आत्यंतिक प्रेमात असलेल्या व्यक्तिमत्वाला नार्सीसीझम अर्थात आत्मप्रीतीवाद हे नाव दिले गेलेय. आत्मप्रेमाचे अत्यंत विकृत वागणे म्हणजे नार्सिसिझम. अशा लोकांना फक्त स्वतःचं महत्त्व वाटतं. दुसऱ्यांशी नातं जोडायचा कल्पनाच करत नाहीत. आपल्या सौंदर्याबद्दल अतिशयोक्ती समज आणि इतरांपेक्षा स्वतचीच काळजी असते. ते आपले नुकसान स्वीकारत नाहीत आणि सतत प्रशंसा अपेक्षा ठेवतात. अशा लोकांना समजून मदत करणे गरजेचे.... 

नार्सीसीझमचे परिणाम किती घातक असू शकतात यावर आपण पुढे पाहणार आहोत !!

त्या आधी काही महत्वाच्या सिरिज पहा :-



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)