नार्सिसिझम असलेल्या व्यक्तींच्या काही समजुती..

TheMindTalks
0

त्या बहुतांशी 85% फक्त समजुतीच असतात, त्यात खरेपणाचा लवलेश नसतो !!

What is Narcissism Thinking

त्यातील काही महत्वाच्या आपण पाहुयात !

अतिशयोक्ती समज: 

या लोकांना वाटते की ते खूपच हुशार, यशस्वी आणि आकर्षक आहेत, इतकी की दुसरे सर्वात त्यांच्याशी तुलना करू शकत नाहीत.


लक्ष वेधण्याची इच्छा: 

त्यांना सतत प्रशंसा, मान्यता आणि विशेष वागणूची गरज असते. त्या कोणत्याही मार्गाने लोकांचे लक्ष वेधले तरी चालते.

दुसऱ्यांच्या भावनकडे दुर्लक्ष:

त्यांना दुसऱ्यांच्या गरजा, भावना किंवा समस्यांबद्दल कमी रस असतो. ते स्वतःच्या जगात रमलेले असतात.


टीका स्वीकारत नाहीत: 

त्यांना आपल्या चुका किंवा कमतरता दाखवल्या जाणावळत. ते नेहमीच इतराला दोष देतात आणि आपले नुकसान स्वीकारण्यास तयार नसतात.


आत्मकेंद्रित असतात: 

त्यांच्या बोलण्याचा विषय बहुधा स्वतःच असतो. इतर लोकांच्या गोष्टी ऐकण्यात व रस घेण्यात त्यांना रस नसतो.

नार्सिसिझम हा एक गंभीर मानसिक आजार आहे. याचा सामना करणाऱ्या लोकांना उपचार आणि तज्ज्ञांची मदत आवश्यक आहे..!

नारसिस्टिक व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ति अमर्याद यश , बुद्धिमत्ता, सत्ता पॉवर , सौन्दर्य ,आणि प्रेमाच्या आदर्श कल्पनामध्ये, दिवास्वप्नामध्ये रममाण राहतात.  

ह्या व्यक्ति त्यांच्या अहंकाराला कुरवळणारे माणसे स्वतःच्या आजूबाजूला ठेवतात, जरी हे नातेसंबंध पोकळ असले तरी आपला अहंकार जपण्यासाठी त्यांना ते महत्वाचे वाटतात.  


नारसिस्टिक व्यक्तिमत्वाचे दोन प्रकार येतात : 

  • भपकेबाज  नारसिस्टिक व्यक्तिमत्व 
  • असुरक्षित नारसिस्टिक व्यक्तिमत्व.

 नारसिस्टिक व्यक्तिमत्वाची कारणे अजूनतरी पूर्णपणे स्पष्ट झाली नाहीत. पण अभ्यासातून  ह्याला काही अंशी लहानपणीचे घटक कारणीभूत आहेत असे ही समोर आलेय. 


भपकेबाज  नारसिस्टिक व्यक्तिमत्व :

यात येणाऱ्या व्यक्ती लहानपणी ते काहीतरी स्पेशल आणि इतरांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ असल्याची वागणूक घरातल्यांकडून त्यांना मिळालेली असते. 

ह्याच खास वागणुकीची अपेक्षा  त्यांच्या युवक अवस्थेत आणि प्रौढयावस्थेत सुद्धा वाढत जाते . ह्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्ति आक्रमक, वर्चस्ववादी, स्वतःला अतिमहत्व देणाऱ्या, भरपूर आत्मविश्वासपूर्ण पण संवेदनशिलता नसलेल्या  असतात. 


असुरक्षित नारसिस्टिक व्यक्तिमत्व:

असुरक्षित आणि दुर्लक्षित बालपण तसेच लहानपणी झालेला मानसिक आणि शारीरिक छळ हयातून गेलेल्या व्यक्तिमध्ये असुरक्षित नारसिस्टिक व्यक्तिमत्व आढळून येते . 

अश्या व्यक्ति स्वतःप्रती अत्यंत संवेदनशील असतात. नारसिस्टिक वर्तन त्यांना त्यांच्या आयुष्यातील जी पोकळी जाणवत असते  त्यापासून त्यांचे लक्ष हटवण्यासाठी मदत करते. 

कोणी त्यांना खास वागणूक दिली किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तरी ते अस्वस्थ होतात किंवा विचलित होतात. जरी त्यांची इतरानी आपल्याकडे लक्ष द्यावे, आपली काळजी घ्यावी अशी अपेक्षा असली तरी हे काळजी घेणे सुद्धा त्यांच्यामध्ये नकारात्मकता निर्माण करते .  


त्यांना उपचारांसाठी आणणे हे खुपच आव्हानात्मक असते !!!! 
काय कारणे दडली आहेत त्यामागे ?
पाहुयात पुढील भागात !!

या आधीचे 2 भाग पहिले असतीलच :



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)