नार्सीसीस्ट व्यक्ती त्यांच्यात काही दोष आहे हेच मान्य करायला तयार नसतात ..

TheMindTalks
0

त्यांना उपचारांसाठी आणणे हे खुपच आव्हानात्मक असते !!!! 

narcissism


काय कारणे दडली आहेत त्यामागे ? ती आता आपण पाहुयात !!


नार्सीसीझम वा आत्मप्रीतीवाद व्यक्तिमत्व असलेली माणसे त्यांच्यामध्ये काही दोष आहे हे मान्य करायला सहजासहजी तयार नसतात त्यामुळे त्यांना उपचारांसाठी आणणे हे आव्हानात्मक आहे.

अश्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींमध्ये मानसोपचार आणि समुपदेशन बऱ्याच प्रमाणात सुधारणा आणू शकते.

जे लोक अशा व्यक्तिमत्व असलेल्या लोकांसोबत राहतात त्यांना स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे अधिक गरजेचे ठरते.

नार्सीसीझम असलेल्या व्यक्तीसोबत राहणाऱ्या किंवा त्यांच्याशी संबंध येणाऱ्या इतर लोकांनी पुढील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे :

नार्सीसीझम व्यक्तींचे वर्तन वैयक्तिक न घेणे : 

त्यांच्या वर्तनासाठी तुम्ही कारणीभूत नाही आहेत तसेच त्यांच्या वर्तनाला जबाबदार ही नाही  आहेत हे समजून घेणे व त्यांच्या वर्तनाबद्दल स्वतःला दोष देणे थांबवणे . 

लहानपणापासूनच त्यांच्या चुकीला पाठीशी घालू नका:

तुम्ही त्यांना मदत करू शकता पण त्यांच्या चुकीच्या वर्तनाला पाठिंबा देणे वा त्यांनी केलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी तुम्ही जबाबदार नाहीत हे स्वतः मान्य करणे. लहानपणापासूनच त्यांनी केलेल्या चुकीचे समर्थन करू नका जए चूक आहे ते चुकच आहे, मुलांना त्याची वेळीच समज दिली गेली पाहिजे 

त्यांच्यात आणि आपल्यात एक सीमा आखणे:

सीमारेषा आखण्याचा हेतु अश्या व्यक्तींचे वर्तन सुधारणे हा नाही; तर ह्या मर्यादेमुळे विशिष्ट वर्तन सहन केले जाणार नाही हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि ह्याचे कठोर पालन केले म्हणजे जर मर्यादा ओलांडून वर्तन घडले तर त्याचे परिणाम लगेच दर्शवणे होय . 

कठोरपणे गोष्टींचे त्या पालन करणे : 

नार्सीसीस्ट व्यक्तीचे वर्तन आपल्याला सीमित करता येते . जर तुम्ही तुमच्या मर्यादाची अमलबजावणी करण्यात कमी पडलात तर नार्सीसीझम व्यक्ति त्या गंभीर्यानी घेणार नाहीत . त्यामुळे कठोरपणा करावाच लागतो.

भावनिक अत्याचार बाबत सतर्क राहणे : 

नार्सीसीझम व्यक्ति अश्याप्रकारे गोष्टीना वळण देतात की त्यामुळे आपल्याला स्वतःबद्दल आणि अनुभवांबद्दल, कृतीबद्दल शंका निर्माण होतात .

ते त्यांचे एखादे कठोर वागणे अथवा बोलणे नाकारू शकतात आणि तुम्हीच त्यातून वेगळा अर्थ काढला अथवा तुम्ही खूपच संवेदनशील आहेत असे दोषारोपण करून रिकामे होतात . 

तुम्हाला खरे काय घडले हे माहीत नाही किंवा तुम्हीच चुकीचे अनुमान लावत आहेत असा आरोप करून ते तुमचा आत्मविश्वास कमी करून टाकतात. 
त्यामुळे ह्या भावनिक वर्चस्वबाबत जागरूक राहणे गरजेचे ठरते . इथे स्वतःचा आत्मविश्वास आणि स्व आदर ढळू न देणे महत्वाचे ठरते . 

अश्या पद्धतीने काही गोष्टीचे पालन केलेतर नार्सीसीझम व्यक्तींसोबतचे जगणे काही प्रमाणात सुसह्य करू शकतो.

आपल्या The Mind Talks अंतर्गत अशा शेकडो व्यक्ती आज उपचार घेऊन स्वत:चे आयुष्य अतिशय सन्मानाने, आत्मविश्वासाने आणि यशस्वीपणे जगू लागलेले आहेत !!! 

जर तुम्हाला काही मदतीची गरज असेल तर आपल्या ग्रुपवरील नंबर वर मेसेज देऊ शकता. आमच्या टीमपैकी कुणीतरी नक्कीच तुम्हाला पुढील गोष्टी समजावून सांगेल!!

भेटूयात पुढील नवीन विषयावर !!!

पुढील पोस्ट :-

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)