हानिकारक कोपिंग मेकॅनिझम

TheMindTalks
0

आपले आयुष्य हे वेगेवेगळ्या रंगीबेरंगी अनुभवांनी विणलेले महावस्त्र आहे, त्यातील काही अनुभव सुखद, काही दु:खद तर काही आव्हानात्मक असतात.

ह्या आव्हानात्मक, अवघड अनुभवांना सामोरे जाण्याची, त्यांना तोंड देण्याची पद्धत म्हणजे कोपिंग मेकॅनिझम. 

थोडक्यात काय तर अश्या अवघड अनुभवाना हातळण्याचे आपले भावनिक आणि वार्तणीक यंत्रसामग्री (टूलबॉक्स) म्हणजे आपली कोपिंग मेकॅनिझम.


पण जर आपल्या आव्हानात्मक परिस्थितिला प्रतिक्रिया देण्याची पद्धत जर चुकीची असेल किंवा प्रॉब्लेम्स ना दिला जाणारा प्रतिसाद हाच अजून एक प्रॉब्लेम ठरत असेल आणि आपण त्याबद्दल अनाभिज्ञ असू तर काय ?

कोपिंग मेकॅनिझम हे विचार, भावना आणि वर्तनाची अशी मनोवैज्ञानिक धोरणे आहेत की ज्या आपले ताण, प्रतिकूलता आणि भावनिक आव्हाने हाताळण्यासाठी वापरली जातात.

उपयोगी कोपिंग मेकॅनिझम मध्ये अश्या स्ट्राटेजी असतात की ज्या आपल्यामध्ये दीर्घकालीन मानसिक आरोग्यामध्ये फायदेशीर ठरतात तर हानिकारक कोपिंग मेकॅनिझम मध्ये अश्या स्ट्राटेजी असतात की ज्या आपल्यामध्ये दीर्घकालीन मानसिक आरोग्याचे नुकसान करून आपले आरोग्य बिघडवतात .

 

 पुढील भागात आपण कोपिंग मेकॅनिझम कसे निवडतात हे पाहू.


या आधिची पोस्ट येथे पहा-

सायकोथेरपि आणि एंक्झाइटी

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)