जोमो - जॉय ऑफ मिसिंग आऊट .. अर्थात सोशल मीडियाच्या जगात आनंदी कसे रहावे !!

TheMindTalks
0

जोमो म्हणजे हरवून जाण्याचा आनंद.. 

जोमो - जॉय ऑफ मिसिंग आउट 



आत्तापर्यन्त  आपण पहिले की - 

जोमो म्हणजे हरवून जाण्याचा आनंद. मुद्दाम स्वतःला हरवून टाकायचे आणि सगळ्यापासून लुप्त झाल्याचा आनंद उपभोगायचा . जोमो आपल्याला माहिती आणि नोटिफिकेशन च्या अखंड स्त्रोत की जो आपल्या मनाला खूप थकवत असतो त्यापासून सुटका देतो . 

जोमो मुळे आपल्याकडे आता जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता निर्माण होते .जेव्हा आपण फोमो ची शिकार असतो तेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे ,पोकळी आहे असे मानून ती पोकळी भरून काढण्यासाठी धडपडत राहतो तेच जर आपण जोमोला स्वीकारतो तेव्हा आपल्याकडे जे आहे त्याचे कौतुक करतो त्यासाठी आभारी असतो, आयुष्यातील रिकामेपण ,पोकळी जाणवत नाही . ह्यासाठी लुप्त होण्याचा , हरवून जाण्यातील आनंद खऱ्या अर्थाने घ्यायचा . 

या महत्वाच्या भागात आपण पाहणार आहोत की - 


फोमो मधून बाहेर येण्यासाठी किंवा तो आपल्याला हिट होऊच नये म्हणून काही नियम आणि सवयी निर्माण करायच्या :

  • सोशल मीडिया वापरण्याचे वेळापत्रक बनवून ते पाळणे .
  • स्वतःची शारीरिक ,भावनिक, मानसिक काळजी घेण्यावर भर देणे 
  • जास्तीत जास्त वर्तमानकाळामध्ये राहण्याचा सराव करणे . 
  • आभासी जग आणि वास्तव मधील फरक ओळखणे . स्वतःच्या ध्येय निश्चित करून त्यानुसार कृती करणे. 
  • आपण सोशल मीडिया वर नेमके काय शोधत आहोत,काय अपेक्षित करत आहोत हयाबद्दल सजग राहणे . 
  • कौटुंबिक संवाद आणि सहभाग वाढवणे . 
  • आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून असलेल्या अपेक्षा खरंच रास्त आणि वास्तववादी आहेत का हे वारंवार तपासून पाहणे त्यासाठी स्वतःबद्दलची सजगता वाढवणे 
  • वेगवेगळे छंद निर्माण करणे.  
  • एकदा का हरवून जाण्यात ही मजा आहे हे कळले नि त्यातील आनंद गवसला की हरवून जाण्याची भीती उरणार नाही.   
याबरोबरच आमच्या ग्रुप मध्ये काही कार्यशाळा आयोजित केल्या जातात ...  ज्याचा लाभ आतापर्यंत शेकडो लोकांना मोफत झालेला आहे !!

कार्यशाळा ऑफलाइन ऑनलाइन दोन्हीही असतात .... 

त्यात सहभागी जर झालात तर तुम्हाला शेकडो सहभागी लोकांप्रमाणे आयुष्यातील ईतर आनंदी व सोपे सोपे मार्ग सापडतात !!!  


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)