हरवल्याची भीती F.O.M.O. - फिअर ऑफ मिसिंग आऊट !!

TheMindTalks
0

एका सामान्य घरातील जेवायच्या वेळचा संवाद !!!

Irrelevant Social Presence Craze 

आई – “किती वेळा तुला सांगितले आहे की जेवायच्या आधी फोटो काढायचा आणि मम्मी च्या स्टेटस ला लावायचा?? एवढी सुद्धा अक्कल नाहीये तुला?”

आई 10 वर्षांच्या चिमुरड्यांवर ओरडली !! 

आधीच्या काळी मोठे लोक जेवायच्या आधी "हात धूतलेस का म्हणून ओरडायचे.. "

काले तस्मै नम: म्हणतात ना ... 

ही आजची दाहक परिस्थिती आहे मित्रांनो...

सामान्य व्यक्ति दिवसभरातील साधारणपणे 145 ते 150 मिनिटे सोशल मीडिया वर असतो . आपले प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक ट्रीप,घरातील छोटेमोठे समारंभ,आपले प्रत्येक यश,अचीव्ह्मेंट्स आपला मूड ह्या सगळ्याची सोशल मेडियावर नोंद केली जाते. सोशल मीडिया च्या ह्या अति वापरामुळे आणि अतिशेअरिंग मुळे निर्माण झालेले प्रॉब्लेम्स जगभरात चर्चिले आणि अभ्यासले जात आहेत .

त्यातीलच एका महत्वाच्या प्रॉब्लेमबाबत आज आपण जाणून घेवूयात :

फोमो (Fear Of Missing Out )

म्हणजेच हरवून जाण्याची भीती !

लुप्त होण्याची भीती !

जगाच्या नजरेआड होण्याची भीती !

फोमो (Fear Of Missing Out ) कडे मानसतज्ञांचे लक्ष साधारणपणे 2000 च्या दरम्यान वेधले गेले, ज्यावेळेस फेसबूक नवीन आले होते आणि मैत्रीसाठी,संवादासाठी आणि तुम्ही प्रत्येक क्षणी काय करता आहेत हे जगाला कळू देण्यासाठी वेगवेगळे फोटो, स्टेटस अपलोड करण्यासाठी अमर्याद ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले होते.

पण त्यासोबत अजून एक घातक मानसिक अस्वस्थता ही उदयास येत होती. 

ती म्हणजे फोमो.!!!

होय !!!

त्याला घातक का म्हणतात ते आपण पुढे पहाणारच आहोत !!!

फोमो म्हणजे :-

जेव्हा एखाद्याला जाणवते की 

मनोरंजक, 

आनंदायी 

किंवा महत्वाच्या गोष्टीमध्ये आपण सहभागी नाही आहोत 

किंवा 

आपल्याला सहभागी करून घेतले नाही, 

डावलले गेलेय, 

आणि आपण सोडून सगळे त्यात सहभागी आहेत !!

या परिस्थिती ने येणारी एक चिंताग्रस्त आणि चिडचिड होत असलेली रागीट मानसिक अस्वस्थता !

.... 

पुढे पाहुयात :-

एक वर्षापूर्वी माझी एक क्लायंट होती जी डिप्रेशन साठी माझ्याकडे आली होती... 

... 

आधीच्या महत्वाच्या पोस्ट पहा:-

स्वर्ग आणि नर्क पाहायचा आहे?

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)